Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, २७ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई देशाचे यशस्वी पंतप्रधान मनमोहन सिंग याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना उपरती झाली आहे. मोदींच्या भ्रष्ट सरकारवर एका शब्दात टीका न करणारे अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ‘आर्थिक सुधारणांचे जनक’ अशा शब्दात हजारे यांनी सिंग यांना आदरांजली वाहिली. समाज माध्यमामध्ये या स्तुतीवर जोरदार टीका होत आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल, गुरुवारी रात्री निधन झाले. सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातील आणि परदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही डॉ. मनमोहन सिंग…
शुक्रवार, २७ डिसेंबर दुसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेत माय-लेकीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या नववर्षाच्या मुलीसह आईने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मायलेकीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एका वहीमध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे. सपना माळी (वय- ३३) व केतकी माळी (वय- ९) असे आत्महत्या करणाऱ्या माय लेकीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना माळी यांचा आठ वर्षापुर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्या आपल्या माहेरी मुलीसह एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात राहत होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या वेळी सपना यांचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला दोघी माय-लेकींनी…
शुक्रवार, २७ डिसेंबर सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला केला मात्र, राजकीय बड्या नेत्याने पोलिसांवर दबाव टाकल्याने या गुन्ह्यातून सराईत आरोपीचे नाव वगळण्यात आले. सराईत आरोपीचे नाव वगळणे संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकाराची माहिती मिळतात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याची आदेश देत पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. रविवारी (२२ डिसेंबर) काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली यामध्ये आरोपींकडून एका व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला होता. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केला. त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव टाकत या सराईत गुन्हेगाराचे नाव आरोपीच्या यादीतून…
शुक्रवार २७ डिसेंबर संगमनेर – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालय त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात,…
शुक्रवार, २७ डिसेंबर नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज सकाळी ११ वाजता मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. सात दिवसांचा शासकीय दुखवटा… मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आज (२७ डिसेंबर) रोजी कर्नाटक सरकारने सुट्टी…
गुरुवार २६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील हत्यासत्र ज्या गतीने सुरु आहे ते पाहता राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याचं काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे…
गुरुवार २६ डिसेंबर एका पाच वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून पोलिसाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याने पोलीस दल हादरले आहे. दरम्यान संबंधित पोलिसाला अटक करण्यात आली आहे. सचिन वसंत सस्ते असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. सस्ते याने बंदोबस्तावर असताना विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (२५ डिसेंबर) घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस आरोपीला अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात…
गुरुवार २६ डिसेंबर अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करणाऱ्या आरोपीस कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी २० वर्षांचा कारावास आणि २ लाख ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संगम संभाजी डुबल (२८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती येथील सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी दिली. अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी ओळख झाली होती. अल्पवयीन मुलीस तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत संगम संभाजी डुबल याने मुलीवर सातत्याने अत्याचार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात…
गुरुवार, २६ डिसेंबर एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पती-पत्नीला अटक केली आहे. अटक केलेल्या पती-पत्नीला कल्याणच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण पूर्व येथे ही घटना घडली. विशाल गवळी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून त्याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. तर पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कल्याण पूर्व येथील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध मोर्चा काढत विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीचे २३ तारखेला संध्याकाळी…
गुरुवार, २६ डिसेंबर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ७० लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी…
