Author: अनंत पांगारकर

गुरुवार, दि. ९ मे रस्त्याने जाणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७ वर्ष) याला संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. घारगाव परिसरातील या खटल्याकडे पठार भागातील संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. १२ डिसेंबर २०१८ रोजी पीडित मुलगी कच्च्या रस्त्याने शाळेत जात असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या रवींद्र गोंधे याने असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला माझ्यासोबत घारगावला चल, तुला शाळेत सोडतो. असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. मात्र शाळेकडे…

Read More

गुरुवार, दिनांक ९ मे अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा वकिलावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता जुन्या कोर्टाजवळ लोणी हवेली (ता. पारनेर) येथील वकील अशोक कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवत गुन्हा दाखल करण्यापूर्वीच हल्लेखोरास पकडण्यात यश मिळविले असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे. अधिक माहिती अशी, ॲड. मयूर अशोक कोल्हे हे आपल्या वकील असलेल्या वडिलांसह न्यायालयीन कामकाजानिमित्त लोणी हवेली (ता. पारनेर) येथून अहमदनगरला आले होते. ॲड. अशोक कोल्हे अहमदनगरमधील जुन्या न्यायालयाजवळ असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काही एक कारण नसताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड यांने…

Read More

बुधवार, दि. ८ मे  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ गुरुवारी कोपरगावमध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची सभा होत आहे. शिर्डीतून आपलाच विजय निश्चित या विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांना वंचितच्या उमेदवाराने चांगलेच जेरीस आणल्याचे दिसत आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांच्या तुलनेत रूपवते मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून शिर्डीतील पहिल्या महिला उमेदवार म्हणून मतदार दोघात तिसरा असा विचार करताना दिसत आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची मदार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. मतदार संघात निवडणुकीदरम्यान मिस्टर इंडिया म्हणून परिचित झालेले लोखंडे निवडणुकीनंतर परत दिसतील की नाही याची साशंकता आहे.…

Read More

बुधवार, दि. ८ मे  नवऱ्याचे बाहेरच्या महिलांशी अनैतिक संबंध असल्याने नवरा-बायकोतील वादाची परिणती बायकोने गळफास घेऊन आत्महत्या करण्यात झाली. मोनिका मधुकर ओव्हाळ (वय ३८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेचा भाऊ प्रशांत चाबुकस्वार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय ४५ वर्ष रा. येरवडा, पुणे) यांच्या विरोधात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची बहीण मोनिका आणि मधुकर ओव्हाळ यांच्या लग्नानंतर देखील मधुकर ओव्हाळ याचे बाहेरच्या महिलांशी अनैतिक संबंध होते. यावरून नवरा-बायकोत सातत्याने वाद होत तसेच नवरा मधुकर हा सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून मोनिका राहत्या घरात गळफास घेऊन…

Read More

बुधवार, दि. ८ मे पती-पत्नीच्या वादाचा अंत अखेर पत्नीने दोन्ही मुलींचा गळफास देत खून करत स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात झाला. पत्नीने स्वतः चिमुकलीचा आत्महत्या पूर्व व्हिडिओ नातलगांना पाठवत आत्महत्या केल्याची ही दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. अश्विनी स्वप्निल निकुंभ (वय ३०), आराध्या स्वप्निल निकुंभ (वय ८) आणि अगस्त्या स्वप्निल निकुंभ (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळी सात वाजता आडगाव मधील जत्रा हॉटेल जवळील इच्छामणी नगरमध्ये असलेल्या हरीवंदन सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत अश्विनी हिने आत्महत्येपूर्वी पती स्वप्निल निकुंभ देत असलेल्या त्रासाच्या माहितीचा आराध्या आणि स्वत:चा व्हिडीओ नातलगांना पाठविला. तसेच पती स्वप्निल आणि…

Read More

बुधवार, दि. ८ मे ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातून दोन जागांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून या चार जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १० जूनला मतदान होणार आहे. मंगळवारी राज्यातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची ही मोठी घोषणा केली आहे. विधान परिषदेतील मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाल संपणाऱ्यामध्ये समावेश आहे.…

Read More

बुधवार, दि. ८ मे बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी वर्ग एक ते तीनच्या तिघा अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात एक लाख रुपयांची लाख स्वीकारताना दोघा जणांना लाच लूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४ वर्ष), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४ वर्ष) आणि कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ वय ५३ वर्ष) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. चंद्रपूरमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील तक्रारदाराने या संदर्भात चंद्रपूरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार…

Read More

मंगळवार दि. ८ मे देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजप, एनडीए देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत केले. मंगळवारी दुपारी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान काँग्रेसवर टीका करत म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. ओबीसी, एससी एसटी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्या गोष्टीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता तीच गोष्ट आता ही लोक…

Read More

मंगळवार, दि. ७ मे  शुक्रवारी (दिनांक १० मे) सायंकाळी सहा वाजता अहमदनगरच्या झोपडी कॅन्टीन जवळील माऊली सभागृहात “निर्भय बनो, नागरिकांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ॲड. असीम सरोदे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. विश्वंभर चौधरी अहमदनगरकर नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘जागे व्हा, धोक्याची घंटा वाजली आहे’ या टॅगलाईन खाली होत असलेल्या या सभेसाठी अहमदनगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

मंगळवार, दि. ७ मे संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव पान येथील उप बाजारामध्ये मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी कांदा लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी यामुळे कांदा विक्रीची मोठी सोय झाली आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान उपबाजारात मंगळवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. यावेळी सभापती शंकर खेमनर, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, विजय सातपुते, रुक्मिणी साकुरे, दिपाली वर्पे, सुधाकर ताजणे, अनिल…

Read More