Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सत्य, अहिंसा आणि त्यागाची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने केवळ भारतच नव्हे तर जग चालत असल्याने गांधीजी आंतरराष्ट्रीय शांतीदूत ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयामध्ये कॉग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, प्रमिला अभंग, बाळासाहेब पवार, सुनील कडलग, रमेश नेहे आदी उपस्थित होते. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात विविध क्षेत्रात काम करुन नावलौकीक मिळविणाऱ्या समाजातील विविध घटकातील महिलांच्या ‘यशोगाथा’ सांगणाऱ्या मुलाखती सुरु आहे. एकीकडे नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना दुसरीकडे समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा हा आलेख इतर महिलांसाठी अनुकरणीय लौकिकास्पद ठरत आहे. डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २ ऑक्टोंबरच्या महात्मा गांधी जयंती दिनी पहाटेच पोलिसांनी संगमनेर शहरातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ११ जुगाऱ्यांना तब्बल साडेपाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह पकडले आहे. जुगार अड्ड्यावर छाप्यासाठी थेट घारगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील संगमनेरात आले होते. त्यामुळे पोलिस वर्तुळात या छाप्याची चर्चा रंगली आहे. संगमनेर शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या जोमात सुरु असून यावर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन अयशस्वी ठरले आहे. शहर पोलिसांनी याच आठवड्यात शहरातील कॉफी सेंटर, कॅफे सेंटरवर छापे मारुन तब्बल ३४ जोडप्यांना अश्लील चाळे करतांना पकडले होते. या घटनेमुळे शहरात अशा प्रकारचे अनैतिक व्यवसायही राजरोसपणे सुरु असल्याचे समोर आले होते. निरीक्षक सुनिल…
रविवार विशेष । प्रविण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उकेंविरोधी 31 मार्च 2022 रोजी ईडीने अटकेची कारवाई केली. इतर ज्येष्ठ नेत्यांविरोधात ईडीने कारवाईचा फास टाकल्याने उकेंच्या कारवाईकडे तेव्हा कोणाचं लक्ष जाऊ शकलं नाही. आता या अटकेच्या कारवाईला सहा महिने होत आहेत तरीही उके यांना जामीन मिळालेला नाही. उकेंवर कारवाई का झाली याची उत्तरं देताना उकेंच्या आई आणि वडिलांचीही उघडपणे देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. पहाटे पाच वाजता उकेंच्या घरी पोहोचलेल्या ईडी अधिकार्यांनी उकेंच्या पत्नीला धक्काबुक्की केली. ती करताना तुम्ही फडणवीसांविरोधी बोलत असल्याचे हे परिणाम असल्याचं ईडीच्या अधिकार्यांनी ऐकवल्याचा आरोप उकेंचे वडील शेखर उके यांनी केला आहे. शेखर उके यांनी प्रसार माध्यमांपुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अहमदनगर दक्षिणचे भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते. या संदर्भातील राजकीय चर्चांना पूर्णविराम देत खासदारांनी स्पष्टच सांगून टाकले की मी राज ठाकरे यांचा फॅन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत तत्पूर्वी ते साई दर्शनासाठी सपत्नीक शिर्डी मध्ये आले होते. ठाकरे शिर्डीत साई दर्शनासाठी आले त्यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर विखे देखील उपस्थित असल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवस नाशिक मुक्कामी असलेल्या ठाकरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रलंबित असलेले अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल तातडीने मंजूर करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात यावी, अशी मागणी ॲड. श्रेयस देशमुख यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पटेल संगमनेर दौऱ्यावर आले असतांना प्रत्यक्ष भेटीत ही मागणी करण्यात आली. सर्वच वकीलांशी संबधीत असलेल्या या मागणी संदर्भात केंद्रीय मंत्रालय काय निर्णय घेते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. देशमुख यांनी निवेदनात म्हटले की, आपल्या देशात वकिल हे पोलिस आणि न्यायपालिकेप्रमाणेच न्याय वितरण प्रणालीतील एक आवश्यक दुवा म्हणून काम करत आहे. परंतु पोलिस आणि न्यायपालिकेला संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि विशेषाधिकार उपलब्ध असताना वकिलांना समाजकंटकांकडून होणाऱ्या कारवायांपासून योग्य सरंक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात अद्यापही अनिश्चितता असली तरी जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे या पदासाठी आता राजकीय पक्षांना तेवढाच मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपवणाऱ्या राज्यभरातील 7675 ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडत असल्याचे स्पष्ट होत नाही तोच, जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्हानिहाय आरक्षण असे :…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची हा वाद अद्याप सुटला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेचे पदाधिकारी जाहीर केले आहे. युवा सेनेचा अध्यक्ष ची निवड अद्यापही झाली नसले तरी विभागवार प्रमुखांच्या नियुक्त जाहीर झाल्या असून त्यामध्ये बहुतांशी मंत्र्यांच्या मुलांना संधी दिल्याचे समोर येत आहे. यातील विठ्ठल सरप पाटील यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे. कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेले बहुतेक जण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. शिवसेनेतील पडझडी नंतर अनेकांनी शिंदे गटाची वाट धरल्याने त्यांची मुलेही पर्यायाने शिंदे गटासोबत गेली आहेत. अशांना मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकारिणींमध्ये स्थान दिले असल्याचे दिसते. मुख्यमंत्री शिदे यांच्या बरोबर शिवसेना प्रमुख…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या ८ वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अमृतकाळ निर्माण झाला. यापूर्वी देशात अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर होती. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच योजनांची वेळेत पुर्तता, सुरु असलेल्या योजनांचे कामं वेळेत पूर्ण करणे, यामुळेच देशामध्ये प्रथमच गरीबाला न्याय मिळत असून, यापूर्वीचे सरकार आणि मोदींचे सरकार यामध्ये निश्चितच फरक दिसत असल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली. लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसांपासून दौरा सुरु केला आहे. संगमनेर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी तसेच देशात भारतीय जनता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चाळीस आमदारांनी शिवसेनेतून फुटत भाजपाशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांना, शिवसेनेच्या आमदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, याची प्रचिती पून्हा आली. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात येणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांना टार्गेट केले. यावेळी ‘पन्नास खोके गद्दार ओके’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री झाल्यानंतर पाटील प्रथमत:च धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्यावतीने मुंबईत बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने सायंकाळी धुळ्यात सैनिक…
