Author: अनंत पांगारकर
विधानसभा निवडणूक स्पेशल अनंत पांगारकर राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन ठेपला असतानाच आता संगमनेर मतदार संघात उभ्या असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कोट्यावधीच्या निधीबाबत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यावधीच्या पेड न्यूजचे प्रकरण समोर आले असतानाच आता विविध उमेदवारांना मिळालेल्या निधीच्या चर्चा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आयोगाने आर्थिक संवेदनशील जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पथके मतदार संघात कार्यरत असली तरी अद्याप शहरात समोर आलेले हवालाचे एक प्रकरण वगळता या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन…
नागपूर – मुस्लीम मतदारांना प्रभावित करून महाविकास आघाडी वोट जिहाद करीत असल्याचा आरोप करत आपल्याला एक होऊन त्या विरोधात धर्मयुद्ध पुकाराव लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर मधून निवडणूक लढविणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रचार रॅली काढली होती. या रॅली त्यांनी पुन्हा एकदा वोट जिहाद संदर्भात पुनरुच्चार केला. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करीत असून ते खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी आम्ही कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी असले प्रकार करीत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला एक व्हावे लागेल. धर्मयुद्ध पुकारावे लागेल. ऑल…
रविवार, १७ नोव्हेंबर एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत. खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही…
पायाखालची वाळू सरू लागली की माणूस सैरभैर होतो. काय करू, काय नको, असं त्याला होत असतं. राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संकटाची चाहूल लागलेले आतापासूनच वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यांना कधी ‘व्होट जिहादची’ स्वप्न पडतात तर कधी त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची भीती वाटते. खरं तर यातलं काहीही होत नसतं. पण अशी भीती घातली की हिंदू मतदार आपल्याच मतदान करतील, अशी त्यांची मानसिकता बनते. या माणसांचं राज्यात धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण व्हावी, असं वर्तन असतं. त्यांच्या या वर्तनाला घरातूनच विरोध होतो, हे मात्र त्यातल्या त्यात चांगलं लक्षण म्हणता येईल. महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेतील बहुमत आपल्याच हाती असलं पाहिजे या मानसिकतेत…
भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे. शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत…
शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडचा आठवा बॉयलर अग्नि प्रदीपन व गणित हंगामाचा शुभारंभ रविवारी (१७ नोव्हेंबर) होत आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते हा समारंभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या कौठे मलकापूरच्या माळरानावर आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी रोवली होती. गेल्या सात वर्षात कारखान्याने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. कारखान्याला दरवर्षी कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागतो. यावर्षी देखील कारखाना व्यवस्थापनाने नव्या जोमाने गळीत हंगामाची तयारी…
संगमनेर – अनंत पांगारकर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी देखील सर्वच पक्षाचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अद्याप प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. एकीकडे ऐनवेळी दिलेला उमेदवार आणि दुसरीकडे उमेदवाराभोवती जमलेला लाभार्थ्यांचा मेळा यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी गोची झाली आहे. वर्षानुवर्ष विरोधात राहिल्यानंतर आता राजकीय तडजोडीमुळे ज्याला विरोध केला याचाच प्रचार करायची वेळ घेऊन ठेपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला विक्रीस काढले आहे. “साहेब, कार्यकर्ता विकणे आहे” अशा मिष्कील शब्दात राजकीय पक्षांचे निष्ठावंत (नाव न छापण्याच्या अटीवर) आपले दुःख व्यक्त करत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. कोणत्या…
काँग्रेसशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या बी. जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ काँग्रेसमध्ये
शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ज्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निवडणुकीतील भाषणांना आणि थोरात यांच्यावरील टिकेला सुरुवात केली जाते, त्या खताळ पाटलांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सेलचे पदाधिकारी असलेले विक्रमसिंह खताळ यांनी शनिवारी शिर्डीमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचार सभेवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून विक्रमसिंह खताळ पाटील भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. गेल्या वेळी तसेच यावेळी देखील खताळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र दोन्ही वेळेला त्यांचा उमेदवारीचा पत्ता पक्षातील काही नेत्यांनी कापण्यात पुढाकार घेतला. एकीकडे खताळ पाटील यांच्या नावावर राजकारण करताना दुसरीकडे त्यांच्या नातवाला पक्षात डावले जात असल्याचे खाजगीत…
शनिवार, १६ नोव्हेंबर विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका स्कार्पिओतून दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे ही स्कार्पिओ श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या कुटुंबीयांची असल्याची माहिती समोर येत असून या स्कार्पिओमध्ये नागवडे यांचा मुलगा देखील होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील महत्त्वपूर्ण लढतींचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण लढती असलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू असल्याचे समोर येत आहे. उमेदवाराला पक्षाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचे देखील चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. अशातच नागवडे यांच्या पुत्रासह काहीजणांना रोकड रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय जवळ बाळगताना पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा मतदार…
शुक्रवार, १५ नोव्हेंबर मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव…
