Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येणारा ‘संगमनेर फेस्टिवल’ येत्या गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध लोकप्रिय नाटकांसह संगीत आणि विनोदी कार्यक्रमांचा संगम साधण्यात आला आहे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.  यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे. फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अशी, गुरुवार, २८ ऑगस्ट: सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ सादर होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार, २९ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कर्क आज तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. कन्या आज तुम्हाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले.  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी झालेल्या संगमनेर दौऱ्यादरम्यान त्यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. रॅलीच्या वेळी सभेच्या ठिकाणाजवळ काही शिवसैनिकांनी गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांची संगमनेरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जाणता राजा मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, रॅली सभास्थळी पोहोचताच मंचाजवळ अचानक काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आणि गोंधळ वाढू लागला.  परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही गोंधळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर जालना पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम’ अर्थात ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. भोकरदन नाका परिसरातील व्यापारी चंदन बंसतीलाल गोलेच्छा यांना धमकावून खंडणी मागणारे विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर आणि राहुल गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात असे समोर आले की, मुख्य आरोपी विठ्ठल अंभोरे आणि त्याच्या साथीदारांचा एक पूर्वेतिहास आहे. त्यांनी जालना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता, पोलिसांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या दौऱ्याची खरी उत्सुकता केवळ राजकीय भाषणांपुरती मर्यादित नसून, एका स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्राने ती आणखी वाढवली आहे. या पत्रात, सामान्य नागरिकाने एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट संगमनेरच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामुळे, आता उपमुख्यमंत्री या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दौरा राजकीय सभांपेक्षा स्थानिक जनतेच्या अपेक्षांशी अधिक जोडला गेला आहे, असे दिसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले असे आहे सामान्य नागरिकाचे पत्र … माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगरमध्ये तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विशाल तुकाराम चव्हाण आणि कृष्णा दगडू शिंदे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये, अर्जुन गिते यांची २५.५ लाख रुपये आणि इतर तीन जणांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार अर्जुन गिते यांची २०२२ मध्ये आरोपी विशाल चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. विशालने ‘व्ही.सी. इन्व्हेस्टमेंट’ या नावाने शेअर मार्केट कंपनी सुरू केल्याचे सांगितले. त्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नफ्याचे आकर्षक व्हिडिओ दाखवून गिते यांच्यासह स्नेहा जोशी, शीतल चव्हाण, आनंद जोशी, आणि…

Read More

लोकशाही प्रणालीतील अनेक संस्था या व्यक्तीमुळे सरस ठरत असतात. तर बदनाम प्रमुखामुळे चांगल्या संस्थाही बदनाम ठरतात. देशाच्या निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं ती उंची केंद्रातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या निवडणूक आयुक्तांनी मातीमोल करून ठेवली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदावर विराजमान झालेला व्यक्ती हा भाजपसाठी दलाली करण्यात मश्गूल बनला असल्याचा आरोप होतो आहे. या आयुक्तामुळे टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोगाचा मानमरातब कधीच लोप पावला आहे. आपण कोणाला तरी विकलो गेलो आहोत, असा उघड आरोप तरी होऊ नये, असंही या आयोगाच्या आयुक्तांना वाटत नाही. एकाच्या बाजूने निकाल दिला की दुसरा दोष द्यायला मोकळा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries)  आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या कामात शिस्त आणि नियमितता राखणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील प्रश्न सामंजस्याने सुटतील. व्यवसायात काही नवीन सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ (Taurus) आज तुम्हाला कामात काही अडथळे जाणवू शकतात, ज्यामुळे मन थोडे उदास होऊ शकते. तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायातील सुधारणांसाठी अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रेम जीवनात काही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. मिथुन (Gemini) आज तुमच्या कामात काही बदल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: सध्या संगमनेर तालुक्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आपल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस देण्याचं आवाहन केलं आहे. दूध संघात स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांचे आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. देशमुख यांनी लम्पी चर्मरोगाची काही प्रमुख लक्षणे सांगितली. जर जनावरांच्या शरीरावर, विशेषतः डोके, मान, पाय, कास, आणि तोंडात २ ते ५ सेमी आकाराच्या गाठी आढळल्यास, किंवा डोळ्यांमध्ये जखमा झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. देशमुख यांनी या वेळी बोलताना शासनाकडेही…

Read More