Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवरांसह देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, समाजसेवा, विज्ञान आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पद्म पुरस्कार सोहळा विशेष ठरला आहे, कारण राज्यातील चार व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई खेडकर आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. कृषी क्षेत्रात कापूस…

Read More

नाशिक | २५ जानेवारी २०२६ पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर, आता नाशिकमध्ये शेतकरी संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी नाशिकमधून सुमारे ५५,००० शेतकऱ्यांचा भव्य ‘लाँग मार्च’ मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या महामोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, इंद्रजित गावीत आणि उमेश देशमुख यांसारखे दिग्गज नेते करत आहेत. हा लाँग मार्च मुख्यत्वे दोन मोठ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आला…

Read More

नाशिक | प्रतिनिधी कर्करोगाचा धोका सातत्याने वाढत असतानाच, या आजाराच्या उपचारांमधील सर्वात मोठा अडसर हा निदानासाठी लागणारा खर्च ठरत आहे.भारतात कर्करोगाची लक्षणे असलेल्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांकडे प्राथमिक तपासण्यांसाठी आवश्यक पैसे नसतात, तर महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून सुमारे ५५ ते ६० टक्के रुग्ण केवळ आर्थिक कारणांमुळे निदानास विलंब करतात. परिणामी, अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये कर्करोग निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आता मोफत करण्यात आल्या आहेत. कर्करोग सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या पूर्णतः मोफत केल्या जात असून,या सुविधेचा लाभ आतापर्यंत…

Read More

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत असलेल्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सत्तेचा किती हव्यास आहे, याचं चित्र दिवसगणिक पहायला मिळत आहे. विशेषत: सत्ताधार्‍यांना पडलेला हव्यास इतका विकृत आहे, की कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या पक्षाकडेच एकवटली पाहिजे, असा पण या पक्षांचा दिसतो आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्या पक्षांची आहे. यात कोणाही राजकीय पक्षाची मागे राहायची तयारी नाही. जो तो सत्तेसाठी हपापलेला आहे. हे हपापलेपण पाहून मतदारही आपण यांना निवडून देऊन गैर तर केलं नाही ना, असा प्रश्‍न स्वत:लाच विचारू लागला आहे. विशेषत: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या हव्यासाची विकृती अधिकच डोकं वर काढू लागली आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय…

Read More

आजचे राशीभविष्य:  मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. आर्थिक बाबतीत थोडे नियोजन आवश्यक आहे, विनाकारण खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ –  आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा. दुपारनंतर काही चांगली बातमी मिळण्याची…

Read More

नाशिक – नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात चॉपरने हल्ला करून एका तरुणाचा हात निकामी केल्याच्या गंभीर प्रकरणात, संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी हा निर्णय दिला असून, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. घटनेचा पार्श्वभूमी आणि पोलिसांचा आरोप संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १०२५/२०२५ नुसार, निशांत उर्फ बंटी नंदू आरगडे आणि वैष्णव आव्हाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडिताच्या हातावर चॉपरने जोरदार वार केला होता, ज्यामध्ये पीडिताने आपल्या डाव्या हाताचा पंजा गमावला.…

Read More

संगमनेर: पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची वज्रमुठ बांधली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली हजेरी महत्त्वाची ठरली. हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कोते बोलत होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.  नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने…

Read More