Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता, तर त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबीय शेतीत व्यस्त होते. याच वेळी गवतात लपून बसलेल्या एका बिबट्याने संधी साधून सिद्धेशवर झेप घेतली. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने या निष्पाप बाळाच्या मानेला धरून त्याला शेतात ओढत…
राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कारभाराची वर्षपूर्तीचे बरेच नगारे वाजले. वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने विविध वर्तमानपत्र आणि त्यांच्यासाठी काम करणार्या कथित सर्वेक्षण संस्थांच्या निकालांनी या सरकारची भलतीच भलामण केली आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार कसं यशस्वी ठरलंय, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना जणू आपण राज्यातल्या तेरा कोटी जनतेचाच हवाला देत असल्याचा आवही या सर्वेक्षणांनी आणला. हव्यासापोटी आपण किती लाचार बनतो आहोत, याचं भान न राहिल्याचं हे उत्तम उदाहरण. गोदी म्हणून इतरांना हसण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावल्याचं हे चित्र. आता तर आपण दिल्लीतील लाचारांहून भाट झालोत की काय, असं वाटावं, अशी ही सर्वेक्षणाची मांडणी म्हणावी लागेल. आपल्यासोबत कोणी तरी आहे, याचा आनंद…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. कामात गती मिळेल आणि अपेक्षेनुसार प्रगती कराल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आर्थिक बाजू बळकट होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. धार्मिक कार्यात मन रमवा. मिथुन : नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यांचा भविष्यात फायदा होईल. मित्रांशी संवाद वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवासाचे योग आहेत. कर्क : घरातील वातावरण शांत आणि समाधानी राहील. आई-वडिलांकडून विशेष प्रेम व सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो, पण तो व्यवस्थापित कराल. सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी उत्तम दिवस…
नागपूर – नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा तिढा आता विकोपाला गेला असून, हा प्रस्तावित मार्ग संगमनेरवरून अचानक शिर्डी मार्गे वळवल्याने आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता आणि ‘महारेल’ विभागाने सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण या मार्गासाठी सर्वेक्षणही पूर्ण केले. तांबे यांनी सभागृहात सांगितले की, या मार्गासाठी राज्य शासनाने 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले असून त्यावर 316 कोटी रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे कोणत्या उद्देशाने वळवला गेला, असा थेट सवाल आमदार तांबे यांनी…
संगमनेर – शेतकरी कष्ट करून अन्न पिकवतो आणि जवान ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव मोठे करावे, सैनिकांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१३ डिसेंबर) संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलात निवड झालेल्या ६१ तरुण-तरुणींचा आणि त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ…
संगमनेर – सुकेवाडी (संगमनेर) येथील गांजा तस्करी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या याला अखेर संगमनेर पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या सुकेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या नारकोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. टास्क फोर्सच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आल्याने स्थानिक पोलिसांचे अपयश समोर आले होते. शहरालगत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा ४५६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान मुख्य आरोपी असलेला तुषार पडवळ उर्फ…
मेष: आजचा दिवस जोमाने भरलेला असेल. कोणतेही नवे काम सुरू करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी काळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थैर्य आणि धीर अत्यंत महत्त्वाचे ठरतील. पैसा गुंतवण्यासाठी चांगला दिवस आहे. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. मिथुन: प्रवास होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय राहाल आणि नवीन लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कर्क: तुमच्या मनात आज शांतता अनुभवायला मिळेल. तुमच्या जुन्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल.…
नागपूर: नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे नियोजन सिन्नर-संगमनेर-जुन्नर मार्गेच करावे, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीचे पर्यटन महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे तांबे यांनी सभागृहात सांगितले. विधान परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना आमदार तांबे यांनी महाराजांच्या जन्मभूमीचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे आणि त्यांचे जन्मस्थळ जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आहे, असे तांबे म्हणाले. सध्या नियोजित असलेला नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड मार्गे पुण्याला जोडला जाणार आहे. या नैसर्गिक मार्गामुळे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, तसेच…
संगमनेर – संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटलाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहे. ०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस…
संगमनेर- संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे आठ लाख रुपये किमतीचा ३२.८४५ किलोग्रॅम वजनाचा सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सातत्याने दोन दिवसात गांजा संदर्भात कारवाई झाल्याने शहरातील अवैध व्यवसायाचे मोठे नेटवर्क समोर येत आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. संगमनेर शहरात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक पोलिसांनी केलेली ही महत्त्वाची आणि धडक कारवाई मानली जात आहे. गुरुवारी नाशिकच्या नार्कोटिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या सुकेवाडीमध्ये अशाच प्रकारे मध्यरात्रीपासून छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये सव्वा कोटी रुपयांचा ४५६ किलो गांजा जप्त…
