Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये मोठया प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाढलेल्या चोऱ्यांसह वाढलेले सायबर क्राईम हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिसांनी याबाबत खंबीर भूमिका घेत तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आमदार तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे. याकरता पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस मित्र संघटनेची ही मदत घ्यावी तसेच गावागावातील तरुणांनाही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सरपंचाच्या घरी डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ लाख रुपयांची केबल चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील निमोण येथे घडला आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. निमोणचे विद्यमान सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय संजय जाधव (वय २४ वर्षे रा. बालमटाकळी ता. शेवगाव) याच्यासोबत त्याच्या दोघा साथीदारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील जाधव याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री सफेद रंगाच्या स्कार्पिओमधून (क्रमांक ८०५५ पूर्ण क्रमांक माहिती नाही) आलेल्या आरोपींनी घरासमोर ठेवलेली १४,१७,४१६/-रुपये किमतीचे पंधराशे मीटर लांबीचा एक पंचवीस स्वेअर्स एम.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्त्यांच्या विविध कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी संगमनेर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारकडून थोरात यांनी मोठा निधी उपलब्ध करत तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२-२०२३ मधून येथील देखील तालुक्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची व यातून तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. १७१…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : संगमनेर शहरालगत असलेल्या पावबाकी, सुकेवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघा दरोडेखोरांना पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. असे असले तरी स्थानिक शहर पोलिस मात्र या दरोड्यासह खूनाच्या अन्य एका प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत. संगमनेरातील दरोड्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक पोलिसांसह नगरच्या गुन्हे शाखेचे पोलीस पथक परिश्रम करत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांनी संगमनेरातील दरोड्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळते. याशिवाय या गुन्हेगारांच्या टोळीने जिल्ह्यात अन्यत्र दरोडे घातल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. नगर एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक अनिल…

Read More

रविवार विशेष 🔹प्रवीण पूरो गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या मागे लागलेली इडीची पिडा आता संपायला हरकत नाही. खोट्याचं खरं फारकाळ होत नसतं. आणि सत्ताधार्‍यांच्या नादी लागून तर अजिबात नाही. लाज, लज्जा त्या विभागाची जात असते. घडवून आणणारा राजकारणी तिथेच असतो. इडीने आजवर केलेल्या कारवायांकडे पाहाता आता तरी इडीचे अधिकारी शहाणे होतील, अशी अपेक्षा.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून जबाबदारीवर असलेल्या अनील देशमुख यांना ते मंत्री असताना इडीने ताब्यात घेतलं. त्यांच्यावरील आरोपाचे कोणतेही पुरावे नसल्याने इडीच्या जोखडातून न्यायालयाने त्यांना मोकळं केलं आहे. देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने इडीविरोधात नोंदवलेल्या शेर्‍यांचा विचार करता यापुढे कोणालाही ताब्यात घेताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामसभा सुरू असताना सार्वजनिक कामाबाबत प्रश्न विचारला म्हणून प्रश्न विचारणाऱ्यास शिवीगाळ आणि लाथाबुक्क्याने मारहाण करत विरोधात बोललास तर कायमचा संपवून टाकेल, अशी धमकी गाव कारभाऱ्यांनी दिली. एवढ्यावरच समाधान न मानता या सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तोंडात औषध टाकत दोन गाड्यांमधून आलेल्या गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करत जबर मारहाण करण्याचा प्रकार तालुक्यातील पठार भागात घडला. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे यांनी साकूर ग्रामसचिवालयात सुरू येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नाही. म्हणून पाणीपुरवठा का बंद आहे असे विचारणा ग्रामसेवकाला केली असता संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर हनुमंत खेमनर त्याला म्हणाले, तुझा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : गेल्या चार दिवसांपासून संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. दोन स्वतंत्र वयोगट आणि योगासनांच्या पाच प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करत १९ सुवर्ण पदकांसह २७ पदके पटकावित अजिंक्यपदावर मोहर उमटवली. उपविजेतेपद पाच रौप्य व सहा कांस्य पदके मिळवणार्‍या पश्‍चिम बंगाल संघाने तर तिसरे स्थान एका सुवर्ण पदकासह चार पदके मिळवणार्‍या तामीळनाडू संघाने मिळवले. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या खेळाडूंना खेलो इंडिया आणि एशियन गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारपासून (ता. २७) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या तक्रार अर्जावरून तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी तसेच सदरचा अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली. प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखावर सेटलमेंट करणाऱ्या या उपनिरीक्षकाला एसीबीने तुरुंगाची हवा दाखविली आहे. रोहित गणेश डोळस (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जासंदर्भात डोळस याने तक्रार अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी तसेच एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी दोन…

