Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शोषित आणि वंचित यांच्या प्रश्नांना सर्वप्रथम वाचा फोडली. त्यांनी बहुजनांच्या विकासाचा, समतेचा आणि पुरोगामी विचार जगाला दिला. सर्वधर्म समभाव, बंधुता आणि समता जपणारा त्यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, मालती डाके, अरुण हिरे, अभिजीत ढोले, निखिल पापडेजा, नितीन…

Read More

संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली असताना हा घृणास्पद प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पाऊले उचलत आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली असून, समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी या संघटनेने या घटनेचा तीव्र…

Read More

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीने रुग्णांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा अंत्योदय कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असल्यास, त्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे आणि पुढील प्रक्रिया नंतर पूर्ण करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलेल, अशी भावना व्यक्त केली आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे…

Read More

संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी…

Read More

संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी –  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे…

Read More

निवडणूक विशेष | अनंत पांगारकर  अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पायाभरणी सहकाराच्या माध्यमातून झाली आहे. या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी आपल्या माध्यमातून शाबूत राखला आहे. जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये आजी-माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून विशेषतः अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या पराभवानंतर असलेले राजकीय वैर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि अमोल खताळ यांच्या रूपाने महायुतीच्या नव्या आमदाराचा उदय झाला. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरची राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे निर्माण झाली. खताळ यांच्या विजयामध्ये विखे पिता पुत्रांची ताकद असल्याने…

Read More

कोल्हापूर, दि. ९ एप्रिल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर याने कोल्हापूरमधील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीवरून धमकी दिली होती. याच संभाषणात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर कोरटकरला अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याने दाखल केलेला जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आला होता, त्यामुळे त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला…

Read More

संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी गटातील प्रमुख नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ आणि संतोष रोहोम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर विरोधी महायुतीकडून या संदर्भात माध्यमांना आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकात कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे यांसारख्या गंभीर…

Read More

संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल १३३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा मोठा समावेश असून विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. विरोधी उमेदवार मैदानात नसल्याने आणि विरोधकांनी कारखान्याविरोधात समाज माध्यमातून निर्माण केलेले चित्र संपुष्टात आल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा एकदा सोपी झाली आहे. कारखान्यावरील त्यांचे अधिपत्य कायम राहणार आहे. त्यामुळे कारखान्याची वाटचाल बिनविरोध निवडणुकीकडे असल्याच स्पष्ट होत आहे. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याचे निवडणूक लढविण्याचे…

Read More

संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष…

Read More