Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि सिगारेटची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (Team-RGSS) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू नियंत्रण कायदा (COTPA) २००३ नुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सक्त मनाई असतानाही संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी शाळांच्या अगदी जवळ पानटपऱ्या आणि दुकानांमधून सर्रास गुटखा व सिगारेट विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून, हा…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांच्या पथकाने ही…

Read More

मुंबई (वडाळा) – शेतजमीन आणि घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सुमन रामदास वाघमारे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये मूळ गावी असलेली शेतजमीन आणि मुंबईतील घरावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या किशोर दादू वाघमारे (वय ४६) आणि कैलास बाबूराव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – बोटा येथील स्व. शेखर शेळके यांनी क्रिकेट खेळाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे योगदान आजही पठार भागात स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी ‘स्व. शेखर शेळके चषक २०२६’ आयोजित करून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. घारगाव येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख…

Read More

दैनिक राशीभविष्य:  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची प्रशंसा होईल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयमाने काम घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. शक्य असल्यास आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम सहज पूर्ण होईल. व्यापारात…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर –  संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल. आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण…

Read More

अहिल्यानगर –  श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. हिंगणी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही चोरी सराईत गुन्हेगार भास्कर पथवे याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या राहत्या परिसरात सलग चार दिवस शोध घेतला, मात्र…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – आमदार अमोल  खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा संगमनेर तालुक्यातील सुमारे १०,००० विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ यांनी कामगार रुग्णालयाबाबत शब्द दिला होता. हा शब्द पाळत त्यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे ठोस मांडणी केली होती. या प्रयत्नांना यश आले असून, नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ च्या आदेशानुसार संगमनेरमध्ये सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सध्या सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या हिंदू समाजातील महिलांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून वाण खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेनरोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मालदाड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागात दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेऊ लागले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…

Read More

विशेष लेख | प्रणित सहाणे अहमदनगर जिल्ह्याच्या, विशेषतः संगमनेर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात ‘कॉम्रेड’ ही पदवी केवळ नावासमोर लावण्यासाठी नसून ती कृतीतून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पंढरीनाथ बाबुराव सहाणे, ज्यांना अवघा जिल्हा ‘सहाणे मास्तर’ म्हणून मोठ्या आदराने ओळखतो. आज त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांनी कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितांसाठी दिलेला लढा पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. मास्तरांचा जीवनप्रवास हा निव्वळ राजकारण नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध पुकारलेला एक अखंड एल्गार होता. संघर्षाची मुळे आणि वैचारिक जडणघडण- १२ जानेवारी १९२९ रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ऐतिहासिक गावात मास्तरांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत…

Read More