Author: अनंत पांगारकर
मनमोहन सिंग यांना शोकसभेतून अभिवादन स्वच्छ चारित्र्य असलेल्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण – डॉ. तांबे गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. मालपाणी लॉन्स येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, रणजीतसिंह देशमुख, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात,…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र दुधासाठीचे अनुदान ऑक्टोंबर महिन्यापासून मिळाले नसून सरकारने हे अनुदान तातडीने वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची तसेच डिसेंबर नंतरही अनुदान योजना पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केली आहे. देशमुख म्हणाले, माहे जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासनाने प्रति लिटर पाच रुपये तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी प्रति लिटर सात रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले असून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे अनुदान दूध उत्पादकांना…
गुरुवार, २ जानेवारी संगमनेर – विविध योजनांसाठी दिले जाणारे अनुदान रखरविण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात २३ डिसेंबरला हे अनुदान तातडीने देत प्रलंबित प्रकरणे मार्गे लावण्याच्या केलेल्या मागणीनंतर बुधवारी नववर्षाच्या प्रारंभी विविध योजनांचे सुमारे सहा कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातूlन संगमनेर तालुक्यातील विविध गाव वस्त्यांवरील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. थोरात यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या. मागील अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना यामधील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – संगमनेर मधील कवी अनंत फांदी नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून नव्या वर्षात हे नाट्यगृह शहराच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. नाट्यगृह बंदिस्त करण्याचे काम सुरू असून या संदर्भात रंगभूमीशी निगडित नाट्यकर्मीं व संगमनेरकरांच्या सूचना विचारात घेता याव्या, यासाठी संगमनेर नाट्य परिषदेच्यावतीने कोकरे यांना निवेदन देण्यात आले होते. नाट्यकर्मींच्या या निवेदनाला प्रतिसाद देत मुख्याधिकारी कोकरे यांनी मंगळवारी सकाळी नाट्यगृहामध्ये अधिकारी, वास्तु विशारद आणि उपस्थित कलाकार यांच्याशी संवाद साधला. वास्तुविशारद अरविंद वैद्य यांनी उपस्थित रंगकर्मींना नियोजित नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.…
गुरुवार, ०२ जानेवारी संगमनेर – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि दुग्ध व्यवसाय दिशादर्शक ठरलेल्या संगमनेर तालुका राजहंस दूध संघाकडून नवीन वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे एक रुपयांची दरवाढ देण्यात येत असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करणारा हा दूध संघ सातत्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. नव्या वर्षात शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे एक रुपयांची दरवाढ मिळणार असल्याने तालुक्यातील दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने आनंद देणारी ही बाब असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. संगमनेर तालुका दूध संघाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांमध्ये…
अहिल्यानगर दि.१- वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वाहनांना नंबर प्लेट बसविण्याकरिता जिल्ह्यासाठी सेवा पुरवठादार एफटीएएचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बुकींग करिता https://maharashtrahsrp.com हे संकेतस्थळ आहे. तसेच, अधिकृत फिटमेंट सेंटर्सची यादी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. या संकेतस्थळावर नमूद एचएसआरपी उत्पादकांकडून अर्जदारांना अर्ज भरणे, शुल्क अदा करणे, आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे, अपॉईंटमेंट घेणे, अपॉईंटमेंटची तारीख बदलणे, सदर प्रक्रीयेबाबत अर्जदाराच्या…
बुधवार, ०१ डिसेंबर २०२५ संगमनेर – पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांची भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देत शहरातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. भाजपाच्या या मागण्याप्रश्नी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. कायदा व सुव्यवस्था, चोऱ्या, पोलीस नावाचा बेकायदेशीर वापर, रिक्षा थांबे, अनावश्यक बॅरिकेटिंग आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. शहरातील व्यावसायिक कासट बंधूंना झालेली मारहाण यामुळे संगमनेर मध्ये कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पोलीस तपासाबाबत पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली. तात्काळ गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहर आणि तालुक्याच्या अनेक भागात…
बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५ संगमनेर – गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय सहकार महर्षी क्रिकेट चषकासाठी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. सतरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय खेळाडूंचा सहभाग राहणार असल्याने ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये तरुणांना करिअर संधी उपलब्ध करून दिला जात याचाच एक भाग म्हणून जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि माजी आमदार, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.…
बुधवार दि. १ जानेवारी २०२५ अहिल्यानगर – महसूल खाते आणि भ्रष्टाचार असे समीकरण बनलेले आहे. सामान्य माणसांचे दैनंदिन काम महसूल खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे पडते. त्यांच्याशिवाय खरेदी-विक्री, कर्जाच्या नोंदी, वारस नोंदी, विविध दाखले, प्रतिज्ञापत्र असे कुठलेही काम होत नाही. त्यामुळे सामान्य माणसांना लुबाडण्याचा आपल्याला जणू काही अधिकार मिळाला असल्याच्या अविर्भावात महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी वागतात. आतापर्यंत अनेकांना अटक झाल्यानंतर देखील त्यातून इतर कर्मचारी धडा घेताना दिसत नाहीत. अशाच प्रकारचा एक गुन्हा श्रीरामपुरात दाखल झाला. बेलापुरातील मंडलाधिकारी कार्यालयातील मदतनीस असलेल्या मांडवे येथील शहाजी केरू वडितके याने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने त्याला अटक…
बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५ नाशिक – वकील असलेल्या तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लाऊन दिल्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल सहायक कैलास वैरागे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक…
