Author: अनंत पांगारकर

विखे गटाची सत्ता उलथून सभासदांनी केले परिवर्तन महाराष्ट्र संवाद न्यूज  राहाता – राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी (ता २८मे) रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या वीस आरोपींना सोमवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जवळपास तीन आठवडे आरोपी तुरुंगामध्ये होते. शहरातील जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर धारदार शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात जोर्वे येथील आठ जणांना बेदम मारहाण करत जखमी करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या घटनेचे पडसाद तालुक्यात व शहरात देखील उमटले. घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या नर्सने जवळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला आहे. ऋतिका पांडुरंग आंधळे (वय 19 वर्ष, मूळ रा. गिरेवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. नर्सिंग वसतिगृह, जिल्हा रुग्णालय अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नर्सचे नाव आहे. या नर्सच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये असलेल्या नर्सिंग वसतिगृहामध्ये रूम नंबर 77 मध्ये ऋतिका आंधळे राहत होत्या. त्यांनी शनिवारी रात्री वसतीगृहातील आपल्या खोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजता सुमारास हा प्रकार समोर आला. आंधळे यांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. पुण्यात देखील तिने क्लास लावला होता. त्यानंतर ती गावी जाऊन सेल्फ स्टडी करत होती. तसेच तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. त्यामुळे पुण्यातील एका ॲकेडमीच्यावतीने तिचा सत्कार समारंभ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो. ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले. अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे‌‌. ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | रविवार विशेष आजच्या या तरूणी तरी कुठे आहेत हो… ध्यानावर  कायम पडीक पडलेल्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर घालून टिचभर कपडे मोकाट फिरती गावभर दाखवून… अंगप्रदर्शन  सेल्फी काढती ढीगभर काँलेजच्या नावाखाली पोरांसोबत जाती डेटवर  उघड्या बोडक्या होऊन हुदंडती खुशाल बीचवर कुणाचं काही ऐकत नाही जुमानत नाही आईबापाला म्हणे आमची लाईफ स्टाईल  तुमी मधे पडता कशाला ! क्षणभंगुर सुखासाठी पोरी लागती कुणाच्याही नादाला आंधळ्या प्रेमापायी बावळ्या मुकतात कायमच्या जीवाला बाँयफ्रेंन्ड, गर्लफ्रेंड ट्रेडच्या नावाखाली चाललाय धिंगाणा जाणती असो वा अजाणती बळी पडत आहे भोगांना… संस्कार, संस्कृती विसरून चालल्या वाहवत विनाशाला सगळ्याचं नाही पण बहुतेक लागल्यात वाईट वळणाला … दोष नाही एकट्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर – भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या वेगाने वाढत आहे. जगात या क्रमवारीत भारताने ब्रिटनला मागे टाकले असून आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे स्व. सुधाकर पुंजाजी भगत यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी (ता.१७) चला अर्थ साक्षर होऊयात या अभियानांतर्गत, ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर कडलग बोलत होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रा. राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांच्या ‘माय बापाची कहाणी’ या संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितिन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीने सार्‍यांनाच अचंबित करून सोडलं आहे. राज्याच्या सत्तास्थानी कोण बसेल, मुख्यमंत्री कोण होईल आणि ज्याने राज्यातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला त्याच्यावर पश्‍चातापाची कशी वेळ येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. करावे तसे.. हा वाक्प्रचार या ठिकाणी चपलख बसतो आहे. हा नियतीचा खेळ आहे. नियत बदलली की जसे करावे तसे भरावे. राज्य भाजपच्या आजवर स्वत:ला सर्वेसर्वा समजणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या हे संकट ओढावलं आहे. सत्तेच्या सार्‍या नाड्या आपल्या हाती असताना आज पश्‍चाताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. सत्तेसाठी जे पेरलं तेच उगवू लागल्याचं हे त्यांच्यापुढचं चित्र आहे.…

Read More

पीडित मुलगी गर्भवती; अकोले तालुक्यातील घटना जर आईच्या घरी गेली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दूमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवारी (ता.१८ जुन) सायंकाळी ५ वाजता श्रीरामपुर येथील फातेमा हाऊसिंग सोसायटीत आयोजित केले असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे. मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांचे अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले.

Read More