Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर शहर व तालुका परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, या मागणी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संगमनेर शहर व तालुका परिसरात अवैध धंदे, जुगार, मटका, वाळू तस्करी व अवैध गुटखा, बनावट दारू विक्री असे सर्वच प्रकारचे विविध अवैध व्यवसाय सर्रासपणे दिवसा-ढवळ्या सुरू आहे. सदर अवैध व्यवसायांमुळे अनेक गोरगरिबांची घरे उध्वस्त झालेली आहेत. तरी हे व्यवसाय २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही वेळी रस्त्यावर उतरून लोकहितासाठी आंदोलन करील असा इशारा निवेदनाद्वारे मनसे शहर उपाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संगमनेर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राजापूरचे (कोकण) पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदारांनी पत्रकारांचे निवेदन स्वीकारले. राज्यभरात पत्रकारांवर सुरू असणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, मयत शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी व हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अन्यथा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष शेखर पानसरे तसेच आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, संदीप इटप, श्याम तिवारी, निलिमा घाडगे, गोरक्ष मदने, सचिन जंत्रे, अमोल मतकर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर दिवंगत उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येत्या रविवारी (ता. १२) लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्यावतीने संगमनेरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होवून विजेत्या ठरणार्या स्पर्धकांना मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सफायरचे अध्यक्ष उमेश कासट यांनी केले आहे. येत्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मालपाणी लॉन्स येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे मुला-मुलींचे वेगळे गट करण्यात आले आहेत. त्यापुढील वयाच्या स्पर्धकांसाठी खुला गट ठेवण्यात आला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या अकोले येथील मूळ रहिवासी असलेल्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या रहस्यमय खुनाच्या तपासात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला १३ फेब्रुवारीपर्यंत तर दुसऱ्या आरोपीला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली असून संकेत नवले याचा खून करण्याचे कारण मात्र सांगण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. तर या प्रकरणी पोलिसांचा अजून एका तिसऱ्या आरोपीवर संशय असल्याची माहिती मिळाली आहे. हा तिसरा आरोपी या खुनामागील मास्टरमाईंड आहे की अन्य कोणी याबाबत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पोलिसांच्या ११२ क्रमांकावरील फोन खणाणला. आणि समोरिल व्यक्तीने पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे असे सांगितले आणि फोन बंद केला. खुनासारखी गंभीर बाब असल्याने पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोलीस पथक पाठविले. पोलीस घटनास्थळी गेले आणि वेगळीच बाब समोर आली. फोन करणारी व्यक्ती तडीपार इसम निघाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. रविवारी आश्वी टाऊन बीटचे काम बघणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रणधीर यांना ११२ क्रमांकावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीने हॅलो म्हणताच पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे. असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत अकरा बेरोजगारांना प्रत्येकी पाच लाख रुपये गंडा घालणारी टोळी शिर्डी पोलिसांनी पकडली आहे. यात एका छायाचित्रकाराचा देखील समावेश आहे. शिर्डी विमानतळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकरा बेरोजगारांकडून आरोपींनी आत्तापर्यंत पंचावन्न लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. १४ सप्टेंबरला बीड येथील चंद्रकांत विठ्ठलराव जाधवराव यांनी यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात जाधवराव यांनी म्हटले की माझ्या मुलाचं एकूण अकरा मुलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन शिर्डी विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले…
माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांच्या तक्रारीनंतर आणखी एका चौकशीचे शुक्लकाष्ट; आता कोणावर होणार कारवाई
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ मंदिरालगत म्हाळूंगी नदीवरील खचलेल्या पुलाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता याप्रकरणी कोणावर कारवाई होते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हाळूंगी नदीला आलेल्या पुरामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणारा पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून परिसरातील नागरिकांना ये जा करता येत नाही. या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत असतानाच माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस जावेद जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करत मानवनिर्मित चुकांमुळे पूल खचला असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. जहागीरदार यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्कारांची घोषणा संगमनेर इनरव्हील क्लबने केली आहे. पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बेचाळीस शिक्षक, पाच शाळा आणि आदिवासी सांदण चळवळीची निवड केल्याची माहिती इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रकल्पप्रमुख सुनिता कोडे व शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी दिली. रविवारी (ता. १२ फेब्रुवारी) संगमनेरमधील मालपाणी लॉन्स येथे दुपारी २ वाजता माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी. जी. शेखर, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने तसेच नव्याने हा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असल्याने अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेली जात असलेली तब्बल पंचेचाळीस जिवंत गोवंश जनावरे राहुरी पोलिसांनी पकडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे संगमनेरची बदकीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोतून या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला होता. त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी…
