Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर: राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात विखे पाटील यांच्यासह ५४ जणांचा समावेश आहे. २००४ ते २००६ या कालावधीत कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचे कर्ज काढल्याचा, त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बाळासाहेब केरुनाथ विखे (वय ६६)…
महाराष्ट्र संवाद न्यूज – सुरत (गुजरात): महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गुजरात राज्यातील १२ लोकसभा मतदारसंघांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुरत येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘संघटन सृजन अभियाना’च्या माध्यमातून संविधान रक्षणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री भरतसिंग सोळंकी, माजी खासदार किशनभाई पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष परिमल राणा, सुरत शहर काँग्रेस अध्यक्ष धनसुख राजपूत, कार्यकारी अध्यक्ष विपुल उदानवाला, दिनेश सावळिया आणि मीडिया समन्वयक कल्पेश बारोट यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर: संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने अटल भूजल योजनेअंतर्गत आयोजित ‘भूजल समृद्ध ग्राम’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल गावाला तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या खांडगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील ‘माझी वसुंधरा ४.०’ अभियानात राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. त्यावेळी गावाने लोकसहभागातुन पृथ्वीच्या पाच पंचतत्वांवर काम केले, आता २०२३-२०२४ या वर्षात भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात मिळालेले हे दुसरे मोठे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर: महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी, (१ मे २०२५) सकाळी ८ ते १२ या वेळेत नवीन नगर रोड येथे ‘समतेची मिसळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना घेऊन सर्वधर्मीय आणि सर्व समाजाच्या सहकार्यातून हा उपक्रम होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, लोककल्याण आणि समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका एक कुटुंब म्हणून ओळखला जातो आणि याच…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कणखर नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आगामी पंचवार्षिक निवडणूक (२०२५-२०३०) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा एकदा बिनविरोध पार पडली आहे. या बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्रात विश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या तालुक्यात एकी आणि विश्वासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याच्या सहकार चळवळीत संगमनेर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने कारखाना निवडणुकीकडे सर्वांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. किसन दादा शिंदे (वय ३८, रा. भेंडा, नेवासा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन शिंदे यांचे त्यांच्या नातेवाईकांशी भूखंडावरून वाद सुरू आहेत. यासंदर्भात शासकीय कार्यालयातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निराश झालेल्या शिंदे यांनी रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर: संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान जयंती उत्सवात चांगलाच गदारोळ झाला. या संदर्भात पंधरा दिवसांच्या अंतरानंतर तब्बल दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर आता हनुमान विजय रथावर जयंती उत्सव समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी नावाच्या पाट्या लावल्याने हिंदुत्ववादी युवक संतप्त झाले आहेत. युवक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत, हनुमान जयंती आणि विजय रथ जणू काही खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही ठराविक लोकांकडून ग्रामदैवताच्या या महत्त्वपूर्ण उत्सवाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि खासगी मालमत्तेसारखा केला जात आहे, यामागे काही लोकांचा राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा गंभीर आरोपही या युवकांकडून निवेदनात करण्यात आला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई: राज्य शासनाने विविध काळात जारी केलेले अनेक शासन निर्णय (GR) सध्याच्या परिस्थितीत लागू आहेत की नाहीत, हे समजणे प्रशासकीय कामकाजासाठी एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे कामकाजात गोंधळ निर्माण होऊन निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जुने आणि कालबाह्य शासन निर्णय रद्द केले जातील. त्याऐवजी, एकच अद्ययावत, प्रमाणित आणि स्पष्ट शासन निर्णय तयार करण्यात येईल. यामुळे शेतकरी, नागरिक आणि शासकीय अधिकारी यांना सुलभ मार्गदर्शन मिळणार असून, कामकाजातील विलंब कमी होईल.…
विशेष प्रतिनिधी / मुंबई पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (28 एप्रिल) जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये एकमुखी ठराव करत गेल्या सोमवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी निषेध प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सरकार आणि विरोधकांनी एकमताने मंजूर केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावाद्वारे पाठिंबा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे. विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहर आणि तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखाने आता आमदार अमोल खताळ यांच्या रडारवर आले आहेत. या गंभीर प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, या विघ्नसंतोषी प्रवृत्तींवर तातडीने अंकुश लावण्याचे आणि शहरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून अनधिकृत कत्तलखाने उध्वस्त करण्याचे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. या महत्त्वपूर्ण बैठकीला संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस…
