Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शहर…
आजचे राशीभविष्य: मंगळवार, १० मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि ऊर्जेचे कौतुक होईल, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असून विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमची जिद्द आणि चिकाटी यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील ओलावा वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी…
संगमनेर, प्रतिनिधी – रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच कॅनलच्या पाण्यात पडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे रविवारी (८ मार्च) सायंकाळी ही घटना घडली. वाजिद मोहसीन शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. कुरण परिसरातील कॅनलजवळ असताना पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यानंतर कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वाजिदच्या अशा अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.…
अहिल्यानगर: जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गॅस पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करण्यात येणार असून, जर कोणी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गॅस वितरकांनी ग्राहकांना वेळेत सेवा द्यावी…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घरातील थोरामोठ्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस धावपळीचा ठरेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट…
शिर्डी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामध्ये घातपाताची शक्यता वाटत नसली तरी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. केवळ एखाद्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्याची मागणी केली. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी का दिली आणि विमान दुसऱ्या विमानतळावर का वळवले नाही, या प्रश्नांचा शोध घेऊन दोषींवर कठोर…
संगमनेर, प्रतिनिधी- कमी पटसंख्येचे कारण पुढे करत राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छात्र भारतीच्या मते, शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी…
संगमनेर, प्रतिनिधी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सदैव सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून राज्याला परिचित आहे. याच परंपरेत आता आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच ‘रक्षक दल’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, आज रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.…
महिला दिन विशेष… जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. संगमनेरच्या राजकीय पटलावर गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुण, सुशिक्षित आणि धडाडीच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. निवडणुकीच्या राजकारणात एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेली महायुती शून्यावर बाद होण्याची स्थिती निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल समोर आला. या विजयातून जिने प्रस्थापितांना विचार करायला भाग पाडले आहे. त्या म्हणजे संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी. उच्च शिक्षणाची शिदोरी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून समाजकारणात उतरलेल्या साक्षी सूर्यवंशी यांनी अत्यंत कमी कालावधीत महिलांच्या हक्कासाठी लढणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून…
अमेरिका खरोखरच भारताचा मित्र आहे की आणखी कोण? आजवरच्या इतिहासात भारताच्या उपयोगी न आलेल्या पहिल्या देशात ज्याचं नाव घ्यायचं ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. तो जर कोणाचा मित्र होत असेल तर त्यामागे प्रचंड सौदेबाजी आलीच म्हणून समजा. या सौद्यासाठी तो मित्राचीच काय पण सग्यांचीही गय करत नाही. तो आपल्या मित्राची आब राखेल हे कदापि शक्य नाही. अमेरिकेचा हा अनुभव जगातल्या अनेक देशांच्या पदरी असताना भारताने त्याच्यासाठी उघडलेली दारं हा आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विशाखापट्टणम इथे आयोजित ‘मिलन 2026’ या नौदल संचलनासाठी आपण पाचारण केलेल्या इराण नौदलाच्या आयआरआयएस देना या लढाऊ जहाजावर मागच्या दाराने हल्ला करून अमेरिकेने भारताला औकात दाखवण्याचा…
