Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क येणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वतंत्ररीत्या ‘कमळ’ या निवडणुक चिन्हावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामास सुरुवात करावी, असे आवाहन लोकसभा प्रवास योजना राज्य संयोजक माजी मंत्री संजय भेगडे यांनी केले आहे. उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी लोकसभा प्रवास योजनेसंदर्भात जिल्हास्तरीय बैठक शिर्डी येथे राज्य संयोजक व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम व बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर आदी उपस्थित होते. भेगडे म्हणाले, देशातील काही लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात असे अठरा मतदारसंघ आहे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उसाच्या पाचटापासून तयार करण्यात आलेल्या सपराच्या घरात झोपेत असलेल्या ६५ वर्षीय वृद्धेवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाले असून वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे शिवारात असलेल्या खडके वस्तीवर ही दुर्घटना घडली आहे. रखमाबाई तुकाराम खडके असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. झोपेत असलेल्या वृद्धेवर अचानकपणे हल्ला केल्यानंतर बिबट्याने या वृद्धेस जवळपास शंभर फुटापर्यंत नेले यात या वृद्धेचा मृत्यू झाला. घटनेच्या एक दिवस अगोदर याच ठिकाणाहून बिबट्याने शेळीवर हल्ला करत शेळी नेण्याची घटना घडली होती. त्यामुळे चटक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता समान नागरी कायद्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. २०२४ पर्यंत राज्य सरकारांनी राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. दोन मोठ्या वचनांच्या पूर्ततेनंतर केंद्र सरकार आता तिसऱ्या वचनपूर्तीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र देशांमध्ये भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त दुसरा कोणताही पक्ष या मागणीला पाठिंबा देत नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारांना २०२४ पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यास सांगितले आहे. अन्यथा २०२४ आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असल्याने त्यासाठी कायदा करू असे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टाइम्स नाऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुचाकी, महिलांच्या दागिन्यासह पोलिसांच्या दृष्टीने किरकोळ असणाऱ्या चोऱ्यांच्या घटना नियमित घडत असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा चंदनाच्या झाडाकडे वळविला आहे. अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाडच चोरून नेल्याचा प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाला आहे. चंदनाच्या झाडाची चोरी करणारा चोरटा आणि झाड दोघांचाही शहर पोलिसांना तपास लागू शकलेला नाही. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा रक्षक भारत मुरलीधर मोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. २१ नोव्हेंबरला पहाटे दोन ते साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. मालपाणी हेल्थ क्लब येथून सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या या झाडाची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा राजकीय मुद्दा कळीचा बनलेला असताना आता गुजरातच्या व्यापाऱ्याकडून संगमनेरातील व्यापाऱ्याला तब्बल 29 लाखाला फसविले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार मंडोरा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात माहिती अशी, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा. निंबाळे, ता. संगमनेर) हे गुजरात सह अन्य राज्यातील व्यापाऱ्यांना टोमॅटो माल देत असतात. अशाच पद्धतीने त्यांनी गुजरात मधील सब्जीमंडी थरा ता. डीसा जि. बनासकांता येथील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना गेल्या वर्षी टोमॅटो विक्री केली होता. मात्र या मालाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा भाग असलेला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. बेळगावी सीमा वादावरील न्यायालयीन प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमावादावरील सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली. “राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात कन्नडिग आहेत, ज्यांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, असंही ते म्हणालेत. बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केलेत. कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यम शाळांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याची मागणी २०१२ मधील असल्याचे सांगत “एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची” असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात सीमाभागातील गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना यावर पहिली प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, याबाबत आमची काल-परवाच एक बैठक झाली. हा जुना वाद न्यायालयात प्रलंबित आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक बुधवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या साई दर्शनावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक शिर्डीमध्ये खास हेलिकॉप्टरने साई बाबांच्या दर्शनासाठी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर दुपारी आगमन झाल्यानंतर महसूल, पशुसंवर्धन,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यपालांकडून पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये. भारतीय जनता पार्टीचे कोट्यावधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊन काम करतात. शिवरायाचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाजिरवाण्या शब्दात टीका केली संपूर्ण महाराष्ट्राने या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची “स्वाभिमानी सचिव संघटना’ स्थापन करण्यात आली आहे. नगरच्या मधुरंजनी सभागृहामध्ये नुकताच सहकारी सेवा सोसायटीच्या सचिवांचा मेळावा पार पडला. यामध्ये संस्था नियुक्त सचिवांच्या विविध मागण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. नगर जिल्ह्यात जवळपास २००-२५० सचिव हे संस्था नियुक्त आहे. महाराष्ट्रात सहकार हे शेतकरी विकासाचे नेहमी द्योतक राहिले आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला नेहमी न्याय देण्याचे व उभे राहण्याचे बळ दिले जाते. त्याच माध्यमातून ग्रामीण भागात सेवा सोसायटी ही शेतकऱ्याच्या थेट सेवेत असते. जिल्हा बँकेच्या संलग्नतेतून शेतकरी बांधवाना कर्ज वाटप, विविध व्यवसाय व शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अशा महत्वाच्या भूमिकेत…
