Author: अनंत पांगारकर

अखेर निवडणूक आयोगाने काश्मीर खोऱ्यात अन् दिल्ली सीमावर्तीय हरियाणामधे विधानसभेची निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरबाबत देशातील सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मधे निकाल दिला देत आदेश दिला होता की, सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया काश्मीर खोऱ्यात पूर्ण करावी. हा आदेश पाळणे त्यांना बंधनकारक आहे. हरियाणा व महाराष्ट्र यांची मुदत ऑक्टोंबरमधे संपते. मात्र राज्यातील निवडणुका जाहीर करणे अपेक्षित असताना सणसुद, अतिवृष्टी ही फालतू कारणे देवून निवडणूक आयोगाने हे सिद्ध केल की, “होय, मी केंद्र सरकारचा पोपट आहे”. लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तेव्हा कडक ४७ डिग्री तापमान ह्या निवडणूक आयोगला दिसले नाही, अन् गप्पा मारतोय पोपट अतिवृष्टीच्या. पितृपक्षाचे कारण देऊन पोपट पुढे म्हणतो की…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो. त्यातून मोठा लाभ होईल, असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले असून या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (राहणार २७६, भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघा पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची हकीकत अशी की, संकेत कोकणे (कॉटन किंग, मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून सहा…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशा पिंकी शेख (वय ३० वर्ष, रा. डावखर रोड, वार्ड नंबर ६) हिने संगमनेरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, आयेशा शेख काही दिवसांपासून संगमनेरमधील जोर्वे रस्त्यावरील एकतानगरमध्ये रिया, कविता, प्रियांका, शंतनु यांच्यासोबत राहत होती. श्रीरामपूरहून आल्यापासून ती तणावामध्ये होती. बुधवारी (दि. १४ ऑगस्ट) रात्री संगमनेर येथील वाबळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे औषध उपचार घेऊन आल्यानंतर रिया व कविता व्यांच्यासोबत एकतानगरमधील घरी थांबली होती. दरम्यान रिया व कविता यांना काहीतरी आणण्यासाठी गावात पाठवले होते. गावातून आल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद असल्याचे बघितले त्यानंतर…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर  स्वातंत्र्यदिनी श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या समोर गोरक्षक आशिष कोळपकर, अर्जुन मापारी, निखिल निर्मळ यांना मारहाण झाली. गो तस्कर व खाटकांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गो तस्कर व खाटकांकडून गोरक्षकांवर होणाऱ्या हल्याचा संगमनेर बजरंग दलाने जाहीर निषेध केला. तसेच बुधवारी (१४ ऑगस्ट) रात्री गोरक्षक मयुर विधाटे व त्याचे कुटूंबियावर गोरक्षण कार्याचा राग मनात धरुन १५० ते २०० च्या मुस्लिम समुदायाने संगनमताने व त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह हल्ला केला त्यात मयुर विधाटे व त्याचे कुटूंबिय गंभिर जखमी झाले आहेत व ते दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत तसेच वरील झटापटीत मयुर विधाटे याच्या…

Read More

शनिवार, १७ ऑगस्ट मुंबई: लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तेरा खासदार निवडून आले. तर एक बंडखोर उमेदवारही निवडून आला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पक्षाने राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या अर्ज विक्रीतून पक्ष निधीतही भरभरून पैसे जमा झाले आहेत. महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी काँग्रेसने मात्र राज्यातल्या २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. त्यातून पक्ष चाचपणीही करत आहे.…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट  अहमदनगर – जिल्ह्यात १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी… मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातल्या युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, अशा परिस्थितीत आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे, असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला पवार मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारासाठी केलेलं यशस्वी नेतृत्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर प्रचाराची जबाबदारी देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवण्याकडे कल दिसून आला. विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात पुन्हा एकदा जोरदार प्रचार सुरू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही आपली आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळं त्यांच्या हाती पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट चिंचोली गुरव ते पारेगाव बुद्रुक रस्त्यावर मोटार सायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना तीन गोण्या गुटख्यासह पकडले. पोलिसांनी दुचाकीवरून वाहतूक होत असलेला ऐंशी हजार रुपयांचा गुटखा पकडल्याची माहिती समोर येतात संगमनेरमधील गुटखा किंग विजय भागवत हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे. संगमनेरमध्ये कायद्याचे उल्लंघन करत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंदिरानगरमधील (संगमनेर) विजय भागवत या गुटका किंगवर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस मेहरबान असल्याचे आरोप वारंवार होत असतात. मात्र या तस्कराकडून मोठा मलिदा मिळत असल्याने संबंधित यंत्रणेचे कारवाईबाबत नेहमी कानावर हात असतात. सोमवारी स्वातंत्र्यदिनी संगमनेर तालुका पोलिसांना चिंचोली गुरव ते पारेगाव…

Read More

शुक्रवार, १६ ऑगस्ट मठाधिपदी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाच्या महंतावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्ये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लखमीपुरा येथील अहमद रझा युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शेख यांच्या टिपू सुलतान एक योद्धा युवा मंच संगमनेर या व्हाट्सअप ग्रुप वर गंगागिरी महाराज मठाधिपती सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी तांबे यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित…

Read More