Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील महिलांकडून जागृत महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचच्या अध्यक्षपदी तळेगाव येथील साक्षी दिघे, उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके, सचिव पदी पेमगिरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सुनिता रोहिदास खताळ (धांदरफळ खुर्द), मंदा निळे (मिर्झापूर), ज्योत्स्ना कदम (संगमनेर), लक्ष्मी तूपसुंदर (गुंजाळवाडी), शितल पांडे (पिंपळगाव माथा), मुक्ता सांगळे, लता सावंत (पिंपळगाव माथा), निर्मला दिघे (तळेगाव) यांचे तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत मंगळवारी संगमनेर खुर्द येथे झालेल्या बैठकीत या संगमनेर शाखेची स्थापना केली. बैठकीसाठी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. “आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या” असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची…
विशेष प्रतिनिधी / मुंबई छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाविषयी भूमिका मांडणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आता ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिला आहे. इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा आणि त्याचा आशय…
संगमनेर, दि. २६ फेब्रुवारी राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असायला हवे मात्र, धर्माचा आधार घेत सत्ताधाऱ्यांनी टोकाचे राजकारण केले आहे. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करत यश मिळविले असले तरी जनतेच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरलेली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस आणि लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने आता “हर हर महादेव” म्हणत पुन्हा मैदानात उतरावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची सहविचार बैठक जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी थोरात बोलत होते. ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, प्रभावती घोगरे, मधुकरराव नवले, डॉ. जयश्री थोरात, संपतराव म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानेश्वर…
संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी – नासिक पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रॉबरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फिर्यादीत आरोपी निघाला असून त्याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. फिर्यादीने खोटी माहिती देत अन्य तिघांच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. ३१ जानेवारीला रात्री पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप मध्ये प्रवासी म्हणून संगमनेरला जाण्यासाठी बसलेल्या दोघाजणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ट्रक चालकाला बेशुद्ध करून त्याच्या ताब्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे शेतीचे औषध लंपास केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणी तपास करत होते. काय…
संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून राज्यात ओळख असलेले सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार सहकार चळवळीतील अग्रणी नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सहकार, कला, साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार देण्यात येत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळातून केलेल्या पायाभूत व ऐतिहासिक कामांमुळे कृषी, महसूल, शिक्षण, जलसंधारण या…
दि. २५ फेब्रुवारी – १९८४ च्या शिखविरोधी दंगली प्रकरणी दिल्लीच्या राऊस आव्हेनू न्यायालयाने काँग्रेस नेते माजी खासदार सज्जनकुमार यांना दोषी ठरविले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय २१ फेब्रुवारीला राखून ठेवला होता. शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. या सुटकेला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. या खटल्यात आज हायकोर्टाने निर्णय दिला. हायकोर्टाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शीखविरोधी दंगल भडकली होती. काँग्रेस नेत्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल भडकली, असा आरोप आहे. या संदर्भात…
संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी पकडलेला आरोपी ज्या ग्रामपंचायतमध्ये काम करत होता त्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांकडे बनावट नोटासंदर्भात चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद संगमनेरमध्ये कुरिअर मार्फत प्राप्त झाल्याची माहिती पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होते. या अधिकाऱ्यांसह संगमनेरच्या स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत नोटा छापण्यासाठीचा मुद्देमाल…
ॲड. श्रेयस देशमुख, पुणे भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल क्रांती मोठ्या वेगाने घडत आहे. सरकारी योजनांपासून ते बँकिंग सेवांपर्यंत सर्वच क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत देशाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे भारतपोल. हे पोर्टल म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत यंत्रणांना आणि पोलीस दलांना एका जागी आणणारी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि भौगोलिक विस्तार असलेल्या देशात गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मची गरज होती, जी भारतपोलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आधुनिक…
संगमनेर, दि. २४ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर्षी देखील शिवाजी जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी गोविंद नागरे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तिथीनुसार येत्या १७ मार्चला शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून दरवर्षी शिव जयंती उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवभक्त, नागरिक देखील या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार…
