Author: अनंत पांगारकर

श्रीरामपूर –  अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात…

Read More

मुंबई (वडाळा): मुंबईतील वडाळा पूर्व येथील आनंदवाडी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईक असलेल्या चार महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या वृद्धेच्या मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्योत्सना राजेंद्र जाधव (४३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ किशोर दादू वाघमारे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतजमिनीशी संबंधित वाद न्यायालयात सुरू आहे. तसेच मुंबईतील वडाळा येथील घराशी संबंधितही हा वाद…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाच्या मदतीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ६ हजार किलो गोमांस, जिवंत जनावरे आणि दोन पिकअप वाहनांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या न्यू सेवा सॉ मिलच्या समोरील एका…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानात आरोपी पप्पू ऊर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीची ३ फूट लांबीची ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख आणि संगमनेरमधील साळी समाजाचे मार्गदर्शक, जेष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पासाहेब मुरलीधर केसेकर (वय ६१) यांचे शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  एक निष्ठावान शिवसैनिक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आप्पाशेठ हक्काचा आधार होते. त्यामुळे अनेकांचे हॉटेल ओंकारेश्वर हे न्याय मागण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. सर्व समाज घटकातील नागरिकांशी त्यांचा मोठा स्नेह होता. धर्मवीर, हिंदू हृदय सम्राट अशा पदव्या त्यांना संगमनेरकरांनी दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने केवळ साळी समाजाच्याच नव्हे तर संगमनेर करांचे मोठे नुकसान…

Read More

दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा ठरेल, मात्र ही धावपळ फलदायी असेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे किंवा नवीन जबाबदारीचे संकेत मिळत आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण घरातील सुशोभीकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी असलेले जुने मतभेद आज संपुष्टात येतील. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. वृषभ – व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. प्रलंबित देणी परत मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; विशेषतः पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ असून घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज मनामध्ये थोडी अस्वस्थता जाणवू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ व अंमली द्रव्य कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साद शेख हा सध्या संगमनेर येथील भारतनगर भागात असल्याची खात्री झाली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने भारतनगर परिसरात सापळा रचला आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (वय ७२, रा. ठाणे पच्छिम, मूळ रा. कोल्हेवाडी, संगमनेर) यांचे कोल्हेवाडी येथे घर आहे. दि. १३ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. कोल्हे कुटुंबीय घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराभोवतीच्या तार कंपाउंडची तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घराच्या बाजूच्या पोर्चमधील खिडकीचे गज कशाच्या तरी साहाय्याने तोडून व वाकवून खिडकीवाटे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत.  संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  साकूरमधील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले आणि साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल, असा शब्दही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने केलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) प्रत्यक्ष पाहणी केली.  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या नक्षत्र घनवन उद्यान व तुलसी वृंदावनाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः महर्षि पराषर व…

Read More