Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी निघणाऱ्या भव्य मोर्चाला प्रशासनाने अटी शर्तींवर अखेरच्या क्षणी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चाचा परवानगीचा अडथळा दूर झाला आहे. मोर्चातील नागरिकांचा मोठा अभूतपूर्व सहभागाचे शक्यता लक्षात घेता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. पोलीस प्रशासनाने मोठ्या लवाजम्यात मिरवणूक मार्गावरून रूट मार्च काढला होता. महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीमध्ये साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या, शहर व तालुक्यात होणारी गोवंश कत्तल लव्ह जिहादसारख्या घटना किरकोळ वादातून ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शालेय विद्यार्थी युवक यांना होणारी मारहाण यामुळे शहरात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बेलगाम सुरू असलेली प्रवरा नदी पात्रातील वाळू तस्करी पुन्हा एकदा जीवावर बेतली आहे. प्रवरा नदीपात्रात सोमवारी तीन विद्यार्थी बुडाले. पाण्यात बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले तर उर्वरित दोघांचे मृतदेह शोध मोहिमेनंतर नदीपात्रात आढळून आले. सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुदैवाने आसपास असलेल्या नागरिकांमुळे यातील एकाला वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. निलेश माधव अस्वले (वय 18 वर्ष, रा. नवलेवाडी, अकोले जि. अहमदनगर) व अमोल उत्तम घाणे (वय 18 वर्षे, रा. धुमाळवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी मृत झालेल्या दोघा विद्यार्थी मित्रांची नावे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी सातत्याने काम करणारे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले. निळवंडेचे पाणी संगमनेर तालुक्यात येतेय, हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले आहे. पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत संगमनेर तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी या धरणाचे व कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, विश्वास मुर्तडक,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील सायखिंडी येथील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. मनोहर बाबा विद्यालयात सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संदीप सातपुते होते. यावेळी वनरक्षक जयश्री श्रीमती पवळे यांचे प्रमुख व्याख्यान झाले, वृक्षारोपण व संवर्धन केल्यास आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल, कोरोना महामारीत लोकांना प्राणवायूचे महत्व समजले. झाडे जगली तरच माणसं जगतील म्हणून झाडांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक सातपुते यांनी शाळेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळाला असल्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर वनरक्षक गिताराम गोर्डे, अशोक चारुडे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे गट) विना परवानगी केलेल्या आंदोलनाबद्दल आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे. या संदर्भात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव मथुरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. रविवारी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख रमेश काळे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकासमोर आंदोलन करत राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावरून स्थानिक शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. त्यातून शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी शहरातील विविध भागातील नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. अद्यापही काही आरोपींचा शोध सुरू असून यापुढे कोणत्याही गुन्ह्यातील ‘गुन्हेगाराला’ पाठीशी घातले जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. या उपविभागात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आता तडीपार होतील किंवा तुरुंगात असतील, अशा पद्धतीने पोलीस कारवाई होणार असल्याचे संकेत संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहे. वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर रविवारी प्रथमत:च पत्रकार परिषद घेत आपल्या कामाची पद्धत विशद केली. नागपूर, भुसावळ येथे केलेल्या लक्षवेधी कामासंदर्भात माहिती देताना त्यांनी या संगमनेर उपविभागात देखील काही वेगळे प्रयोग करून गुन्हेगारीचा बिमोड…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने वाईट वक्तव्य करत थुंकणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संगमनेरच्या बस स्थानक चौकात शिवसेनेने (शिंदे गट) निषेध करत आंदोलन केले. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख विठ्ठल ढगे, माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे, अमोल मतकर, बाळासाहेब राऊत, वाहतूक सेना तालुका प्रमुख अरुण उदमले, वैद्यकीय सहाय्यता कक्ष तालुका प्रमुख महेश उदमले, मागासवर्गीय सेल तालुका प्रमुख राहुल पवार, सरपंच सुदाम खैरे, अभिषेक गायकवाड, उपशहर प्रमुख अमोल रनाते, बाळासाहेब व्यवहारे,…
समाज माध्यमांवर जातीवाचक मेसेज अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मंगळवारी संगमनेरमध्ये निघणाऱ्या भगवा मोर्चाला पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही ही परवानगी ऐनवेळी दिली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर संयोजकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. दरम्यान संगमनेर बंदचे कोणतेही नियोजन नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. बंदची अशी कोणतीही सक्ती करता येणार नसल्याने व्यावसायिकांनी मंगळवारी आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी माहिती संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या आणि शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज / रविवार विशेष प्रवीण पुरो, मुंबई नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा घाट आणि त्यानुशंगाने विरोधी पक्षांच्या बहिष्काराचं वास्तव लक्षात घेतलं तर हा सारा खेळ एका निर्लज्ज राजाच्या अहंकारासाठी खेळला जात असल्याचं स्पष्ट आहे. इतकं सारं होत असताना राजाची निबृध्द प्रजा या सार्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असेल तर देशाला कोणीही वाचवू शकणार नाही. पहिल्या क्रमांकाच्या लोकशाहीचा डंका पिटणार्या केंद्र सरकारच्या बेगड्या लोकशाहीचं सर्वत्र वस्त्रहरण होत असताना राजा स्वत:चीच पाठ थोपटून घेतो तेव्हा तो पुरता निर्लज्ज झाला असंच मानलं जातं. प्रगल्भ लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या भारताचं जगभर पुरतं हसं होऊनही ५६ इंची छाती काढत राजा स्वत:चच खरं करतो तेव्हा या राजाला…
