Author: अनंत पांगारकर
सोमवार, २२ जुलै नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण रविवारी निम्मे भरले. मुसळधार नसला तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरण परिसर सततच्या पावसाने चिंब भिजला आहे. सुट्टी असल्यामुळे भंडारदरा घाटघर परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून कळसुबाई, रतनगड, हरिचंद्रगडाच्या डोंगररांगेत पाऊस सुरू आहे. विशेष जोर नसला तरी पाऊस सातत्य टिकवून आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात नियमितपणे वाढ सुरू आहे. ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी ५ हजार ५०८ दलघफू झाला होता. धरण ४९.९० टक्के भरले होते. निळवंडे धरण २१ टक्के भरले असून, या धरणाचा पाणीसाठा आज सकाळी २०.६९ टक्के…
सोमवार, २२ जुलै | अहमदनगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून एलसीबीसह पोलीस दलातील भ्रष्टाचार समोर आणत कारवाईची मागणी केल्यानंतरदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेविरोधात थेट खासदारच उपोषणाला बसल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे. सोमवारी, २२ जुलैला लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. तत्पूर्वी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चा आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. लंके यांच्यासोबत महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलिसांकडून त्रस्त असलेले नागरिकदेखील सहभागी झाले आहे. लंके यांनी गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील पोलीस…
दूध दरासाठीची शेतकऱ्यांची शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉलीची भव्य रॅली उद्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार
सोमवार, २२ जुलै दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी गेल्या सतरा दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. कोतुळ आंदोलनाच्या १८ व्या दिवशी अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या ५५ किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची भव्य रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. आंदोलनाच्या १८ व्या दिवशी…
सोमवार, २२ जुलै शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार असून त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री शहा भाजपाच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितांना म्हणाले, पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांनी महाराष्ट्रासाठी आणला नाही, उलट मोदींनी खूप…
रविवार २१ जुलै लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. मात्र नव्याने पुढारी होऊ पाहणारे काही लोक फक्त पत्रकबाजी करत आहेत. अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरणे प्रलंबित होती ती तात्काळ मार्गी लागावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच या समितीच्या बैठका झाल्या. लाभार्थ्यांचे अडवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती, याच पोटदुखीतून ते पत्रकबाजी करत असल्याचे टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे. थोरात यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या समितीच्या बैठका घेण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीवरून राजकारण…
रविवार, २१ जून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा नेत्या, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल पापडेजा यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली. वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी – वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ, गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश…
रविवार २१ जुलै संगमनेरमधील ‘शक्तिमान टॉवर्स’मध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच येथील वरच्या मजल्यावर सातत्याने आढळणारे गंजाडी, जुगारी आणि दारुडे शनिवार असताना देखील गायब झाल्याचे दिसून आले. मात्र या कॉम्प्लेक्समधील अवैध धंदे शनिवारी देखील सुरूच होते. सुसंस्कृत संगमनेरला अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लागलेला अवैध धंद्यांचा कलंक अद्यापही कायम आहे. अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आहे त्या यंत्रणा सध्या तरी सुस्तावल्या असल्याने त्यांच्यावर बातम्यांचा फारसा परिणाम दिसत नाही. एकीकडे पोलीस खात्यातील एलसीबीच्या हप्तेखोरीवरून अहमदनगरचे खासदार उपोषणाच्या तयारीत असले तरी संगमनेरसह जिल्ह्यात अवैध धंदे मात्र अद्यापही जोरात सुरू आहे. खासदारासारखा लोकप्रतिनिधी या विरोधात उपोषणाचा मार्ग…
रविवार २१ जुलै तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ वाढली असून, भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झाल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी म्हटले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समिती तात्काळ जाहीर…
रविवार २१ जुलै संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भाग नेहमीच अवैध सावकारकीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिरेवाडीतील एका सावकार पिडीत व्यक्तीची आर्थिक पिळवणूक झाली, जमीन लाटण्याचा प्रकार केला, मानसिक त्रास देत पैशाचा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासाला कंटाळून सबंधित व्यक्तीने संगमनेरच्या उपनिबंधकांकडे तक्रार केली. या रागातून तक्रारदाराबाबत नियोजित कट आखून भ्याड हल्ला करत संपूर्ण कुटुंब संपवायची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (१८ जुलै) सकाळी बिरेवाडी परिसरात घडली. साकुरजवळील बिरेवाडी गावातील तरुण शेतकरी मुक्ताराम काशिनाथ सागर हे कुटुंबासोबत राहत आहे. याच गावातील सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे हे अवैध सावकारकीचा व्यवसाय करत असून…
विशेष प्रतिनिधी / मुंबई सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उडी घेतली असून हा सरकारच्या दुर्लक्षतेचा परीणाम असल्याचा आरोप करत सरकारला घेरलं आहे. खेडकर यांच्याविरोधात दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल केला आहे. बनावट कागदपत्र, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे यूपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हे प्रकरण म्हणजे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर आणि विश्वासावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक…