Read More

पालिका, महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी लाभणार? महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक, अमरावती या दोन पदवीधर मतदार संघासोबत औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने त्या संबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी बहुचर्चित ठरलेल्या पालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप आयोगाला मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या तीन टर्मपासून आमदार डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांची विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली होती. तांबे यांच्यासह अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री लेजंड एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आल्यानंतर तो रद्द करण्याची आफत संयोजकांवर ओढवली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या मालपाणी लॉन्स येथे लेजंड एंटरटेनमेंट या ग्रुपने नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या युवक-युवतींना इंस्टाग्रामवरील स्टारचे आकर्षण दाखवून व युवकांना २०० रुपये फी आकारून महिला-युवतींना विनामूल्य प्रवेश देत या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित विभागाकडून घेतल्या नसल्याचा तसेच सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री महाविद्यालयात जाऊन युवक-युवतींना पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण दाखवून केली जात असल्याचा आक्षेप घेत या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला असून या सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत झालेल्या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले गायन व वादन हे संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमामुळे अमृतवाहिनीतील वातावरण संगीतमय झाले होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने गायन व वादन कलेची स्वरामृत म्युझिकल नाईट पार पडली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, झी मराठी सारेगमपचा उपविजेता सारंग भालके, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम. लोंढे, मेधाचे समन्वयक प्रा. जी.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी रात्री मंचावर खास महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना देशभरातील २९ राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येही वीरश्री संचारली. शक्ती आणि चपळता यांचा संगम असलेल्या साहसी खेळांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंगळवारपासून (२७ डिसेंबर) संगमनेरात राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरु आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. देशातील २९ राज्यांमधून आलेले स्पर्धक, प्रशिक्षक, पंच, पालक या सर्वांच्या मनोरंजनासाठी गुरुवारी रात्री विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : उत्तर नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत संगमनेर मध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या अटल वकृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अटल वकृत्व स्पर्धेसाठी विजेत्यांमधून स्पर्धक निवडले गेले. भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्यभरात “अटल युवा पर्व”चे आयोजना अंतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चामार्फत वक्तृत्व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : पंचायत समिती सभागृहात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ग्राहक दिनात ग्राहक, नागरिकांनी विविध तक्रारी उपस्थित केल्या. याबाबत तहसीलदारांनी संबंधित खात्यांना सुचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल असे सांगितले. ग्राहक दिनात विविध विषयावर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्‍यांना दाखविण्यात आले. तर कोल्हार घोटी राज्य मार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालु असल्याची तक्रार देखील माडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना तातडीने सुचना दिल्या. याशिवाय अकोले तालुक्यातील आदिवासी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  नाशिक : एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीन चालकाच्या हलगर्जीपणामुळे एमबीबीएस शाखेत शिकणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांवर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. नामांकित महाविद्यालयात विषबाधेची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे असलेल्या नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये बुधवारी (दि.२८) रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. एकूण दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनच्या चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराला एसएमबीटीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. असाच काहीसा प्रकार काही महिण्यापूर्वी इगतपुरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण फरार हल्लेखोरांना पकडल्यानंतर समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कोवीड काळात झालेल्या आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून हा हल्ला केल्याच हल्लेखोरांनी सांगितल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या डॉ. प्राची पवार ह्या नाशिकचे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर १३ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात जीवघेणा हल्ला झाला होता. पवार यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला याचा उलगडा होत नव्हता. अखेर बुधवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांना हल्लेखोरांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर येथील देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची उपाध्यक्षपदी अक्षय भागवत यांची, श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे यांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील मेनरोडवर असलेल्या देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी देवीचे मंदिरामध्ये कोष्टी समाजाची युवक समितीची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली. यावेळी देवांग कोष्टी समाज पदाधिकारी यांनी युवक व महिला यांची एक समिती नेमण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले, उपाध्यक्षपदी अक्षय भागवत, कार्याध्यक्षपदी आलेख कुदळ, खजिनदारपदी स्वप्नील खोजे, सचिवपदी अजित बडदे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरजे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : रस्त्यावर दुकान टाकून बॅग विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची परिणती थेट चाँपरचा वापर करत हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली. यात एक जण जखमी झाल्याने शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उमेर मेहबूब पारवे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात जखमी युवकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सायंकाळी फिर्यादीचा मुलगा आणि आरोपींमध्ये बॅग विकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. फिर्यादीचा मुलगा व त्याचे मित्र रात्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्‍या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. २७ डिसेंबर पासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील २९ राज्यातील ७८९ योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीयस्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्‍या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. योगासनांचे पारंपरिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक…

Read More