Author: Annant Ppangarkar
शुक्रवार, २६ जुलै तीन अंगणवाड्यांच्या बांधकामाचे पैसे ठेकेदाराला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून २६ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे व सहाय्यक लेखा अधिकारी रवींद्र लाडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून या दोघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम त्यांनी ग्रामपंचायतीच्या…
शुक्रवार, २६ जुलै दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल. दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार…
प्रवीण पुरो | मुंबई गुरुवारी (ता. २५ जुलै) पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असताना हवामान विभागानेही धडकी भरणारी शक्यता वर्तवली आहे. २६ जुलैची आठवण करून देणारा पाऊस आज होत आहे. शुक्रवारी (ता. २६ जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे. या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तेव्हा संपूर्ण मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी जलमय…
गुरुवार, २५ जुलै ५५ वर्षीय आजोबासह तीन वर्षीय नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संगमनेरमध्ये सातत्याने शेततळ्यात बुडून मृत्यूच्या वेदनादायक घटना समोर येत आहे. शिवाजी आत्याबा सोनवणे व समर्थ नितीन सोनवणे असे शेतात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आजोबा-नातवाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते. याच दरम्यान त्यांच्या घरी पाहुणे आले म्हणून त्यांचा तीन वर्षाचा नातू समर्थ हा त्यांना बोलाविण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता. तेथे खेळता खेळता तो शेततळ्यात पडला. पाठोपाठ त्याला वाचविण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही पाण्याने पूर्ण भरलेल्या…
गुरुवार, २५ जुलै अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) भ्रष्टाचाराविरोधात कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या खासदार निलेश लंके यांच्या उपोषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळे चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे. लंके यांनी एलसीबी विरोधात आवाज उठविल्याने नगर पोलिसांचे विविध कारनामे समोर आले होते. एलसीबीतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारवाईवर तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या खासदार निलेश लंके यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एलसीबीच्या भ्रष्ट कारभाराचे रेटकार्डच जाहीर करत महिन्याकाठी तब्बल ३० कोटी रुपयांची बेकायदा वसुली करणाऱ्या या शाखेच्या इज्जतीचा पुरता पंचनामा जिल्ह्यात झाला होता. चार…
गुरुवार, २५ जुलै नागरिकांना मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य काम आहे. मात्र शहरालगत असलेल्या घुलेवाडीतील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवश्याचा मळा येथील ग्रामस्थांना वेगळाच अनुभव येत असून मूलभूत गरजांसाठी त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिक केल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे रस्ता पाणी आणि वीज या संदर्भात पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत या नागरिकांकडून आवश्यक कर घेत असली तरी त्यांना सुविधा देण्यास मात्र असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ग्रामपंचायत प्रशासनाला शेवटचा इशारा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत जर ग्रामपंचायतीने काम हाती घेतले नाही तर संघर्ष सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभे…
गुरुवार, २५ जुलै नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (२८ जुलै) शपथ देणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवार, २५ जुलै विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून २००९ मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर…
हप्तेखोर एलसीबी दरमहा करतेय २७ कोटी ६० लाखाची हप्ते वसुली! दोन टक्के हप्तेखोरांमुळे जिल्हा पोलीस दलाची नाचक्की, जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का? गुरुवार, २५ जुलै जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विशेषत: अहमदनगर एलसीबीच्या हप्तेखोरी विरोधात उपोषणास बसलेल्या खासदार निलेश लंके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगरचे पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्याचे रेटकार्डच जाहीर केले. नगर एलसीबीकडून तब्बल २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते दरमहा गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती खासदार लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी दिलेली माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी धक्कादायक आहे. कोणत्या व्यवसायातून किती रुपयांच्या हप्ते नगरच्या वादग्रस्त एलसीबीकडून गोळा केले जातात याची सविस्तर…
गुरुवार, २५ जुलै ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गुरुवार व शुक्रवारी (२४ व २५ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे. या…
बुधवार, २४ जुलै एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषणाला बसले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचा अधिकार मला नसून मी फक्त अहवाल पाठवू शकतो. कारवाईचा अधिकार वरिष्ठांना असल्याचे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान खासदार लंके यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार लंके यांच्या उपोषणा संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, पोलीस निरीक्षकांविरुद्ध ज्या काही तक्रारी आहेत त्या मला लेखी स्वरूपात द्याव्यात. आंदोलकांचा जर अधिकाऱ्यांवर…
बुधवार, २४ जुलै आधीच जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेल्या नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप चव्हाण असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याची तत्कालीन नेमणूक अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली होती. चव्हाण सध्या नगरच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. लाच लुचपतच्या नासिक पथकाने ही कारवाई केली असून लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व…
बुधवार, २४ जुलै चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणीच्या पीएमटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(N), ३७६(३) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…
बुधवार, २४ जुलै राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या योजनेमुळे मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि धनगर व तत्सम समाजाला आर्थिक बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१७ साली सुरू झालेल्या या योजनेची फलश्रुती लक्षात घेता तिची व्याप्ती वाढवून अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा आणि भटक्या प्रवर्गातील समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, या उद्देशाने पशुसंवर्धन मंत्री विखे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास काही बदलासह मंजुरी…
बुधवार, २४ जुलै डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रमा असून संगमनेर नगरपरिषद पोस्ट विभागाच्या जनकल्याणकारी योजना शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करेल. डाक विभागाची नाळ सामान्य माणसांपर्यंत जोडलेली असल्याने पोस्टाच्या फायदेशीर योजनांचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा, असे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले. संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगरपालिका यांच्या विद्यमाने संगमनेरमध्ये प्रथमच डाक चौपाल या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात या डाक चौपाल या उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर, सहायक अधीक्षक मुख्यालय संतोष…
बुधवार, २४ जुलै मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने हे अटक वॉरंट काढले आहे. २०१३ मध्ये जालना येथे ‘शंभुराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख असे तीस लाख रुपये नाट्य निर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्याला देण्यात आले नाहीत. प्रयोग आयोजित करून नाट्य निर्मात्याचे पैसे बुडविल्या प्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्या विरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.…
बुधवार,२४ जुलै राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेले सर्व अधिकारी मुंबई, पुण्यातील आहेत. यांच्या झाल्या बदल्या… महिला व बाल अत्याचार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सुहास वारके यांची मुंबईच्या नागरी हक्क संरक्षण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या अश्वती दोरजे यांची महिला व बाल अत्याचार विभाग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले शशिकांत महावरकर यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलीस दळणवळण…
मंगळवार, २३ जुलै एकीकडे देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे – “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी १६ हेक्टर…
संगमनेरला येऊ शकतो तर लोणीलाही जाऊ शकतो, दुग्ध विकास मंत्र्यांना इशारा मंगळवार, २३ जुलै दूध दरासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतुळ ते संगमनेर ५५ किलोमीटर अंतर पार करत ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर संगमनेर शहरात धडकले. रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकण्यापूर्वीच शासकीय विश्रामगहाजवळ अडविण्यात आली. त्यामुळे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारामध्येच शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे गेले १८ दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले…
विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यावधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ ‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब मंगळवार, २३ जुलै कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना बळ… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला…
