Author: अनंत पांगारकर
मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. कामाचा दबाव राहील, पण कमाईच्या संधी मिळतील. सरकारी कामात थोडी अडचण येऊ शकते. वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. धनलाभाचे योग आहेत, काम वेळेत पूर्ण होईल. मिथुन : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उदास होण्याचे टाळा, आत्मसन्मानाला प्रोत्साहन मिळेल. कर्क : प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. विरोधकांवर मात कराल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे (प्रमोशन/वेतनवाढ). कन्या : जुनी येणी वसूल होतील, आर्थिक लाभ होतील.…
संगमनेर – अनंत पांगारकर प्रचंड राजकीय उत्सुकता निर्माण केलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नगराध्यक्षपदासाठी तब्बल १६ महिलांनी २० उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणाला मोठे वळण दिले आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ‘एकत्रित लढण्या’चे संकेत देऊनही स्थानिक महायुतीत मात्र ऐनवेळी मोठा गोंधळ उडाला आणि भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही घटकपक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले, यामुळे महायुतीचा ‘बेबनाव’ उघड झाला आहे. आमदार खताळ यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या घराणेशाहीमुळे महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले आहे. ही नाराजी समाज माध्यमातून व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीकडून सुकाणू…
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे. तर दुसरीकडे, महायुतीनेही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या संगमनेर सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ (सुवर्णा विठ्ठल राहणे) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. यामुळे संगमनेरमधील…
मेष (Aries): व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे आणि व्यवसायानिमित्त प्रवास संभवतो, ज्यामुळे भविष्यात फायदा मिळेल. कमाई आणि खर्चाचा ताळमेळ साधल्यास आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील, जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याची आणि त्यांच्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याशी बोलताना किंवा वाद घालताना जपून बोला, अन्यथा प्रकरण कायदेशीर वळण घेऊ शकते. वृषभ (Taurus): कामाच्या ठिकाणी शत्रूंवर मात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमचा सामाजिक संपर्क वाढेल, ज्यामुळे मित्र संख्या वाढेल. कौटुंबिक व्यवसायासाठी भावाची मदत घ्यावी लागेल. संध्याकाळी कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे; बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. घरात काही वस्तू खरेदी…
संगमनेर – युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन साळवे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून माघार घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेल्या साळवे यांनी ‘कौटुंबिक कारणांमुळे’ पक्षाच्या कामासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत आपला राजीनामा तालुका, जिल्हाप्रमुखांकडे सुपूर्द केला असला तरी ते पक्षांतर्गत कुरघोडीचे बळी ठरले असल्याची चर्चा आहे. अधिक माहितीनुसार, साळवे हे युवासेनेमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. पक्षाच्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, त्यांनी पक्षात अनेक चढ-उतार पाहिले असून विविध विषयांवर न्याय मिळवण्यासाठी ते अनेकदा इतरांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलनांत सहभागी झाले आहेत. याच संघर्षातून त्यांच्यावर काही खटलेसुद्धा दाखल झाले आहेत.…
संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता अधिक स्पष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी (दुपारी तीन वाजेपर्यंत) असल्याने आता अवघे काही तास उरले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी सात अर्ज दाखल झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, रविवार सुट्टीचा दिवस असूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, आणि या दिवशी १३ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.…
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आचारसंहितेच्या काळात दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिलीप चिलप यांनी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता तक्रार दाखल केली. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने बोगस फेसबुक अकाउंट वापरून ‘Sangamner Politics’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार खताळ यांचा फोटो संपादित करून, बनावट आणि खोटी माहिती असलेली पोस्ट प्रसारित केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही पोस्ट पूर्णपणे चुकीची असून ती केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. या पोस्टद्वारे आमदारांची बदनामी करणे, तसेच निवडणुकीच्या आचारसंहितेचे…
प्रचंड बोलबाला झालेली बिहारची निवडणूक एकदाची पार पडली. अपेक्षेप्रमाणे भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूला तिथे अनपेक्षित असं यश मिळालं. या दोन्ही पक्षांचं अभिनंदन. मात्र या विजयानंतरही मतचोरीचे प्रश्न तसेच आहेत. नव्हे ते अधिक गहिरे बनलेत. देशासह बिहारमध्ये झालेली मतचोरीे दुर्लक्षित करता येणार नाही. कालच्या बिहार निवडणुकीत सुमारे अडीच कोटी मतांची बेरीजच जुळता जुळत नाहीए. 6 आक्टोबरच्या दिवशी निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा या राज्यात 7 कोटी 23 लाख मतदारांची नोंद स्वत: ज्ञानेशकुमार गुप्तांनी जाहीर केली होती. तर अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडल्याच्या 11 नोव्हेंबरला आयोगाच्या वेबसाईटवर 7 कोटी 45 लाख मतदारांनी मतदान केल्याचं म्हटलं. मतदार संख्येतच 22 लाखांची तफावत. मतदानाची…
संगमनेर – म्हाळुंगी पुलाच्या कामातील अडथळ्यांवरून सुरू झालेल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवून १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित बातमीत सूर्यवंशी यांनी तांबे यांच्यावर काँग्रेस पुरस्कृत आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले, असा गंभीर आरोप केला होता. या संपूर्ण आरोपाला पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा ठरवत आमदार तांबे यांनी सूर्यवंशी यांना चार दिवसांत आरोप सिद्ध करण्याची किंवा बिनशर्त माफी मागण्याची मुदत दिली आहे. अॅड. अमोल कारभारी घुले यांच्यामार्फत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तांबे यांनी स्पष्ट केले आहे की,…
मेष (Aries) आजचा दिवस चांगला आहे, पण तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामासाठी छोटी यात्रा करू शकता आणि त्यात यश मिळेल. जर तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आज एखाद्या अधिकाऱ्याशी तुमची थोडी वादावादी होऊ शकते, त्यामुळे शांतता ठेवणे गरजेचे आहे. शुभ उपाय म्हणून गाईंना गूळ खायला द्यावा. वृषभ (Taurus) आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सर्व बाजूंनी मनःस्थिती चांगली ठेवणाऱ्या घटना आज घडतील. मनासारख्या अनेक ठरलेल्या गोष्टी आज पूर्ण होऊ शकतात. स्वतःला सर्जनशील (Creative) कामात गुंतवून घ्या. मिथुन (Gemini) आजच्या दिवशी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तसेच,…
