Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजीनगर समाज कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल ७४६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याने, मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हे कृत्य बेकायदा आणि अन्यायकारक आहे. या निधी वळवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिष्यवृत्ती कशाला द्यायची? वसतिगृहे कशाला चालवायची?” असा संतप्त सवाल शिरसाट यांनी केला. “पूर्वीही माझ्या खात्यातून सात हजार कोटी रुपये वळवले गेले, याची मला कल्पनाही नव्हती. जर समाज कल्याण खात्याची गरज नसेल, किंवा निधीच द्यायचा नसेल, तर ते खाते बंद केले तरी चालेल,” असे शिरसाट म्हणाले. असा निधी वळवणे नियमबाह्य आहे. पण अर्थ खात्याला जे वाटते तेच खरे, त्यांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर “चाळीस वर्षे अविश्रांत काम करून दुष्काळग्रस्तांसाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. आपल्या तालुक्याला आणि सहकारी संस्थांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. मात्र, जाती-धर्माच्या नावाखाली पसरवलेल्या खोट्या भूलथापांना बळी पडून जनतेने हे कवच गमावले आहे. आता तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासोबतच तालुक्याला जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर खुर्द येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक आणि कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, संपतराव डोंगरे, पांडुरंग पा. घुले, आर. बी. रहाणे, अर्चना बालोडे, नवनिर्वाचित…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुण्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने एका २८ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला, मात्र पाच वर्षांनंतर तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखतून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले त्यानंतर दोघांनी नोंदणी विवाह केला होता. मात्र, त्याने हा विवाह कुटुंबीय आणि मित्रपरिवारापासून लपवून ठेवला. तसेच, समाजातही तिला पत्नी म्हणून ओळख दिली नाही. आरोपीने ‘घरी लग्नाबद्दल सांगतो’ असा विश्वास तरुणीला दिला आणि तिच्याकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवरील अनेक वर्षांपासूनच्या कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी आता हटवल्या जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे, जमिनीची खरेदी-विक्री करणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. यासाठी राज्य सरकारने ‘जिवंत ७/१२ मोहीम टप्पा २’ सुरू करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारा उताऱ्यांवरील अपाक शेरा, तगाई कर्ज, बंडींग बोजे, नजर गहाण, सावकारी कर्ज, भूसंपादन निवाडा, बिनशेती आदेश आणि पोटखराब क्षेत्रासारख्या नोंदी आता इतिहासजमा होणार आहेत. यासोबतच महिला वारसांची नोंद, जमिनीचे मालकी हक्क, भोगवट्याचा प्रकार आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंदणी देखील अधिकार अभिलेखात…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हवामान खात्याने एक महत्त्वपूर्ण अलर्ट दिला आहे. येत्या ३ ते ६ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ३ ते ६ मे २०२५ हे तीन दिवस जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाचे महत्वाचे सूचना आणि मार्गदर्शन: * मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा जोरदार वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ…
संगमनेर – प्रतिनिधी केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे आमदार अमोल खताळ यांनी स्वागत केले आहे. या संदर्भात बोलताना आमदार खताळ म्हणाले, “जातनिहाय जनगणना हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून होता. मात्र, त्यांचे सरकार सत्तेवर असताना गेल्या ६५ वर्षांत त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजात अनेक जाती-जमातींमध्ये गैरसमज आणि संघर्ष निर्माण झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल.” काँग्रेसच्या धोरणांमुळे अनेक जातींमध्ये भेदभाव वाढला आणि अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. आता या जनगणनेमुळे आरक्षणासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य तोडगा निघेल. या जनगणनेमुळे सामाजिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाचे पाणी डोळ्यासमोरून वाहत असतानाही या पाण्यापासून संगमनेर तालुक्याला वारंवार डावलले जात असल्याने शेतकऱ्यांचा संयम आता तुटला आहे. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कालव्यावरील शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याचे पाईप मध्यरात्री तोडल्याने संतप्त सुमारे ५०० शेतकऱ्यांनी एकत्र येत शिरापूर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. रात्रभर चाललेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी जलसंपदा विभाग आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण आणि त्याचे डावे-उजवे कालवे पूर्ण झाले. या कालव्यांचे तीन आवर्तन झाले असले तरी, प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकताच ‘श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा’ आयोजित करून समाजातील कष्टकरी परंतु आपल्या मुलांना यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या पालकांना आदराने गौरवले. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमात भावुक आणि गौरवास्पद वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे गव्हर्नर रो. सुरेश साबू उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यशस्वी उद्योजक राजेश मालपाणी, असिस्टंट गव्हर्नर रो. विनोद पटणी, डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी रो. राजेंद्र अग्रवाल आणि पब्लिक इमेज डायरेक्टर रो. रविंद्र बनकर उपस्थित होते. या कार्यक्रमात पाच कुटुंबांचा सन्मान करण्यात आला, ज्यांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या मुलांना विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी बनवले.…
अहिल्यानगर, दि. २: अकोले तालुक्यातील राजूर गावात सध्या कावीळ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून, राजूर येथे दिनांक ३ मे ते ६ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली प्रसिद्ध पीर चाँद शाहवली उरुस यात्रा तात्काळ स्थगित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही उरुस यात्रा पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यातील देशमुख मळा (धांदरफळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी जिजाई कुलदीप देशमुख हिने लक्षवेध फाउंडेशनच्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. जिजाईने या परीक्षेत जिल्ह्यात दुसरा, तर संपूर्ण राज्यात सातवा क्रमांक पटकावून शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात जिजाईला शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी रामदास हराळ, शिक्षण सहसंचालक रमाकांत काटमोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अनिल काळे, विशाल शितोळे, रमेश कासार, ओंकार खुंटाळे, राहुल जगदाळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका वृषाली कडलग, नरेंद्र राठोड, प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे,…
