Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी “भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी आज रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहाब पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण केले. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. या सामूहिक नमाज पठणाला संगमनेर तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या नमाज पठणाविषयी विचारणा केली असता धर्मगुरु पिरजादे म्हणाले, “केंद्र सरकारने वक्फ बोर्डाविरोधात घेतलेला कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी धोकादायक आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला नाहक…
शिर्डी, दि. ३१ मार्च – शिर्डी एमआयडीसीमध्ये सुरू होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे, तसेच रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सावळीविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरअंतर्गत ‘निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड’ (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी एमआयडीसीमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून नवीन औद्योगिक पर्व सुरू होत…
अहिल्यानगर, दि. ३१ मार्च – ‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांचा ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून…
शिर्डी, दि. ३१ मार्च – शिर्डी विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रात्रीच्या वेळी पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेतला. त्यानुसार, गुढीपाडव्याला रात्रीच्या पहिल्या विमानाचे शिर्डी एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुजय विखे पाटील यांनी सांगितले…
अहमदनगर, दि. ३० मार्च – ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे आवाहन जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील विविध आगारांसाठी नव्याने मिळालेल्या ४५ एस.टी. बसेसचे लोकार्पण आणि अहमदनगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, अभय आगरकर, बाबू टायरवाले, विनायकराव देशमुख, श्रीमती दानवे, आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, एस.टी. बस ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. पूर्वी गावात एस.टी. बस येणे…
कोल्हापूर, दि. ३० मार्च – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर सध्या चर्चेत आहे. त्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता प्रशांत कोरटकर याने तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून यावर १ एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार असून त्यानंतर जामीन मिळणार की कोरटकर न्यायालयीन कोठडीत मुक्कामाला राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेलंगणातून झाली अटक… काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (२५ मार्च) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली…
संगमनेर, दि. ३० मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील क्रीडापटू आणि अत्यंत हुशार विद्यार्थी साई भाऊसाहेब केरे याला शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलची गरज होती. शाळेतील शिक्षक अनिल कडलग यांनी ही बाब लक्षात घेऊन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. साई केरे हा सातवीत शिकणारा विद्यार्थी अभ्यासात हुशार असून क्रीडा क्षेत्रातही त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. लांब उडी, उंच उडी, धावणे, गोळा फेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह कबड्डी आणि खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारातही त्याने जिल्हा पातळीवर यश मिळवले आहे. मात्र, साईची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. शाळा आणि घर…
राज्याला मिळालेल्या युती सरकारमधल्या एकेका मंत्र्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडाळाची रया दररोज रस्त्यावर येत आहे. मंत्र्यांच्या तोंडाला आवर राहिलेला नाही. जिभेवर येईल ते बडबडण्याचा आमदार आणि मंत्र्यांचा हेका चालूच आहे. मुख्यमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही. युती सरकारमधले नितेश राणे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता शंभूराज देसाईंपर्यंत जाऊन पोहोचली आहे. एकेक नग राज्याच्या चांगलेपणाला काळिमा फासत असूनही त्यांच्यावर कोणाचंच काही चालत नाहीे. युतीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी तेवढं स्वत:ला आवरलेलं दिसतं. एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्यांची अवस्था अगदीच वेगळी बनलीय. आपल्याविरोधी वा आपले नेते एकनाथ शिंदेंविषयी बोलणार्या कोणाचीच गय हे मंत्री करत नाहीत. सरकारवर झालेली टीका त्यांना सहन होत नाही. मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे…
संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय वाद सुरू आहेत. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. ‘सौगात ए मोदी’ उपक्रमांतर्गत मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेटवस्तू देण्यात येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी टीका केली आहे. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. संगमनेरमधील मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “आपला भारत देश विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. राम आणि रहीम यांची संस्कृती…
