Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर समर्थन केल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान शौकत पटेल (रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पहायला मिळतील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवले होते. त्याचा मित्र मुजाहिद आरिफ पठाण (रा. साकूर, ता. संगमनेर, सध्या रा. अहमदनगर) याने हे स्टेटस लाईक करत समर्थन दर्शविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या कृत्यामुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत…
अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. आता ही बैठक मुंबई येथे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून या उपक्रमांना अधिक गती देण्याचा सरकारचा विचार होता. यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी देखील सुरू होती. मात्र, अनपेक्षितपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर गुरुवार, दि. २४ एप्रिल – लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या पत्रकार रमजान नजीर शेख याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांच्याकडे खडी वाहतूक करणारे चार ट्रक आहेत. २० मार्च २०२५ रोजी तलाठी अक्षय ढोकळे यांनी दोन ट्रकवर खोटी कारवाई करून प्रत्येकी एक लाख तेवीस हजार रुपये दंड आकारला होता. अर्जदार रमजान शेख हे मांडवे गावात पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी फिर्यादीला तलाठी अक्षय ढोकळे यांच्याशी भेट करून देण्याची मध्यस्थी केली, जेणेकरून ‘सेटलमेंट’ करता येईल. मात्र, तलाठी लाच मागणार, या विचाराने फिर्यादीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अहिल्या नगर जिल्ह्यात सर्वत्र या आदेश लागू असतील. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या आदेशाचा भंग करत कायदा व सुव्यवस्थेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने फिल्मी स्टाईलमध्ये पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २४) बागलाण तालुक्यातील ततानी येथे घडली. जितेंद्र खंडेराव सोनवणे (वय ४५) असे फरार मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचला असताना सोनवणे यांनी कार्यालयातील टेबलावर लाचेची रक्कम ठेवून मागच्या दरवाजाने धूम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३३ वर्षीय असून ते आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक आहेत. त्यांची स्वतःची पिठाची गिरणी आहे. त्यांना ततानी शासकीय आश्रमशाळेतील धान्य दळणाचे कंत्राट मिळाले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संगमनेर शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी बोलताना, पूर्वी काँग्रेसच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनता वैतागली होती, त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपच्या काळातही पुलवामा आणि पहलगामसारखे हल्ले होत असतील, तर जनतेला भाजपलाही घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. शहरप्रमुख पप्पू कानकाटे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…
संगमनेर – प्रतिनिधी जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी आज (बुधवार, २३ एप्रिल) दुपारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागांची सोडत काढण्यात आली. शुक्रवारी (२५ एप्रिल) प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरक्षण सोडतीनंतर कुठली ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाली यांची चर्चा सुरू होती. दरम्यान आता कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठीचे आरक्षण पडते याकडे लक्ष लागले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत निहाय आरक्षण… बघा यादी
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या दणदणीत विजयानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधानसभेच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. “विधानसभेच्या निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. अतिआत्मविश्वास आणि गाफीलपणा टाळल्यामुळेच हा विजय शक्य झाला,” असे थोरात म्हणाले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे, या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा स्नेह मेळावा गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह नूतन संचालक, अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्यावतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनांमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे तालुका आणि शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महायुतीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, दहशतवाद्यांना कठोर शासन करावे आणि त्यांच्या संघटनांना संपवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. हिंदू पर्यटकांवरील हा हल्ला केवळ एका विशिष्ट समुदायावर नसून संपूर्ण देशावरील हल्ला असल्याचे मत यावेळी…
