Author: अनंत पांगारकर

संगमनेर | प्रतिनिधी आगामी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजीत तांबे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. संगमनेरचा निवडणुकीचा जाहीरनामा आता जनतेच्या थेट सहभागातून तयार होणार आहे. ‘संगमनेर २.०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा ठरवला जाणार आहे. गंगामाई घाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार तांबे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा! आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी संगमनेर शहराच्या आजवरच्या प्रगतीचे पुनरावलोकन केले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभाग या तत्त्वांवर आदर्श विकासाचे मॉडेल उभे केले. आज संगमनेरमध्ये निळवंडे…

Read More

अमरावती/मुंबई: जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी विखे पाटलांवर घणाघाती हल्लाबोल करत त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलून लावण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर जो कोणी विखे पाटलांचे वाहन फोडेल, त्याला प्रहारकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा कडू यांनी केली आहे. “नाव कृष्णाचे आणि कृत्य कंसाचे! अशा मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडेन!” असं देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. काय होते विखे पाटलांचे वक्तव्य? – काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

Read More

संगमनेर: काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये नशेचे इंजेक्शन्स (ड्रग्स) विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता शहरातील ‘कॅफे सेंटर’च्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अकोले नाका परिसरातील एका संकुलातील ‘कॅफे’वर छापा टाकून ही गंभीर बाब समोर आणली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अकोले नाका परिसरातील संकुलातील कॅफेमध्ये मुला-मुलींना अश्लील कृत्यांसाठी जागा दिली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. ०८) दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास ही धडक…

Read More

मेष (Aries) – दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कामात सुधारणा होईल. जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता. वृषभ (Taurus) – सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात विस्तार होण्याचे संकेत आहेत. बोलण्यात लवचिकता ठेवा. मिथुन (Gemini) – तुमचे बोलणे आणि मन वळवण्याचे कौशल्य वाढेल. नवीन विचारांमुळे यश मिळू शकते. पारंपरिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. कर्क (Cancer) – दुपारी भावनिक संतुलन आणि संवेदनशीलतेवर लक्ष केंद्रित होईल. चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी मन तयार राहील. सिंह (Leo) – तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. कामातील मंद गतीमुळे थोडा मानसिक ताण येऊ शकतो. कन्या (Virgo) – सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा.…

Read More

देशातील सामाजित वातावरण चांगलं आहे, असं म्हणण्याचं धाडस कोणीही करू शकत नाही. धर्माच्या आड अधार्मिक कृत्य करणार्‍यांवर कोणताच अंकुश नसल्याने धर्माचा आधार घेत अनेकजण देशातील सलोखा बिघडवण्याचा उघड प्रयत्न करत आहेत. अशांवर प्रशासनाचं काहीही नियंत्रण नाही. उलट पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसारखे नेते अशांना फॉलो करत असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. यामुळे देशात हिंदू वगळता इतर धर्मांतील व्यक्तींना सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांना सत्ताधार्‍यांची फूस असल्याने यंत्रणाही जणू त्यांच्यासाठीच राबत असल्याचं चित्र आजकाल आहे. यामुळे देशातील सलोख्याचं काय होईल, याची चिंता आहे. हे केवळ हिंदूतेरांबाबत घडतं असं नाही. जे सत्ताधारी भाजपच्या धर्मिक भूमिकेला विरोध करतात…

Read More

मेष (Aries) आजचा दिवस उत्तम असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना फायदा होऊ शकतो किंवा पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लागू शकते. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. वृषभ (Taurus) आज घाईने निर्णय घेणे टाळा. नवीन कामासाठी लगेच पुढे जाऊ नका. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सारासार विचार करूनच पुढे जाणे हितकारक ठरेल आणि कुटुंबाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini) व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक पातळी संतुलित राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer) आज मानसिक…

Read More

संगमनेर – एकेकाळी ‘सुसंस्कृत व वैभवशाली शहर’ म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेले अवैध धंदे आणि ड्रग्जसह अमली पदार्थांची तस्करी यामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, पालक आणि महिलांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. शहराच्या शांतता व सुरक्षिततेला या घटनांमुळे मोठा धक्का बसला आहे. शांतता, सुरक्षितता, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण केंद्र, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि समृद्ध बाजारपेठ यांमुळे संगमनेरने राज्यात आपला लौकिक निर्माण केला होता. मात्र, मागील एक वर्षापासून तालुक्यात दडपशाही आणि दहशत वाढत असल्याची भावना निर्माण झाली असून, शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मुंगसे यांनी चिंता व्यक्त…

Read More

संगमनेर: रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना काही व्यक्तींनी भररस्त्यात गाडी आडवी लावून पोलिसांना शिवीगाळ करत मोठा गोंधळ घातल्याची गंभीर घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुखरे आणि कॉन्स्टेबल आगलावे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर बाळू गायकवाड याला पोलीस ठाण्यात घेऊन येत होते. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. काही जणांनी त्यांची गाडी रस्त्यात आडवी उभी केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी संबंधित वाहनचालकांना गाडी बाजूला घेण्याची…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये राहत मिळेल आणि मन प्रसन्न राहील. सकारात्मक ऊर्जेमुळे मोठे काम सुरू करण्याचे साहस कराल. व्यापार आणि व्यवसायात लाभाची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आणि तुम्ही सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. वृषभ – आजचा दिवस अनेक रंग दाखवणारा आणि मिश्र फल देणारा असू शकतो. परिस्थिती वेगाने बदलू शकते, त्यामुळे शांत मनाने आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे फायदेशीर राहील. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यात चढ-उतार जाणवू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आर्थिक बाबींना बळ मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत स्पष्टता ठेवा. मिथुन…

Read More

संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच अनेक पाळीव जनावरे बिबट्यांचे बळी ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने व ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या भागातील प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे एकही जीव या प्राणघातक समस्येमुळे गमावता कामा नये. वन विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आणि योग्य कारवाई करावी, असा आग्रही सूर निवेदनातून…

Read More