Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, १५ नोव्हेंबर मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप वर विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप वरून खोटी माहिती प्रसारित केल्याने व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार घडला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. काय होता मेसेज… जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुप वर एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळली आहेत, म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरुन आपले मतदार ओळखपत्र दाखवून…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे रांगोळी काढून व फुले देऊन स्वागत करण्यात आले. मतदाराच्या कुटुंबियांनी केलेल्या या स्वागताने हे पथक भारावून गेले. ‘सकाळी झालेल्या स्वागताने दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळाली’ अशी भावना मतदान पथकाने व्यक्त केली. संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथे वसुंधरा कृष्णराव डांगे (वय वर्ष ९०) या ८५ वर्षावरील मतदाराच्या गृह मतदानासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे पथक सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना सुखद अनुभव आला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदान पथकाच्या स्वागतासाठी मतदाराच्या कुटुंबाने रांगोळ्या काढल्या होत्या. मतदान पथकातील सदस्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. ‘पंढरीची वारी करी वारकरी, त्याच श्रद्धेने राष्ट्रीय…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १६ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ७० हून अधिक वृत्तपत्रांना ‘पेड न्यूज’ देण्यात आलेल्या आहेत व त्यासाठी कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली, अशी धक्कादायक पुराव्यासह माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे. या संदर्भातील त्यांची ट्विटरवरील पोस्ट समाज माध्यमात व्हायरल होत आहे. काय म्हटले आहे यात… निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सुमित शेलार या पुण्यातील व्यक्तीची निवड केली. या शेलारने मुंबईतील एका जाहिरात एजन्सीला हाताशी धरले व महाराष्ट्रातील जवळपास ७० हून अधिक मराठी, गुजराथी व उर्दू या तीन भाषेतील वृत्तपत्रांची यादी गोळा केली.…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना ‘धन्यवाद साहेब’ म्हटले आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ शिर्डीमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना थोरात यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले होते. या अनुषंगाने थोरात यांनी पवार यांना धन्यवाद म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले होते शरद पवार… येथे कधीही आल्यानंतर एका गोष्टीची चर्चा व्हायची, निळवंडे. हे धरण व्हावं यासाठी प्रयत्न होते. येथे कधीही आल्यानंतर आम्ही काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. पण त्या कामाला अनेक वर्षे झाली गतीच येत नव्हती. आणि ज्यावेळी या…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – मोहसीन शेख संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा कळीचा बनला आहे. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य प्रमुख उमेदवारांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी यासंदर्भात समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते वोहरा यांच्या पारड्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम चरणाकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी विविध समाजातील बहुचर्चित प्रश्नांवर बोट ठेवत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत…
गुरुवार १४ नोव्हेंबर अहिल्यानगर – ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित अकरा विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास (होम वोटिंग) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १३७९ मतदारांनी गृह मतदान केले. या मतदारांचे मतदान टपालात बंद झाले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६…
गुरुवार, १४ नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी १२२ मतदारांनी आपले मतदान नोंदविले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. गृह मतदान करणाऱ्यांमध्ये ८५ वर्षावरील ९८ जेष्ठ नागरिकांचा तर २४ दिव्यांग नागरिक मतदारांचा समावेश आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ डी…
गुरुवार, १४ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरी विधानसभेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करणे, विनापरवाना मंडप उभारणी करणे तसेच कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरीतील वाकोडी शिवारात महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया कारवाईनंतर शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर…
संगमनेर – मोहसीन शेख विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोठे दमछाक होत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा मात्र वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. मतदारांच्या भेटीनंतर मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहतील याबाबत त्यांना आशा आहेत. प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपल्या मर्यादित अशा प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. प्रस्थापित आणि धनशक्ती विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अजीज वोहरा यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. वाड्या वस्त्यांवर जात ते आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत. शहरातील मतदारांच्या गाठीभेटीनंतर वोहरा यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बुधवारी त्यांनी…
