Author: अनंत पांगारकर
मेष – प्रेम जीवनात उत्साह राहील. व्यवसायातून पैसे मिळायला थोडा उशीर होऊ शकतो, त्यामुळे काळजी करू नका. कुटुंबात छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो, पण संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. मुलांच्या हट्टीपणामुळे थोडी चिंता वाटू शकते. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांच्या मदतीने अभ्यासात यश मिळेल. नवीन व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आज आपले भाग्य ९०% सोबत आहे. शिव चालीसाचे पठण करणे लाभदायक ठरेल. कामाच्या बाबतीत मात्र आज कंटाळा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगल्या बातम्या घेऊन येण्याची शक्यता आहे, विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत शुभ संकेत आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्णत्वास जाईल. द्विग्रह…
देशाच्या प्रशासनात कधीकाळी सनदी अधिकारी असणार्या काहींना वाटतं देश आपल्यामुळेच चालतो. डोक्यात बसलेल्या या अहंकारापुढे त्यांना जग ठेंगणं वाटतं. आपण म्हणू ती पूर्वदिशा म्हणून ते कोणालाही जुमानत नाहीत. कोणालाही अति महत्व देतात आणि मनात येईल त्याची रेवडी उडवतात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मोहिमेला गैर ठरवणार्या 272 सनदींना असंच झालंय. म्हातारचळ यावा तसा दावा करत त्यांनी राहुल गांधी यांना देशाविरोधी ठरवून टाकलं आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या निवडणूक आयोगाने केलेल्या ‘कसरती’ उघड्या पडू लागल्यावर आणि मोदी सरकार यात गुंतत असल्याचं पाहून या 272 जणांना उपरती झाली आणि त्यांनी राहुल गांधींनाच दोष देण्याची करामत केली. अर्थात ती त्यांच्या…
मेष रास – आज तुमचा मन हलके आणि उत्साही राहील. नवीन कामे सुरू करण्याचा उत्साह असेल आणि छोट्या-छोट्या समस्या तुम्ही सहज हाताळू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल. वृषभ रास – आज तुमचे मन शांत राहील आणि कामे हळू-हळू पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल. व्यवसायात संयम बाळगण्याची गरज आहे. ज्यादा काम केल्यास फायदा होईल, पण खर्चही वाढू शकतो. मिथुन रास – आज तुमच्या खाजगी जीवनातील समस्या संपतील. तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी डील करू शकता. बाजारपेठेत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी वाद संभवतो, त्यामुळे…
संगमनेर – मागील एका वर्षापासून शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडली असून, दडपशाहीसह अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याची गंभीर चिंता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी (२२ नोव्हेंबर) मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी के. के. थोरात, शांताराम कढणे, विवेक कासार, सादिक तांबोळी, सौरभ कासार, शोभाताई पवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. संगमनेर शहर आणि तालुक्याने शिक्षण, सहकार आणि अर्थव्यवस्था या क्षेत्रांत केलेल्या विकासामुळे राज्याच्या अग्रगण्य शहरांमध्ये आपले स्थान निर्माण केले. विकासाच्या दीर्घ परंपरेचा उल्लेख करत माजी मंत्री थोरात यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्यापासून दुर्गाताई तांबे…
संगमनेर (प्रतिनिधी): थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा २० वर्षांचा ‘आनंद मेळावा’ उद्या, (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता सायखिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या आनंद मेळाव्यास महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य समन्वयक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी लावलेल्या या अभियानाच्या रोपट्यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती रुजली आणि वाढली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…
संगमनेर – संगमनेर तालुक्यात वडगावपान येथील एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दिनांक २१ नोव्हेंबर) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचे नाव नितीन विलास वाघ (वय २९, रा. वडगावपान, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे आहे. विजेचा धक्का लागल्याने त्याला उपचाराकरिता तातडीने संगमनेर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर यांनी या घटनेबाबत पोलिसांना डेथ मेमो प्राप्त करून माहिती दिली आहे. या घटनेची नोंद संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. १५६/२०२५ बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली…
संगमनेर: राज्यभरात एकीचा नारा देणारी महायुती संगमनेरमध्ये फुटली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांनी नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवले आहे यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर माजी नगरसेविका सुषमा तवरेज यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत वाढविली आहे. संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक सदस्यपदासाठी 36 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल केलेल्या एकूण 43 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या सर्वांचे नगराध्यक्ष अथवा नगरसेवक होण्याचे स्वप्न मावळले आहे. नगराध्यक्षपदासाठी माघार घेणाऱ्यांमध्ये दोन…
मेष रास – आज तुमचा मन हलके आणि उत्साही राहील. नवीन कामे सुरू करण्याचा उत्साह असेल आणि छोट्या-छोट्या समस्या तुम्ही सहज हाताळू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल. वृषभ रास – आज तुमचे मन शांत राहील आणि कामे हळू-हळू पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल. व्यवसायात संयम बाळगण्याची गरज आहे. ज्यादा काम केल्यास फायदा होईल, पण खर्चही वाढू शकतो. मिथुन रास – आज तुमच्या खाजगी जीवनातील समस्या संपतील. तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी डील करू शकता. बाजारपेठेत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी वाद संभवतो, त्यामुळे…
संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची आणखी एक मोठी आणि निर्णायक मोहीम यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल 3,09,000 रुपये किमतीचे ‘मेफेड्रोन’ (Mephredone – M.D.) हे उच्चभ्रू ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत नाशिक येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरलेली 40 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. MH 15 FF 9630) ही आलिशान गाडीही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे 43 लाख रुपये इतकी आहे. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात असलेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीनुसार, ही…
अहिल्यानगर: मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी पारनेर पंचायत समितीचे उपअभियंता आणि दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. यापैकी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे हे पसार झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या फर्मला पारनेर येथील ‘मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजने’ अंतर्गत कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करणे, देयके तयार करणे आणि मंजुरीसाठी पाठवणे ही जबाबदारी उपअभियंता अजय जगदाळे, पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी…
