Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक, दि.१२ एप्रिल –  नाशिक जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आर.आर. राठी यांची तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झाली असून, जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. जगमलानी यांनी यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली होती. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.११ एप्रिल) सकाळी जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले आणि न्यायाधीश राठी यांनी सकाळी १० वाजता कार्यालयात नियमितपणे हजेरी लावली. त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीशांशी (Principal District Judge) काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना बदलीचे पत्र देण्यात आले. दरम्यान राठी यांच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजात काही…

Read More

संगमनेर, दि.१२ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली. परंपरेनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला. त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीत संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सहभाग घेतला होता. महिलांनी रथ ओढल्यानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजविण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले. हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक कार्यकर्त्यांमध्ये…

Read More

घारगाव (संगमनेर) –  संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती ‘उडान हेल्पलाईन’ आणि सजग नागरिकांकडून मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘स्नेहालय’च्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर कुटुंबीयांची ‘लग्नाची घाई नाही, मुलगी बालग्राममध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे गैरसमज झाला आहे,’ अशी भूमिका घेत दिशाभूल करण्याचा…

Read More

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने तातडीने १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित वेतन मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा केवळ ५६ टक्के भागच जमा झाला होता. यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, पूर्ण वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने मंत्रालयात वित्त सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एसटी महामंडळाच्या विविध सवलतींच्या बदल्यात शासनाकडून येणे असलेले १०७६ कोटी रुपये त्वरित…

Read More

पुणे, दि. ११ एप्रिल – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने तिचा झालेला मृत्यू हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने नियम व अटींचा भंग केला असून, दोषींवर कारवाई करण्यास सरकार दिरंगाई करत आहे. रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून सरकारने ताबा घ्यावा. तसेच, डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी.अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आज (शुक्रवार ११ एप्रिल) महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर आणि भिसे कुटुंबीयांची…

Read More

संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शोषित आणि वंचित यांच्या प्रश्नांना सर्वप्रथम वाचा फोडली. त्यांनी बहुजनांच्या विकासाचा, समतेचा आणि पुरोगामी विचार जगाला दिला. सर्वधर्म समभाव, बंधुता आणि समता जपणारा त्यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, मालती डाके, अरुण हिरे, अभिजीत ढोले, निखिल पापडेजा, नितीन…

Read More

संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली असताना हा घृणास्पद प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पाऊले उचलत आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली असून, समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी या संघटनेने या घटनेचा तीव्र…

Read More

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीने रुग्णांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा अंत्योदय कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असल्यास, त्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे आणि पुढील प्रक्रिया नंतर पूर्ण करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलेल, अशी भावना व्यक्त केली आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे…

Read More

संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी…

Read More

संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी –  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे…

Read More