Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खासगी व्यक्तीला १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे अशी लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल्सची नावे आहेत, लाच घेणारे दोन्ही पोलीस कर्मचारी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीला आहेत. त्यांच्यासोबत उमेश बारी नावाच्या एका खासगी व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेर येथील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायासाठी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे यांनी तक्रारदाराकडे दरमहा १५ हजार…
संगमनेर – संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांची मुदतीपूर्वीच येथून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर प्रतिनियुक्ती केली आहे. आपल्या कामाचा ठसा संगमनेरमध्ये उमटवू न शकणारे कोकरे राजकीय दबावामुळे संगमनेरमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय वर्तुळामध्ये होती. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये कोकरे यांचा समावेश होता. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाही. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले. मात्र, त्यांच्या कामकाजात होणाऱ्या…
मेष: आज तुम्ही तुमच्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. मुलांच्या नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ: आज तुम्हाला कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच कामे करावी लागतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन: तुमच्या मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आज अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचे योग आहेत. कर्क: प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येऊ शकतात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कार्य करण्याचा उत्साह वाढेल. सिंह: तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरी आणि व्यवसायात…
संगमनेर: सध्या संगमनेर नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरातील रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि अनधिकृत फ्लेक्ससारख्या गंभीर प्रश्नांवर तातडीने लक्ष घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम अरगडे यांच्यासह काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात केवळ समस्या नमूद केल्या नसून नेमकी समस्याग्रस्त ठिकाणेही दर्शवण्यात आली आहेत. यामुळे, मुख्याधिकारी या संदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाहतूक आणि सिग्नल व्यवस्था – संगमनेर शहरातील बस स्थानक, अकोले नाका आणि दिल्ली नाका येथील सिग्नलचा वेळ (टायमिंग) चुकीचा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अनेक वाहनचालक नियम तोडून…
संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव संगमनेर’ चळवळीच्यावतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर शहरात २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या काळात दररोज रात्री ७ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महिलांमध्ये मैत्री आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्याने विकासातून वैभव प्राप्त केले आहे. शहराची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ‘सौ शहरी एक संगमनेरी’…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रसिद्ध श्री खंडोबा देवस्थानाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत ‘ब वर्ग’ दर्जा मिळाल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, खंडोबा महाराज हे संगमनेर तालुक्याचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या वार्षिक यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. मात्र, सोयी-सुविधांची कमतरता जाणवत होती. आमदार खताळ यांनी ही बाब लक्षात घेऊन शासन स्तरावर अथक प्रयत्न केले, ज्याला आता यश आले आहे. यामुळे आता देवस्थानाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. या निर्णयामुळे देवस्थान परिसरात पाणीपुरवठा, स्वच्छता, निवास, रस्ते, प्रकाशयोजना आणि शौचालये यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. यामुळे यात्रेकरूंचा अनुभव अधिक…
संगमनेर (प्रतिनिधी): राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरूच आहे. तालुक्यात विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, आता आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे. हा निधी श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आणि इतर चार गावांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मंजूर झाला आहे. आमदार तांबे यांनी वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी वेळोवेळी या देवस्थानला विविध योजनांमधून…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ- आज तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. मिथुन- आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार जपून करा. कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सिंह- आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल. कामाचे योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. तूळ- आज तुम्हाला आर्थिक…
संगमनेर – मोहसीन शेख उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद…
सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच…
