Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. 3 जुलै, 2023 रोजी दुपारी १-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – जैन परंपरेचा चातुर्मास रविवारपासून (दि. ०२ जुलै) सुरु होत असुन संगमनेर येथील जैन स्थानकमध्ये प्रखर व्याख्याता पू. श्री. विश्‍वदर्शनाजी म.सा. व विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. या साध्वींचा चातुर्मास होणार आहे, अशी माहिती संगमनेर संघाचे संघपती शिरीष दर्डा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजकुमार पारख यांनी दिली. चातुर्मास निमित्त साध्वींजींचा मंगल प्रवेश गुरुवारी (दि. २९ जुन) संगमनेर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेपासून शोभा यात्रेने जैन स्थानक, सुयोग सोसायटीमध्ये सकाळी साडेआठ वाजता आगमन होणार आहे. मंगल प्रवेश निमित्त सकल जैन समाजाला गौतम प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मंगल प्रवेश व शोभा यात्रेमध्ये सकल जैन समाज व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्‍याय देण्‍याची केंद्र शासनाची भूमिका असून सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करणार असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्‍याय व सबलीकरण राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लोणी येथे केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून दिव्‍यांग व्‍यक्तिंना साधन साहित्‍याचे मोफत वितरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, सहायक आयुक्त राधाकिसन देवडे, डॉ. अभिजित दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्‍पू बनसोडे आदी उपस्थित होते. आठवले म्‍हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या “बेहत्तर भारत की बुनियाद” या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. आमदार थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी अहमदनगरमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी या सर्वांशी संवाद साधत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती जाणून घेतली. या बैठकीत युवक काँग्रेसच्या होऊ घातलेल्या उपक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन देखील करण्यात आले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रदेश सचिव दीप चव्हाण, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष स्मितल वाबळे आदी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – केंद्र सरकारच्या एडीप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे मंगळवारी (२७ जून) लोणी येथे मोफत वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सकाळी साडेदहा वाजता शिवकांता लॉन्स, लोणी येथे हा कार्यक्रम होणार आहे. अहमदनगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र सरकारच्या एडिप योजनेच्या माध्यमातून जिल्हयात १२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी, तर कधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्यावतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन ‍दिवसापासून शांताबाईंची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – शेवगाव येथील आडत व्यापारी व त्यांच्या भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, खुनासह जबरी चोरी, चोरीच्या उद्देशाने खून करणे अशा स्वरूपाच्या सात गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. खेडकर टाबर चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेवगावमधील मारवाड गल्लीतील आडत व्यापारी गोपीकिसन गंगाबिसन बलदवा यांच्यासह त्यांच्या भावजयी पुष्पा हरिकिसन बलदवा यांची हत्या करून 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरुन नेण्यात आली होती. यासंदर्भात सुनिता गोपीकिसन बलदवा यांनी दिलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्याने राज्यात पसरू पाहणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाची वाट धरली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी पक्षप्रवेशाचा मुहूर्त निवडला आहे. भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे या भागात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर येथील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. यावेळी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी मध्यरात्री सालीमठ यांच्या मोबाईलवर आलेल्या आपत्कालीन फोनची दखल घेत पुढील सूत्रे फिरल्याने हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली. आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. शनिवारी (दि. 24 जून) अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी…

Read More