Author: अनंत पांगारकर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान सोमवार, दि. १३ मे लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे. अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.…
निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा शिर्डी, रविवार दि. १२ मे निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने…
रविवार, दि. १२ मे दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा चार किलोमीटरपर्यंत चक्क वडाची २८४ झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवल, आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण “थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन” असं केलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्कासारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण…
रविवार, दि. १२ मे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी पक्षीय पातळीवर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांची भारतीय जनता पक्षाने निवड केली आहे. शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. लगोलग भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खताळ यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले. शिर्डी येथे झालेल्या बैठकीवेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनराज विसपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर, सरचिटणीस नितिन दिनकर, नितीन कापसे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांच्यासह उत्तर…
सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच मतदान जवळ येईल, तस तसं देशात काहीही घडू शकतं. वारं फिरलं आहे, रात्र वैर्याची आहे. सत्ताधारी भाजप काहीही करू शकतं, कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतं. लोकशाही वाचवणार्या प्रत्येकासाठी हे आव्हान होय. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना केलेलं हे आवाहन पुरतं बोलकं आहे. अनुभवाचे बोल हे असेच आहेत. कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर असंच काहीबाही होत आलंय. २०१४ ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये झालेल्या दंगली भाजपने पथ्यावर पाडून घेतल्या. पुढे पुलवामात सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा फायदा त्या पक्षाने घेतला. वातावरण विरोधात असताना भाजप तीनशे पार गेला. वातावरण विरोधात गेलं की ऐनवेळी भाजप काहीही करू शकतं, हा…
शनिवार, दि. ११ मे नोकरी लावून देण्याचे आम्हीच दाखवत पाच जणांनी नऊ लोकांना ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय लक्ष्मण कारखानीस, तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस यांच्यासह आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश असून त्यांच्याविरुद्ध पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात संदीप बबन इंदलकर (वय ४१ वर्ष, रघुकुल नगरी, औंध रोड, खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून रोहित कारखानीस याला नोकरी लावण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगत धनंजय कारखानीस आणि तुषार कारखानीस फिर्यादीकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले होते. मात्र…
अहमदनगर – शिर्डी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी, स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या “डीपी बोले तो… डेमोक्रेसी पार्टिसिपेशन” या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. यांची उपस्थिती… यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. असा आहे उपक्रम… मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे, स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या…
शुक्रवार, दि. १० मे महिलेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे या दोघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी १० वर्ष कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग तालुक्यातील तळाशेत गावच्या हद्दीत वडवली रस्त्यावर नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवारी १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित महिला तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे यांनी तिला पाठीमागून पकडून झाडाझुडपात खेचत नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून दोघांनी तिचे कपडे काढून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता.…
शुक्रवार, दि. १० मे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी पुण्याच्या विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा दिली. तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ११ वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोळकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आरोपीविरोधात पुण्याच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू…
गुरुवार, दि. ९ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर अकोले तालुक्यात दगडफेक करत हल्ल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेर तालुक्यातील पठार भागात त्यांचे प्रचाराचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचे समोर आले आहे. शिर्डीत लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या आजी-माजी खासदारांसह उत्कर्षा रुपवते निवडणूक लढवत असून सुरुवातीला सरळ आणि दुरंगी वाटणारी निवडणूक रुपवतेंमुळे तिरंगी बनली आहे. त्यामुळे लाटेवर आपलाच विजय निश्चित असं मानणाऱ्या आजी-माजी खासदारांना धडकी भरली असल्याचे दिसते. रूपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर मतदार संघात त्यांच्या सहानुभूतीत वाढ झाली आहे. असे असतानाच तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या रूपवते यांचे निवडणूक बॅनर फाडले जात…
