Author: अनंत पांगारकर
संगमनेर, 12 जून: संगमनेर शहर आणि परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 1,55,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते, पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व नऊ आरोपी सराईत गुन्हेगार असून साई शरद सूर्यवंशी (वय 20, रा. अकोले नाका, संगमनेर), राहुल भरत सोनवणे (वय 24,…
संगमनेर, प्रतिनिधी अहिल्यानगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कारणास्तव ही बदली केली असून नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले असून, उंडे यांना तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे प्रांताधिकारी पद रिक्त होते. यापूर्वीचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची बढतीवर अपर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून या जागेसाठी अनेक चर्चा सुरू होत्या, विशेषतः महसूल प्रशासनातील अधिकारी संगमनेरला येण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा होती. अरुण उंडे यांच्या नियुक्तीमुळे आता या चर्चांना…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादामुळे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची तर आणखी एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपाली ज्ञानदेव वाघ (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर त्यांची नणंद मोनिका वाघ या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपाली वाघ या मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी गेल्या असता, विक्रम पडवळ याने त्यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर…
संगमनेर, प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी ‘मॅच फिक्सिंग’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नसून, तो भाजपसाठी काम करत असल्याचा थेट दावा थोरात यांनी केला आहे. सत्तेसाठी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्फोटक विधान केले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी या मुलाखतीत सांगितले की, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला अनेकदा प्रश्न विचारले आहेत. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाने…
अहिल्यानगर, जिल्ह्याचे नवे एसपी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदल केले असून सात पोलीस निरीक्षकांसह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना पाठविण्यात आले आहे. एसपी घार्गे यांनी काढलेल्या आदेशामुळे आता जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांना पोलीस निरीक्षक मिळणार आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांच्या देखील बदलीचे आदेश काढण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादानंतर संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मयत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ…
संगमनेर, ११ जून २०२५ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने संगमनेरमधील काही रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी ही माहिती दिली. यापूर्वीची कार्यकारिणी कायम ठेवत, पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार रिक्त झालेल्या जागांवर या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात पंकज पडवळ (युवा सेना उपजिल्हाधिकारी, ग्रामीण), लक्ष्मण सोन्नर (युवा सेना पठार भाग तालुका अधिकारी) आणि सागर भागवत (युवा सेना तालुका अधिकारी, तळेगाव भाग) यांचा समावेश आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख…
संगमनेर, प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सहसचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले,…
संगमनेर, प्रतिनिधी प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं. संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल…
