Author: अनंत पांगारकर

आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले. तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार…

Read More

तिरुवनंतपुरम : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी या चित्रपटाच्या विरोधात तब्बल सहा याचिका दाखल केल्याने न्यायालयाने तातडीने निर्णय देण्यास स्पष्ट नकार दिला. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापासून ते शशी थरूरपर्यंत अनेक दिग्गजांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या सहा याचिका काल केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आता न्यायमूर्ती एन. नागेश आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठात सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च…

Read More

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उडालेला गदारोळ थांबण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अशा आशयाचा ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अवघ्या सोळा वर्षाच्या बालिकेसोबत बालविवाह करणाऱ्या नवरोबासह त्याचे आई-वडील आणि सासूवर संगमनेरच्या तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात कनोली गावचे ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे (वय 38 वर्षे, रा. हनुमंतगाव, ता. राहता जि. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात कनोली येथील नवरदेव त्याचे आई-वडील आणि त्याच्या सासू विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन मे 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कनोली येथे आरोपींच्या घरी बालविवाहाचा प्रकार समोर आला. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत संगमनेर व अकोले तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना विविध महसूली, शैक्षणिक दाखल्यांचे तत्परतेने वितरण करण्यात येणार आहे. यासाठी आज शुक्रवारपासून (ता. ५ मे १५ जून २०२३) विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेचा लाभ घेण्याचे आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने “जत्रा शासकीय योजनांची – सर्वसामान्यांच्या विकासाची” या उपक्रमांचे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र विनासायास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा (सेतू)…

Read More

अहमदनगर, (महाराष्ट्र संवाद न्यूज) जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक ६ मे रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता ही बैठक पार पडणार आहे. खरीप हंगाम सन २०२३- २४ साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांची कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) जलजीवन आणि जीवन प्राधिकरणांच्या योजनांची काम ज्या ठिकाणी सुरू आहे ती बंद होता कामा नये. राजकारणासाठी काही लोक ही कामे बंद पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये असा सल्ला राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीमध्ये टंचाई व खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. यावेळी थोरात बोलत होते. तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देताना थोरात म्हणाले, राजकारणासाठी कोणीही जनतेच्या भावनांशी खेळू नये.…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यावर्षी कमी व उशिरा होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जशी मागणी येईल त्याप्रमाणे तातडीने पाण्याचे टँकर आणि रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी प्रशासनास केल्या. आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरात प्रांताधिकारी कार्यालयामध्ये टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वर कमाईला चटावलेल्या आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून सतरा हजाराची लाच घेणाऱ्या विकास सुरेश जोंधळे या अभियंत्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बघणारा संगमनेर नगर परिषदेतील विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याला बुधवारी सतरा हजाराची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने पकडले होते. जोंधळे यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी बाजू मांडली. न्यायाधीश मनाठकर यांनी लाचखोर आरोपी जोंधळे याला दोन…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी सतरा हजार रुपयांची लाचखोरी करणारा संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंता बुधवारी नाशिक ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडला. विकास सुरेश जोंधळे (वय 28 वर्ष, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे गरिबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी लाचखोरी करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचखोरीचे ग्रहण लागलेल्या संगमनेरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तलाठ्यासह एक खासगी इसम छत्तीस हजार रुपयांची लाचखोरी करताना ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यापाठोपाठ बुधवारी दुसरी घटना समोर आली आहे. किरकोळ कामासाठीदेखील नागरिकांना अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री दोन वाजता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More