Author: अनंत पांगारकर

शनिवार १३ जुलै  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाच्यावतीने (आयसीएआय) मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत संगमनेर येथील ओंकार राजेंद्र मुळे (वय 22) उत्तीर्ण झाला. ओंकार हा संगमनेर ब्राह्मण परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ बंडू मुळे यांचा मुलगा तसेच भाऊसाहेब थोरात पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण मुळे यांचा पुतण्या आहे. ओंकार मुळे याचे प्राथमिक शिक्षण संगमनेरच्या सह्याद्री विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर कॉलेजमध्ये झाले. तो पुण्यातील डीकेव्ही अँड असोसिएटस या संस्थेत आर्टिकलशीप करीत आहे. त्याला भाऊ आदित्य मुळे, मित्र सीए तेजस पवार व सीए हिमांशू रावलानी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ओंकारचे अभिनंदन होत आहे.

Read More

शनिवार १३ जुलै  पावसाळी अधिवेशन संपताच संगमनेरमध्ये परतलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळीच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. बुधवारी सायंकाळच्या वेळी जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात केलेल्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने तिच्या दीड वर्षीय चिमुकलीला आपल्या जबड्यात पकडून जवळच्या गवतात नेले होते. हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी बिबट्यामागे गवतात धाव घेत त्याला हूसकावून लावले. गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षीय चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या ओवी सचिन गडाख या दीड वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबीयांचे…

Read More

शनिवार १३ जुलै  संगमनेरच्या पठार भागातील आंबी खालसा परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण पठार भागात उमटले असून शुक्रवारी कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात पठार भागातील गावांमध्ये बंद पाळत घारगावमध्ये सकल हिंदू समाज हिंदू संघटनांच्यावतीने आंबी खालसा ते घारगाव असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिहादी प्रवृत्ती विरोधात जनजागृतीसाठी जाहीर सभा पार पडली. घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन ७ जुलै रोजी साडेअकराच्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले; परंतु घारगाव पोलिस ठाण्यात केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच…

Read More

शनिवार १३ जुलै  खरेदी केलेल्या शेत जमिनीची रजिस्ट्री करण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकासह दोन मुद्रांक विक्रेत्यांवर लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक, उपनिबंधक कार्यालय हदगाव), मुद्रांक विक्रेता खासगी इसम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर आरोपींची नावे असून नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने मौजे हदगाव (नांदेड) येथे २० गुंठे शेत जमीन खरेदी केली होती. या शेत जमिनीची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराने सोमवारी (ता. ८ जुलै) हदगाव येथील उपनिबंधक कार्यालयात…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय, पीएसआय आणि कर्मचारी हप्तेखोर आर्थिक लोभापाई दोन आस्थापनांचा कारभार एकाच निरीक्षकाकडे हप्ते गोळा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बघा नावानिशी यादी साई मंदिरच्या सुरक्षा विभागात नेमणूक असलेला रवींद्र कर्डिले मास्टरमाईंड आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र संवाद न्यूजने टाकला होता प्रकाश! शनिवार १३ जुलै गेल्या काही दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त लाभलेली अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नगरचे खासदार निलेश लंके यांच्या रडारवर आली असून या गुन्हे शाखेचा कारभाराचा भांडाफोड करत लंके यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याने नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुकेश अंबानींच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आघाडीचे नेते उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले असून विरोधी पक्षातील सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. इंडिया आघाडीबरोबर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला सातत्यानं टक्कर देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तान मुंबईत आल्या आहेत. विवाह सोहळ्याचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात राजकीय…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने विरोधकांनी यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काल शेवटच्या दिवशी विधान परिषदेत २६० अनव्ये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरून सरकारवर परखड टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानने चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली होती. अंतिम निकालात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. यात शेवटच्या फेरीत जयंत पाटील पराभूत झाले. ठाकरे गटाकडून…

Read More

शुक्रवार १२ जुलै सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा लागलेला कलंक पुसण्यात स्थानिक पोलिसांपासून जिल्हा पोलीस दलापर्यंतची पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली आहे. शहरातील शांततामय वातावरणाला गालबोट लागू शकेल अशी गंभीर घटना घडण्याची पोलीस वाट बघत आहे की त्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडत नाही, असा संशय निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील महापुरुषांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकत हॉटस्पॉट बनलेल्या या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची चिन्हे असल्याचा संशय वर्तविला होता. त्यानंतर पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने पोलिस आणि अवैध व्यावसायिकांमधील मधुर अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळू…

Read More

शुक्रवार १२ जुलै  केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19 आपल्या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत…

Read More