Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड बुधवारी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. येथे झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला बुधवारी (ता. 16 ऑगस्ट) 2400 ते 2801 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती देण्यात आली. असे मिळाले कांद्याला भाव: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. बुधवारी बाजार समितीत कांदा आणि डाळिंबाला चांगला भाव मिळाला असून एक नंबर कांद्यास 2400 ते 2800 रुपये, दोन नंबर कांद्यास 1900 ते 2300 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1600 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 175 ते…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – काकडी विमानतळाजवळील मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अखेर मुहूर्त लाभला आहे. गुरुवारी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत जबाबदारीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. नियोजन पूर्व बैठक: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी मंगळवारी नियोजन बैठक झाली. हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने स्वातंत्र्यदिनी सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांच्या गोमांसासह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून कारवाई दरम्यान कत्तलखाना चालक आणि वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान यातील तिघा आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन: संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्याचा प्रश्न सरकारपर्यत जावूनही कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या सरकार आणि प्रशासनाला येथील कत्तलखाने बंद करण्यात आले आहे. येथील कत्तलखाने राजरोसपणे स्वातंत्र्यदिनाच्या दिवसासह धार्मिक सणाच्यादिवशीदेखील सुरुच असतात. त्यांच्यासाठीचा प्रशासनाचा बंदी आदेश कागदावरच असतो. कोणत्याही आदेशाला आणि कारवाईला न जुमानणाऱ्या कत्तलखाना चालकांकडून बंदी असलेल्या गोवंश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सुरु आहे. यानिमीत्ताने देशभरात सरकारी विभागात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस ठाण्यात दंत चिकीत्सक डॉ. किशोर पाटील यांच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी व एक्स रे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात राबविला उपक्रम: शहर पोलीस स्टेशन व हेल्पिंग हँण्डस् यूथ ऑर्गनायझेशनच्या सहकार्यातून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पारशी नववर्षदिनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनापासून केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. सरकारने नेहरू स्मारकाचे नाव बदलले असून यापुढे नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी) म्हटले जाईल. आधीच्या नावातून नेहरूंचे नाव हटविण्यात आले आहे. जून महिन्यात झाला होता निर्णय: स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. जून महिन्यात नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी (पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी PMML) असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नृपेंद मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी स्वातंत्र्यदिनी शुभारंभ करण्यात आला. हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा शहरामध्ये कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी होती ती आज या निमित्ताने…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर / नाशिक – राज्य पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारदरा वर्षा महोत्सवात परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शवत चांगला प्रतिसाद दिला. भंडारदरा आणि परिसराच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडलेल्या या व्यावसायिकांनी या परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. वर्षा महोत्सव: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाची माहिती परराज्यातील पर्यटकांना व्हावी आणि तिथल्या सर्व लोककला आणि खाद्य संस्कृतीचा आनंद भारतभरातील पर्यटकांना घेता यावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने 12 ऑगस्टपासून वर्षा महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. परराज्यातून आले पर्यटन व्यावसायिक; या महोत्सवाचा एक भाग म्हणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नवीन नगर रोड परिसरात नगर परिषदेने लावलेल्या काही वृक्षांची अज्ञात व्यक्तीकडून कत्तल केल्याचे समोर आले आहे. चांगली बहरू लागलेले ही झाडे रात्रीतून तोडण्यात आली असून तोडलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा देखील गायब करण्यात आला असून केवळ खोड शिल्लक राहिले आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. हरित संगमनेरला विघ्न संतोषींकडून अडथळा: ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नगर रोड परिसरात बस स्थानक चौकापासून ते खाली इथापे हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. झाडांच्या संरक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आला आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने यावेळी देखील येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब (ठाकरे) पक्षाचाच खासदार निवडून जाईल. त्यामुळे मविआ आणि India आघाडीला धोका पोहोचेल असे वक्तव्य कोणी करू नये, असे शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या बैठकीमुळे निर्माण झाला गोंधळ: दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच गद्दार खासदारांबद्दल बोलताना शिवसेना (ठाकरे) पक्षाचीदेखील खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कतारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या पोलीस फौज फाट्यासह सोमवारी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने कारवाई चुकविण्यासाठी वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने अनेक वाहनांवर कारवाई केली. पीआय स्वतः रस्त्यावर वाहन चालकांना शिस्त लागणार का? गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरांमध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर देखील शहरात बहुतांशी ठिकाणी वाहतुकीची कोंडी जाणवत आहे. त्यातच विशिष्ट वाहन चालकांमुळे अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अचानकपणे कारवायांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे या कारवाया वेळी ते स्वतः रस्त्यावर उतरत असल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडताना…
