Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या घोषणाचे स्वागत होत असतानाच संगमनेरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर एका शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून थोरात यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे समस्त नागरिकांनी स्वागत केले. मात्र संगमनेर तालुक्याचा इतिहास आणि परंपरा वेगळ्या आहेत याचा संबंधितांना विसर पडल्याची टीका कार्यकर्ते करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात मोठ्या तोडफोडीनंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला जागा वाटपात किती जागा येणार यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फॉर्मुलाच सांगितला. लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी देखील राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? यावर नेहमी चर्चा सुरू असते. अशाच एका मुलाखतीमध्ये महायुतीच्या जागांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी या मुलाखतीत भारतीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असताना देखील आपण केवळ निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर निळवंडे निर्मितीचा सर्व इतिहास समोर आहे. आता निळवंडेतून पाणी येत आहे. मात्र या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, मदत केली, तो इतिहास आपण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते, जलनायक म्हणून ओळखले जाणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, संपत गोडगे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे,…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो आपणच संस्कृतीचे कसे पायिक आहोत, आपल्याहून संस्कृतीची अक्कल कोणालाच कशी नाही, याविषयी अक्कलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते दोन दिवसांपासून जमिनीवर आलेले दिसतात. आपल्या प्रदेशाध्यक्षाच्या द्युत क्रीडेचे गोडवे गाऊ लागल्यापासून पक्षातल्या बोलबच्चन टग्यांची बोलती बंदी झालेली दिसते. आपण करत असलेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी हे टगे कसलीही उदाहरण पुढे करायचे. मकाऊला पोहोचलेल्या आपल्या नेत्याच्या काळ्या कारनाम्याचं उत्तर देतानाही या मुर्खांनी आदित्य ठाकरेंपुढच्या भरलेल्या ग्लासचं उदाहरण देण्याचा निर्लज्जपणा केला आणि मकाऊच्या कॅसिनोतील जुगार झाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. लाज विकलेलीच माणसं असले उद्योग करत असतात. आज भाजपचे नेते ते करत आहेत. जगाला संस्कृतीचं ज्ञान शिकवणार्या या पक्षाच्या नेत्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: पहाटेच्या सुमारास धांदरफळ परिसरात बेकायदेशीर वाळूचे वाहतूक करणारी पिकअप मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तर पिकअपमध्ये असलेले तिघे मजूर पाण्यातून वर येण्यात यशस्वी झाले. विहिरीत पडलेली पिकअप वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून बेपत्ता असलेल्या चालकाचा देखील पाणबुडीच्या साह्याने शोध घेतला जात आहे. ‘अर्थ’कारणासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपला हा अपघात झाल्याची चर्चा सुरू आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी पोलिसांकडून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग सुरू असताना डंपर हिवरगाव पावसा शिवारात सुरू असलेल्या निळवंडे कालव्यात कोसळून तिघा मजुरांचा त्याखाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: येथील टाटा लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ते ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी व्हँकुव्हर या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीमध्ये असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील शहरात या परिषदेत सहभागी होणार आहे. आदित्य याला एमडीआरटी होण्यासाठी वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारी महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कार चालकाविरोधात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल अजित येणारे (२७) व स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या संदर्भात मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी किरण श्रीमंदिलकर फरार झाला आहे. श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : सरकार आल्यानंतर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये साडेचारशे रुपयांना गॅस सिलेंडर देणार असल्याची जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत केली आहे. मग महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केलं? असा सवाल भाजपाला उपस्थित मराठा विरुद्ध ओबीसी आवाज जाणीवपूर्वक घडवून आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले नागपूरमध्ये प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, वाद निर्माण करून सरकारला जनतेचे मूळ प्रश्न विचलित करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये गरीब ही जात असल्याचे सांगितले. तेव्हाच कळलं की, देशातील आरक्षण व्यवस्था संपवण्यास सुरुवात झाली आहे. या देशात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्गच सरकारला ठेवायचे आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी या वाळू धोरणाला सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांकडून तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगावमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याची वाळू तस्करी गावकऱ्यांनी समोर आणली आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज लूट सुरू आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्रित येत ठेकेदार संदीप भाऊसाहेब घुगे (रा. मालुंजे) यांच्याविरुद्ध तक्रार केली असून या वाळू उत्खननाचा पंचनामादेखील करण्यात आला आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांच्या समक्ष वाळू उपशाचा पंचनामा केला आहे. यात २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप भाऊसाहेब घुगे यांनी गावातील लोकांना हाताशी धरून नदीपात्रातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अधिकार नसताना देखील निष्काळजीपणा करत अपूर्णपणे गर्भपात करून गर्भ पिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक ठेवून अयोग्य पद्धतीने उपचार करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा कारणावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून डॉ. गोडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 304 अ तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 5 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातील शेणीत येथील…
