Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 18 व्या वर्षाचा शुभारंभ रविवारी (दिनांक 23 जुलै) सकाळी 9 वाजता पिंपळगाव कोंझिंरा येथील कनकेश्वर डोंगर येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात व अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून व जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे 18 वे वर्षे आहे. आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवरती बिजारोपण, वृक्षारोपण करण्यात आले आहे. यातून तालुक्यात हिरवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. बदल्यांच्या आदेशात सरकारच्या नेहमीच रडारवर असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांचा देखील या बदल्यांमध्ये समावेश आहे. एकाच महिन्यात त्यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. अठरा वर्षात 22 बदल्यांचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला. मराठी भाषा विभागाचे सचिव असलेले मुंढे आता मंत्रालयातच कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विभागांचे सचिव असतील. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने नव्याने काढलेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये अनेक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आल्यापासून अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी विमानतळासंदर्भात आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात आज अनेक प्रश्न उपस्थित केले. चार महिन्यांपूर्वी नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊनही नाईट लँडिंग का सुरू झाली नाही? https://twitter.com/bb_thorat/status/1682328034324656128?s=19 टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला नेमकी कधी गती येणार? रोजगार देताना स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी दिली पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विमानतळावर असलेल्या समस्यांबाबत कबुली शिर्डी विमानतळाचे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – अतिक्रमणासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये कारवाईचा अहवाल न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. अहमदनगरच्या शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी या ग्रामपंचायतीकडे बांधकाम व्यावसायिकांच्या परवान याबाबत माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने अनेक बांधकाम व्यावसायिकांना कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली होती, त्यामुळे विनापरवाना अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिकारीच्या शोधात पहाटेच्यावेळी रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृद्धावर हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी संगमनेर तालुक्यात समोर आला. बिबट्याच्या आल्यात जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावाच्या शिवारात असलेल्या शिंगोरे वस्ती जवळ शुक्रवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून चाललेल्या पोपट उर्फ रामा कारभारी पर्बत (वय 65 वर्ष) यांच्यावर बिबट्याने अनपेक्षित रित्या हल्ला चढविला. हल्लेखोर बिबट्याने त्यांना जवळच्या झुडपात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र पर्बत यांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या दोघांनी त्यांच्या मदतीसाठी येत बिबट्याला हुसकावून लावले. ऐनवेळी उद्भवलेल्या प्रसंगात हे दोघे वृद्धाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातासंबंधी धक्कादायक माहिती संसदेत लेखी उत्तरात दिली आहे. हे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत असल्याचे ते म्हणाले. भारतात दर तासाला सरासरी अठरा लोकांचा मृत्यू होत आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, 2021 मध्ये देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधून मिळालेल्या माहितीनुसार देशात दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला जीव गमविला आहे. भारतातील रस्ते अपघाताच्या अहवालानुसार हा…

Read More

चौकशी करून कंपन्यांना समज देण्याचं कृषिमंत्री मुंडेंकडून आश्वासन! महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून खते खरेदी करताना शेतकऱ्यांना खतांसोबत जोडखते खरेदी करावी लागतात. त्यामुळे खाजगी, सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोडखते सक्तीने दिली जात आहेत. शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. राज्यात जोडखतांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना मुख्य खताबरोबर जोडखते घ्यावी लागत आहेत. मात्र सरकारी, खाजगी आणि सहकारी कंपन्या सक्तीने दुकानदारांना युरिया बरोबर इतर खरेदी खते खरेदी करायला सांगतात व सदर खते दुकानदारही शेतकरी बांधवांना देतो. त्यामुळे ही खतांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – 54 वर्षानंतरही निळवंडे धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. याशिवाय या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकारही गोठविले आहेत. वर्षानुवर्षाला काढलेल्या या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश घुगे व न्यायाधीश खोब्रागडे यांनी हे आदेश दिले. नोटीसला उत्तर देण्यासाठी 28 जुलै ही अंतिम तारीख असून त्यानंतर 3 ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार असल्याची माहिती कालवा कृती समितीचे वकील अँड. अजित काळे यांनी दिली उत्तर नगर जिल्ह्यातील आवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व कालवे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार च्या झालेल्या अपघातात श्रीरामपूर मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. श्रीरामपूर रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे एम.एच. १४ ई.वाय- ७१९८ या क्रमांकाच्या स्विफ्ट कार मधून चालक हर्षल भोसले यांच्यासोबत इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने येत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारला अपघात झाला. किलोमीटर क्रमांक ५६० वर आल्यानंतर या कारने तीन-चार पलट्या खात कार दुभाजकाच्या…

Read More

लाच लुचपतची कारवाई; एसीबीचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांची माहिती या संदर्भात सन 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अधिकार नसताना महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारास परवानगी देऊन, बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या फेरफार नोंदी व दस्तावेज करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूलच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 32 खासगी अशा एकूण 38 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

Read More