Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी लोकसभा निवडणुकीत यावेळी निवडून येणारा खासदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातदेखील शिवगर्जना अभियानास सुरुवात करण्यात आली. संगमनेरमध्ये व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात बुधवारी झालेल्या शिवगर्जना अभियानावेळी घोलप बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विनोद कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आदी पदाधिकाऱ्यांसह संगमनेर-अकोलेतील शिवसैनिक, गटप्रमुख,…
महाराष्ट्र संवाद न्यूज आई आणि तिच्या दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील मन्याळे येथे समोर आला आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे अकोले तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. सुनिता अनिल जाधव (वय 48 वर्ष), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22 वर्ष) आणि शितल अनिल जाधव (वय 19 वर्ष) अशी दुर्दैवी माय लेकींची नावे आहे. सुनिता जाधव यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मुली प्राजक्ता आणि शितल या दोघी बहिणींनी गावातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिघी मायलेकींनी आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेव्हा विच्छेदनानंतर तसेच पोलीस तपासात ही माहिती पुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचे उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील. मात्र माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी १०० वर्षे दिली मात्र, त्याच पक्षाने मला स्पष्टीकरणाची एकही संधी न देता हाकललं असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत निवडणूक जिंकणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षांतर्गत घडलेल्या काही गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले, माझ्यासोबत काय घडलं ती खूप मोठी गोष्ट आहे. ती मी नंतर कधीतरी सांगेन. मला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली कारण माझ्यापुढे काही पर्यायच उरला नव्हता. नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. मला अपेक्षा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी ऊर्जा धोरण 2020 अंतर्गत राबवलेल्या निविदा प्रक्रियेतून संगमनेर तालुक्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी 10 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कृषी ऊर्जा धोरण 2020 अंतर्गत तालुक्यातील ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी तळेगाव दिघे, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपारणे, निंबाळे व रहिमपूर या गावांकरता 33 kV, 5 MVA अतिरिक्त पावर ट्रान्सफार्मरसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी 10 कोटी 40 लाख रुपयांचे निधीसाठी पाठपुरावा केला होता. नुकताच हा निधी मंजूर झाला आहे. नव्याने मंजूर झालेल्या या निधीतून अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर मिळणार असल्याने या गावांना जोडणाऱ्या गावांसाठी वीजपुरवठा सुरळीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज महिला आणि युवतींचे सबलीकरण, आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधित ८ ते १० मार्च दरम्यान महिलांच्या क्रिकेट कुस्ती बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धांचा थरार रंगणार असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमत:च या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि युवतींसाठी टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती आणि रस्सीखेच स्पर्धा संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात होणार आहेत. थोरात म्हणाल्या, आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्त संगमनेरमध्ये दरवर्षी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असं वक्तव्य केलं. राणे बुधवारी (१ मार्च) सभागृहामध्ये राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना बोलत होते. खासदार राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत…
महाराष्ट्र संवाद न्यूज पोलीस अधिकारी असूनही भर रस्त्यात गुंडा सारखे वर्तन करत महिलेला मारहाण करण्याचे प्रकरण सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस दलात फेरबदल करताना या निरीक्षकाची उचल बांगडी केली होती. मात्र आता काही तासातच पोलीस निरीक्षक गोकावे याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबन केल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी सुपा टोल नाक्यावर पोलीस निरीक्षक गोकावे यांनी एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर मधील दैनिक ‘नगर सह्याद्री’ने या प्रकरणाला वाचा फोडली होती. राज्यभर या प्रकरणाने खळबळ उडाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील ब्ल्यू रिबन पुरस्काराने महाबळेश्वरमध्ये गौरविण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या बँको या संस्थेच्यावतीने पुरस्कार वितरण प्रसंगी बँकोचे राष्ट्रीय अध्यक्ष जोतींद्रभाई मेहता यांचे हस्ते हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी स्वीकारला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून बँकेने सातत्याने ऑडिटचा ‘अ’ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रभारी राज संपुष्टात आणत जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. नव्याने नियुक्ती मिळाल्याने आता अधिकाऱ्यांना प्रत्येक पोलिस ठाण्यात कामातून गुन्हेगारी संपुष्टात आणावी लागणार आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत. अनेक वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचल बांगडी झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवे पोलीस अधिकारी काम करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नियुक्त देण्यात आल्या आहे. मध्यावधी, प्रशासकीय, विनंती आणि नव्याने नेमणुका करण्यासंदर्भातील बदल्यांचा यात समावेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पुण्यामध्ये गौरव करण्यात आला आहे. थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान पर्यावरणाच्या दृष्टीने लोक चळवळ ठरले असून या अभियानाची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली आहे. पुण्याच्या हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्यावतीने “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार” दिले जात असून नुकताच हा सोहळा पुण्यामध्ये पार पडला आहे. पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध चौदा संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन…
