Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी एका तक्रार अर्जाद्वारे शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलिसांकडे केली आहे. काळे यांच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने राऊत यांच्यावर शहर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रार अर्जाच्या माध्यमातून त्यांनी राऊत यांच्या विरोधात खोटी तक्रार करणे, खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणे, बदनामी करणे, राजकीय पक्षांमध्ये द्वेष भावना, तेढ व वैमनस्य निर्माण निर्माण करण्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : राज्‍यस्‍तरीय महसूल परिषदेच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील विकासाच्‍या दिशा स्‍पष्‍ट झाल्‍या असून, भविष्‍यात महसूल विभागाच्‍या माध्‍यमातून नवीन तंत्रज्ञानाच्‍या सहकार्याने सर्व सुविधा ऑनलाईन पध्‍दतीने भर देण्‍यात येणार आहे. यात प्रामुख्‍याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी ‘अर्ज एक दाखले अनेक’ ही योजना सुरु करण्‍याचा निर्धार करण्‍यात आला असून, पानंद आणि शिव रस्‍त्‍यांबाबत कालबध्‍द कार्यक्रमाची अंमबजावणी करण्‍याचा निर्णय झाला असल्‍याची माहीती महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोणी येथील महसूल विभागाच्‍या दोन दिवसीय परिषदेचा समारोप झाल्‍यानंतर मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधून परिषदेत झालेल्‍या निर्णयांची माहीती माध्‍यमांना दिली. विखे पाटील म्‍हणाले, जमीनींच्‍या मोजणीसाठी आता रोव्‍हर पध्‍दतीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसूली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’वर राबवाव्यात. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर इतिहासातील थोर पुरुष नायक हे युवकांसाठी सदैव आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पेमगिरी गडावर गेले असून अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आहे. या भूमीत होत असलेला अमृतवाहिनीचा हा मेधा महोत्सव उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवणारा असल्याचे गौरवउद्गार पानिपतकार व आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले . अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने मेधा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा. व्ही. बी. धुमाळ,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र सरकारने ही मान्यता द्यायला पाच महिने उशीर केला त्यामुळे लाभ क्षेत्रातील कामे रखडली, उशिरा का होईना सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सरकारचे आभार. मात्र आता तरी निळवंड्याच्या विरोधकांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या वाटेत विघ्न आणू नये, असे म्हणत आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे स्वागत केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गतिमान झालेले निळवंडे कालव्यांचे काम शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर खोळंबले होते. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यात अडवून वाहन चालकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यास अकोले पोलिसांना यश आले असून पकडलेले सर्व आरोपी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे असल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते, लखन डेरासिंग माचरेकर, प्रेम विजय वाल्हेकर, प्रशांत मंगलदास गिर्हे (सर्व रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या लुटमार करण्याऱ्या टोळीतील आरोपींची नांवे आहेत. यातील अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. १६ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समशेरपुर येथून ठाणगांवकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी: महसूल विभाग काळानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन करतांना जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, खासदार सदाशिव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेरमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करावे, बसस्थानकास हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नांव देण्यास यावे, अशी मागणी संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. काळे यांनी शिंदे यांची भेट घेत दिलेल्या या निवेदनाबद्दल मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने संगमनेर येथे परिवहन विभागाचे कार्यालय होणे गरजेचे असून सध्या आम्हाला परिवहन विभागाच्या कामांसाठी श्रीरामपूर येथे ५५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. तसेच श्रीरामपूर आरटीओ येथे कामाचा व्याप वाढलेला असल्यामुळे बऱ्याच वेळेस संगमनेर येथील नागरिकांची कामे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत रात्री १० वाजल्यानंतरदेखील लाऊडस्पीकर वाजवत कार्यक्रम चालु ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी १० जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुसानिमीत्त १६ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यानंतर १७ फेब्रुवारीच्या रात्री पावणेदोन वाजेपर्यत सय्यदबाबा चौकामध्ये कव्वालीचा कार्यक्रम सुरू होता. वास्तविक रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर वाजवू नये, तसेच कार्यक्रम ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांनादेखील या आदेशाचे उल्लंघन झाल्याने याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचीन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमजद इब्राहीम पठाण उर्फ अन्नु व त्यांचे सहकारी, अफताप अमीनोद्दीन शेख, मुदस्सरअली मुस्ताकअली जहागीरदार, अन्सार मकबुल सय्यद,…

Read More

अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क यापूर्वी असलेली दक्षिण-उत्तर अशी शहरप्रमुखांची विभागणी आता पक्षाच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून विद्यमान दक्षिणचे शहराध्यक्ष प्रसाद पवार यांना पदावरून मुक्त करण्यात आले असून शहराचे संपूर्ण जबाबदारी अमर कतारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आठव्यांदा संधी मिळालेले कतारी शिवसेनेचे नवे शहर प्रमुख असतील. पवार यांच्यासह तालुकाप्रमुख असलेले जनार्दन आहेर यांना देखील पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागेवर नवे तालुका प्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे आणि संजय फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फड यांना पठार भागाचे तालुकाप्रमुख म्हणून तर हासे यांना उर्वरित संपूर्ण तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबईतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाकडून…

Read More