Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी / मुंबई मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सरसकट आरक्षण देणार नाही. तर पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार असल्याचा मुख्यमंत्री पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयावर ओबीसी समाजाच्या नेत्यांचा आक्षेप आहे. याशिवाय ओबीसी नेत्यांकडून न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्पष्टीकरणाने मराठा समाजाचा आणि समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांचा पुरता हिरमोड झाला आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन शासन निर्णय काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा शासन निर्णय…

Read More

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. लवकरच हा निधी सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होईल. गेल्या काही दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. सामाजिक न्याय विभागाकडून या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला…

Read More

मुंबई –  महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त झाले होते. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी ही माहिती दिली. या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसोबतच महाराष्ट्राचा कार्यभारही सांभाळतील. कोण आहेत आचार्य देवव्रत? मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील आचार्य देवव्रत हे एक अनुभवी राजकारणी आहेत. २०१९ पासून ते गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून कार्यरत…

Read More

संगमनेर- ध्रुव ग्लोबल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दक्षिण विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकं पटकावली. भूषण राऊत, श्‍लोक हेडा, तनुश्री लहामगे आणि मानसी आहेर या चार खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रिकेटपटूंनी एकूण १९ पदकं जिंकली. त्यात ४ सुवर्ण, १२ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकांची कामगिरी: * १९ वर्षांखालील मुलांचा गट:    * सुवर्णपदक: भूषण राऊत आणि श्‍लोक हेडा.    * रौप्यपदक: सर्वेश बंगाळ, विनित भन्साळी, साहील शिरसाठ आणि ध्रुव धादवड. * १९…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेरमध्ये पोलिसांचा असलेला धाक पूर्णत: संपला आहे, याची परिणती शहरात घडलेल्या घटनांवरून वारंवार येत असतानाच आता शहरातील श्रीरामनगर भागात आठ जणांच्या टोळक्याने हप्त्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून एका कार दुरुस्ती व्यावसायिकाला धमकावत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर याच टोळक्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेले.  मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत टोळक्यातील तीन मुख्य आरोपी धीरज राजेंद्र पावडे (वय २३), संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २४) आणि दीपक सोमनाथ वैराळ (वय २३) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात…

Read More

मेष (Aries) – आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन संधी दार ठोठावतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus) – आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी होईल. वादविवाद टाळा. मिथुन (Gemini) – आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. कर्क (Cancer) – भावनात्मकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जुने वाद मिटतील. प्रवासाचे योग आहेत, पण काळजी घ्या. सिंह (Leo) – नोकरी आणि व्यवसायात नवीन आव्हाने येतील, पण तुम्ही ती यशस्वीपणे पार कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कन्या (Virgo) – आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक गुंतवणूक करताना…

Read More

मुंबई – विशेष प्रतिनिधी पुढील पिढीला प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ (नो प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, नो पेट्रोल) हे धोरण लवकरच सक्तीने लागू केले जाईल. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार, पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक वाहनाचा क्रमांक स्कॅन केला जाईल, जेणेकरून त्याच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (PUC) वैधता तपासली जाईल. जर एखाद्या वाहनाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर त्याला…

Read More

दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात एका दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घृणास्पद घटनेत, विशेष न्यायालयाने आरोपी भास्कर धाकू मोरे याला मरेपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडितेला न्याय मिळाला असल्याचे मानले जात आहे. पीडित चिमुरडीला लघवी करताना त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी आणले असता, तपासणी करणाऱ्या परिचारिकेला तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, चिमुरडीने आरोपी भास्कर मोरे याने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ भारतीय दंड…

Read More

संगमनेर –  ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक यावर्षी केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता, स्वच्छता आणि मानवतेच्या शिकवणुकीवर आधारित विविध उपक्रमांची दखल घेत, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन आणि न्यूज एन एम पी परिवाराने काही संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत. यावर्षीच्या मिरवणुकीदरम्यान अनेक गट सक्रिय झाले होते. काही स्वयंसेवकांनी मिरवणूक संपल्यावर तात्काळ रस्त्यांची स्वच्छता केली आणि ‘स्वच्छता हाच धर्म’ असा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे, एका गटाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि औषधे असलेले महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. यामुळे धार्मिक कार्यक्रमासोबतच आरोग्यसेवेचा लाभही लोकांना मिळाला. इतर काही गटांनी…

Read More

संगमनेर-  सोशल मीडियावर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूबवरील ‘संगीता वानखेडे’ या महिलेविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, संगमनेरातून त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात प्रकाश कडलग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 07 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी यूट्यूबवर ‘स्पष्ट मत LIVE’ या चॅनलवर संगीता वानखेडे यांचा एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये वानखेडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना, मराठा महिलांची बदनामी करणारी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. त्यांच्या या विधानामुळे मराठा…

Read More