Author: अनंत पांगारकर

आजचे राशीभविष्य –  मंगळवार २० ऑगस्ट २०२४ मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका. वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस. मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा. कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता. सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या. कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका. तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता. वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज…

Read More

मंगळवार, २० ऑगस्ट  थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाने मोठे यश मिळविले. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक मिळवत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचे नाव साता समुद्रापार नेले. बँकॉकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ५२ संघ सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजनदादा शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित नेण्या-आणण्याची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या स्वीकारून या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी…

Read More

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापुर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचून शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट  पुणे – विरोधक राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे, मात्र याआधी ज्यांनी अनेक योजनांमध्ये कोट्यावधीच्या भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील जे नेते तुरुंगात जाऊन आले आहेत, तेच जनतेची दिशाभूल करून आपल्या माता भगिनींचा सरकारवरील विश्वास उडावा यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील सिल्वर रॉक्स येथे नीलम गोऱ्हे यांनी आपले उद्योजक बंधू मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. अपर्णा पाठक यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनात…

Read More

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान हे भाग्य, थोरात कारखान्याच्या नवीन इमारतीचे पूजन सोमवार, १९ ऑगस्ट संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवी इमारत ही या वैभवशाली परंपरेचा माईल्डस्टोन ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान ही एकनिष्ठतेमुळे मिळालेली मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वास्तुशांती व पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीडब्ल्यूसीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे,…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई : आम्ही राजकारणात ३० ते ४० वर्षे काढली आहेत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री बनू नये का? केवळ प्रस्थापितांनीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे का? उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आमच्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते व यासाठी त्यांनी गुप्तपणे रणनीती आखली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपशी युती तोडून मविआचा पर्याय निवडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, याची त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली असती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले…

Read More

सोमवार, १९ ऑगस्ट  मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. १५ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय मिटींग, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र…

Read More

रविवार, १८ ऑगस्ट काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पक्षीय भूमिका बजावणारे संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवत काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड केली आहे. यामुळे थोरात यांच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे महत्व अधोरेखित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थोरात यांच्या निवडीची माहिती दिली. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा…

Read More

रविवार, १८ ऑगस्ट  महामहीम राज्यपालांच्यावतीने देण्यात येणारा “विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार” संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कामगार पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देत गौरविण्यात आले. अहमदनगरच्या जिल्हा मुख्यालयात पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे आदी…

Read More

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. सत्तेवर कोण येईल, हे आज तरी सांगता येत नसलं तरी भाजपप्रणित सत्तेला चीत करण्याची ताकद महाविकास आघाडीकडे निर्माण झाल्याचं चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं आहे. सत्तेवरल्या एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारसाठी लोकसभेचे निकाल खूपच तापदायक आणि संकटाची चाहूल देणारे आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने खिरापतींची वाटमारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण असो, सुशिक्षितांना स्टायपेंड देण्याचा विषय असो वा साठी गाठलेल्या बुजूर्गांसाठी देश तीर्थ पर्यटनाचा निर्णय असो. राज्याकडे खूप पैसा आहे, म्हणून या खिरापतीच्या योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत.  असं फुकटात देणारं देशातलं पहिलं राज्य…

Read More