Author: अनंत पांगारकर
मेष – आज तुमचा आत्मविश्वास उच्च असेल. कार्यस्थळी तुमच्या कल्पनांना आणि योजनांना यश मिळेल, ज्यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत दिवस शुभ आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तब्येत चांगली राहील, उत्साह कायम असेल. वृषभ – हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि लाभदायक आहे. तुमच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा योग्य वापर केल्यास मोठे यश मिळेल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत आहेत. मिथुन – आज तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामावर पूर्ण एकाग्रता ठेवा. प्रवास संभवतो, परंतु काळजीपूर्वक करा. भागीदारीच्या कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. सायंकाळपर्यंत कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनःशांती मिळेल. कर्क…
संगमनेर – शासनाने नागरी क्षेत्रांतील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, नागरी भागांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमिनीचे व्यवहार आता विनाशुल्क नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी लोकांना थेट कायदेशीर आणि आर्थिक संरक्षण मिळणार आहे. या संदर्भात आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकले होते, ज्यामुळे लाखो सर्वसामान्य नागरिक आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडले होते. हेच लक्षात घेऊन, आमदार खताळ यांनी विधानसभेत या समस्येकडे लक्ष वेधले आणि हे व्यवहार शुल्क न आकारता त्वरित…
संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारी अर्जावर नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज यांनी कायदेशीर आक्षेप नोंदवत अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केल्याने निवडणुकीच्या रिंगणात मोठी खळबळ उडाली आहे. हा आक्षेप थेट ‘दुहेरी मतदार नोंदणी’शी संबंधित असून, यामुळे उमेदवारी अर्जाची वैधता धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी अरुण मुंडे यांच्याकडे तवरेज यांनी हा आक्षेप नोंदविला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…
संगमनेर: (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे. राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून, या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. माजीमंत्री थोरात म्हणाले की, महायुतीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीचे वातावरण आहे. हे मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. ही केवळ सुरुवात आहे; पुढे याचा मोठा राजकीय स्फोट दिसेल. थोरात यांच्या या विधानामुळे महायुतीतील अस्थिरतेच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. भाजपकडून काँग्रेस…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: लाच घेणाऱ्यांवर न्यायालयात कारवाई करण्याची जबाबदारी असताना, त्याच सहायक सरकारी वकिलाने लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाच प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर, त्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकील शरद बन्सी बांगर (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची एका लाच प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्दोष मुक्तता झाली होती. या निकालाला शासनातर्फे उच्च न्यायालयात आव्हान न देण्यासाठी वकील बांगर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराने यापूर्वीच बांगर यांना १ लाख ५० हजार रुपये दिले होते आणि उर्वरित ५०…
मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना दिलासा मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus): आजचा दिवस उत्तम राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते, पण अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. मिथुन (Gemini): आज तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकतात. नोकरीत नवीन ऑफर मिळू शकतील. व्यवसायाशी संबंधित नवीन करार होऊ शकतो. कर्क (Cancer): कौटुंबिक बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रशासकीय बाबी तुमच्या बाजूने राहतील. सिंह (Leo): आर्थिक…
संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीचे मैदान सोडणाऱ्या उमेदवारांची अर्थात ‘रणछोडदास’ बनणाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी, ‘मनधरणी’नंतर अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, 21 नोव्हेंबर असल्याने, अंतिम दिवसापर्यंत किती उमेदवार निवडणुकीचे मैदान सोडून ‘रणछोडदास’ बनतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. बुधवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या दिड्डी रूपाली अभिजीत आणि जहागीरआली जावेदअली सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांनी तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणाऱ्या डॉ. रूपाली…
संगमनेर – शहरातील नामांकित संजीवन हॉस्पिटलचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक कृत्य केले आहे. मुलीने पत्नीला सपोर्ट केल्याचा राग मनात धरून डेरे यांनी आपल्या पी.ए. सोमनाथ पवार यांच्यासह थेट फाॅर्च्युनर गाडी हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये वेगाने घुसवली, काचेचा दरवाजा तोडला आणि एका कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो तरुण बचावला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, डॉ. डेरे यांच्याच कन्या डॉ. एकता वाबळे यांनी वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर डॉ. डेरेना गंभीर कलमांखाली तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास संगमनेर येथील…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. कामात प्रगतीचे योग आहेत. वरिष्ठांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आजचा दिवस सामान्य राहील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मिथुन (Gemini): आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि विश्लेषणाच्या जोरावर काही गुंतागुंतीची कामे सोडवू शकता. कर्क (Cancer): आजचा दिवस शुभ राहील. आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. सिंह (Leo): आजचा दिवस सामान्य राहील. मुलांच्या भविष्याबद्दल जोडीदारासोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. कन्या (Virgo): आजचा दिवस मिश्र (मिला-जुला) राहील. तुम्हाला मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रभावशाली व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. तूळ (Libra): आजचा दिवस लाभदायक राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि मनोरंजक प्रवासाचा योग आहे.…
संगमनेर: अनंत पांगारकर संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी (काल) पूर्ण झाली असून, प्रशासनाच्या विस्कळीतपणामुळे उमेदवारांची अधिकृत यादी समोर येण्यास मंगळवारी पहाटे पावणे तीन वाजेपर्यंतचा विलंब लागला. सोमवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने प्रशासकीय गोंधळ उडाला. अखेर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी १७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाच्या गोंधळावर प्रश्नचिन्ह – अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विस्कळीत कारभाराचे चित्र समोर आले. सोमवारी अर्ज दाखल होऊनही उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर होण्यासाठी तब्बल दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागली. एवढ्या मोठ्या विलंबाचे ठोस कारण प्रशासनाने…
