Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. “भारत न्याय यात्रा” असं नाव या यात्रेला देण्यात आल असून १४ जानेवारीला मणिपूर पासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. खासदार गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून उत्तर भारतातील काश्मीरपर्यंत काढलेली ही भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अति भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूर पासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) नागपूरमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३८ वा स्थापनादिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामधून बुधवारी दुपारी १० हजारावर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला जाणार आहे. मंगळवारी संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाने, हेमंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली. नगर शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ देण्यासाठी संगमनेर शहरात दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी पात्र असलेले परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे , जनजागृती करणे याबरोबरच लाभार्थ्यांशी संवाद करून या विकसित यात्रेत अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील बस स्थानक परिसर येथे उद्या, दि. २७ रोजी दुपारी २.३० वाजता व २८ डिसेंबर रोजी सकाळी १०…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला ३५० ते ३७५ जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे. नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. नानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून काही दिवसांपूर्वी मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. फडणवीस यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही पदवी प्रदान केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते. जपान आणि भारतातले संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर आज जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. विशेष बाब…
संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राहुरीहून सकाळी संगमनेरच्या दिशेने येत असताना पिंपरणे गावाच्या शिवारात हा अपघात झाला. या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थीच होते. हे सर्वजण संगमनेरला येत असताना मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे, हा संदेश देणारा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करीत नाताळ व नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी ‘गाणी येशू जन्माची’ या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, प्रा. बाबा खरात, आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज चोपडे, ॲड. अरविंद राठोड, सत्यानंद कसाब, विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब, भाऊसाहेब नेटके, डॉ. हेमलता राठोड, प्रतीक खरात, प्रांजल…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृहमंदिरात जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही तर मधुर-अमृत तयार होईल. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मैत्रिणींसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सांदण दरीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्ष, रा. दहिसर, मुंबई) असे या तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजुर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतून काही मैत्रिणी भंडारदरा धरण परिसरासह सांदण दरी बघण्यासाठी आल्या होत्या. यावेळी यातील ऐश्वर्या खानविलकर हिचा खडकावरून पाय घसरल्याने ती खाली पडली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची…
