Author: अनंत पांगारकर

दि. १२ मार्च, संगमनेर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. सरकारच्या माध्यमातून सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंब लाभ योजना अशा योजनांचा समावेश आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सर्वसाधारण ५२४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५…

Read More

दि. ११ मार्च, मुंबई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी…

Read More

दि. ११ मार्च, मुंबई खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. दुपारी दोन वाजता यात्रा नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे.…

Read More

दि. ११ मार्च, संगमनेर राज्यभर निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने सभांचा धडाका सुरू आहे. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून संगमनेर मध्ये बुधवारी १३ मार्चला या सभेचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी या सभेला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे, हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. निर्भय बनो अंतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या सभांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अकोले बायपास रस्त्यावरील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (१३ मार्च) दुपारी तीन वाजता निर्भय संगमनेरकर आयोजित प्रबोधन सभा…

Read More

भोजापूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून सोळा किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन ७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला, मात्र सत्ता बदल होताच नव्या सरकारने या निधीला स्टे लावला दि. १० मार्च, संगमनेर तळेगाव भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, या हेतूने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर पूरचारी करण्यात आली. दरवर्षी कारखाना या चारीची दुरुस्ती करत असतो. यामुळे परिसरातील गावांना पाणी मिळते. मात्र या चारीच्या कामात ज्या लोकांचे योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही, असे लोक या परिसरात येऊन आपसात मनभेद निर्माण करत आहे. अशा प्रकारच्या लोकांना थारा देऊ नका, असे स्पष्ट करत नव्याने सोनेवाडी ते तिगाव…

Read More

जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा प्रचारातील रंग वाढत जाणार. प्रचार म्हटला की नेत्यांच्या तोंडाला आवर घालणं अवघड. त्यात भारतीय निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला विकला गेल्याने सत्ताधार्‍यांवर त्याचा काहीही अंकुश नाही. यामुळे भाजपसाठी वक्र प्रचाराची संधीच संधी आहे. वायफळ टीका टिपण्णी करणार्‍या सत्ताधारी भाजप नेत्यांना हात न लावणारा हा आयोग विरोधकांसाठी मात्र गले की हड्डी बनला आहे. आयोगाच्या आंधळेपणामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी ओकार्‍या करायला सुरुवात केली आहे. अबकी बार ४०० पारचा नारा लावणार्‍या भाजपसाठी महाराष्ट्रातली परिस्थिती अनुकूल नाही.  मतांची आणि उमेदवारांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याच्या दौर्‍यावर आलेले अमित शहा हे भाजपचे तारणहार, देशाचे गृहमंत्री. विरोधी पक्षांना अडकवण्यासाठीच्या सर्वोत्तम…

Read More

मुंबई, दि. ८ मार्च खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून नंदूरबार जिल्ह्यातून १२ तारखेला ही न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. १७ मार्च रोजी या यात्रेची सांगता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेने होणार आहे. यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाने यासाठी समन्वय समित्या गठीत केल्या आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमिती सदस्य…

Read More

दि. ९ मार्च रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रक्तपेढी चालकाकडे एक लाख दहा हजाराची लाच मागणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या अस्थिरोगतज्ञाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अश्विनी किशनराव गोरे (वय ४२ वर्षे) व डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय ४८ वर्षे, दोघे रा. क्वॉटर्स क्र.३, क्लास १ क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दांपत्याची नावे आहेत. डॉ. अश्विनी गोरे या उदगीरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी…

Read More

दि. ८ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सर्व्हेनंतर भाजपकडून तब्बल डझनभर खासदारांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची…

Read More

दि. ८ मार्च, संगमनेर राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत एका पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली ३६ जिवंत वासरांची सुटका करत ही वासरे संगमनेर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अबूबकर इसाक शहा (रा. ममदापुर, ता. राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कत्तलीच्या उद्देशाने एका पीकअप मधून जिवंत वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

Read More