Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: धनादेश अनादरीत झाल्याच्या (चेक बाऊन्स) प्रकरणात संगमनेर येथील आशिष सुभाष वर्मा यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सूर्यवंशी यांनी दोषी ठरवत दोन महिन्यांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने वर्मा यांना ३० दिवसांच्या आत फिर्यादी कंपनीला २०,७६४ रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम न भरल्यास त्यांना आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल. तब्बल तेरा वर्षे चाललेला या खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल १४ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला. हे प्रकरण श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड या कंपनीने दाखल केले होते. कंपनी ही नोंदणीकृत असून, कर्ज देण्याचा व्यवसाय करते. आशिष वर्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईनअहिल्यानगर: भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाकोडी फाटा येथे सुरू असलेल्या एका बिंगो जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ४१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (१४ ऑगस्ट) करण्यात आली. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर प्रताप छजलानी (वय ३२), नरेश रामसिंग चव्हाण (वय ३५), आणि ओंकार नंदू बनसोडे (वय २२) अशी आहेत. हे तिघेही हरीमाळ दरेवाडी, सोलापूर रोड, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून बिंगो खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ : आर्थिक व्यवहार जपून करा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मिथुन : आज तुमची सर्जनशीलता वाढलेली असेल. कला, लेखन किंवा इतर छंदातून तुम्हाला आनंद मिळेल. सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्यास नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. कर्क : घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक वाद टाळता येतील. सिंह : तुमच्या…
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली वृत्तपत्रात लेख लिहिला वा वृत्तवाहिनीवर व्हिडीओ दाखवला म्हणून पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा कसा काय होऊ शकतो? तो शस्त्र घेऊन लढत होता काय? नसेल तर कोणाच्याही विरोधात कशीही कारवाई करायला या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही आहे की नाही असं विचारत सर्वोच्च न्यायालयाने सरकारची पुरती सालटी उतरवली. सर्वोच्च न्यायालयाने ‘द वायर’च्या पत्रकारावरील देशद्रोही ठरवण्याच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान ही टिप्पणी केली. कोणत्याही पत्रकारांचे लेख किंवा व्हिडीओ प्रथमदर्शनी देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं कृत्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘द वायर’चे सिद्धार्थ वरदराजन आणि ‘फाउंडेशन ऑफ इंडियापेंडेंट जर्नलिझम’च्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कुरण गावात सर्रास सुरू असलेल्या गोहत्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आज, (१४ ऑगस्ट) फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. या निवेदनात, संगमनेरमधील समस्त मुस्लिम समाजाने कुरण गावात काही व्यक्तींकडून सातत्याने होत असलेल्या गोहत्यांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रभर कुरेशी, खाटीक व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालून व्यापार व कत्तलखाने बंद ठेवले असतानाही कुरण गावात मात्र कसलीही भीती न बाळगता गोहत्या सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अनेकदा छापे टाकले असले तरीही हा प्रकार थांबत नसल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष रास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ रास आज तुम्हाला थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व अडचणींवर मात कराल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. मिथुन रास आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध चांगले राहतील. कर्क रास आज तुम्ही खूप भावूक होऊ शकता. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सिंह रास आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या आरोग्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी भविष्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. खंडोबा देवस्थानात झालेल्या कथित ११ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास आपण स्वतः मंदिराबाहेर आंदोलन करू, असे प्रतिपादन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले. घारगाव ते हिवरगाव पावसा या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा नुकताच शुभारंभ खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हिवरगाव पावसा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष गडाख होते. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, उपसरपंच सुजाता दवंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, केशव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ८ रस्त्यांसाठी मंजूर केलेली ४० कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आल्याने तालुक्यात संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ संगमनेर तालुक्यासाठीच घेण्यात आला असून जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यांची कामे रद्द झालेली नाहीत. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने अपूर्ण माहितीवर आधारित पत्रकबाजी केल्याचा आरोप शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४०.७३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून एकूण ३०.५७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार होती. यात डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जनजागृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीत पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांची अशासकीय सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १ सप्टेंबर २०१५ च्या निर्णयानुसार या समितीची स्थापना झाली असून, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. या समितीत खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे: शासकीय अधिकारी:…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर या निर्णयावरून आमदार अमोल खताळ यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय…
