Author: अनंत पांगारकर

शुक्रवार १२ जुलै सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा लागलेला कलंक पुसण्यात स्थानिक पोलिसांपासून जिल्हा पोलीस दलापर्यंतची पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली आहे. शहरातील शांततामय वातावरणाला गालबोट लागू शकेल अशी गंभीर घटना घडण्याची पोलीस वाट बघत आहे की त्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडत नाही, असा संशय निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील महापुरुषांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकत हॉटस्पॉट बनलेल्या या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची चिन्हे असल्याचा संशय वर्तविला होता. त्यानंतर पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने पोलिस आणि अवैध व्यावसायिकांमधील मधुर अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळू…

Read More

शुक्रवार १२ जुलै  केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19 आपल्या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत…

Read More

शुक्रवार १२ जुलै  अहमदनगर जिल्हा परिषदेने तिघा बांधकाम ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबित केला असून त्यांची सुरक्षा ठेवदेखील जप्त करण्यात आली तर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विकास कामे प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून ही कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने विविध योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असतो. मात्र प्रथमत:च जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर आली असून कारवाई सत्र सुरू केले आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात विकास कामे प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकामच्या उत्तर विभागामार्फत संगमनेर व नेवासा तालुक्यातील बारा प्रलंबित कामांसाठी तीन ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या…

Read More

गुरुवार ११ जुलै  गुजराती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशात स्थायिक होत आहेत. पासपोर्ट जमा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतीय तरुणांच्या या पावलामागे अनेक आश्चर्यकारक कारणे समोर आली आहेत. भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या एका वर्षात दुप्पट झाली आहे… भारतीय पासपोर्ट सोडण्याचा गुजरातींचा कल वाढत आहे. २०२१ पासून आतापर्यंत ११८७ गुजरातींनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे आणि ते इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. कॅनडा गुजरातींची पहिली पसंती ठरत आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत जी कॅनडाकडे गुजरातींचा कल दर्शवतात. कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक गुजराती कॅनडामध्ये स्थायिक झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातचे तरुण कॅनडामध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपलं करिअर घडवण्यात…

Read More

गुरुवार ११ जुलै  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १७ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून रस्ते, आरोग्य, पाणी यांसह नागरिकांना मूलभूत सुख सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. या रस्त्यांचा…

Read More

गुरुवार ११ जुलै   पश्चिमी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे नगर जिल्ह्यात वळवून या माध्यमातून जिरायती भागातील पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. प्रवरा खोऱ्यात आणखी साडेनऊ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, यासाठी शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांची भेट घेतली हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. बुधवारी वाकचौरे यांनी मिसाळ यांची भेट घेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत अधिक माहिती घेतली. यावेळी रोहित वाकचौरे उपस्थित होते. पश्चिम भागाकडे जाणारे पाणी पूर्व भागात आणल्यास पिण्याचे पाणी, सिंचन व उद्योगाचे विषय मार्गी लागणार आहेत. यावेळी त्यांनी नद्यांचे रेखांकन, धरणातील गाळ, सिंचन…

Read More

गुरुवार ११ जुलै | संगमनेर  ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावात, तालुक्यातील तीन घाटांमध्ये व ११ विविध डोंगरांवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन केले जात असल्याची माहिती अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. कारखान्याच्या वृक्षारोपणावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक…

Read More

गुरुवार, ११ जुलै, अहमदनगर  राज्यात कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी शासनाने शेतकऱ्यांसह संस्था आणि गटाकडून प्रस्ताव मागविले आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांचा समावेश आहे. २०२३ या वर्षासाठी हे अर्ज (प्रस्ताव) मागविण्यात आले असून शेतकरी, गट आणि संस्थेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जुलै पर्यंत आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या…

Read More

गुरुवार,११ जुलै गांजा तस्करी प्रकरणात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपजिल्हाप्रमुख राहिलेल्या महिला पदाधिकाऱ्यास तेलंगणा पोलिसांनी नाशिकच्या पंचवटी परिसरातून अटक केली आहे. नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मी ताठे असे या माजी महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तेलंगणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गेल्या महिन्यात ०८ जूनला १९० किलो गांजा पकडला होता, याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातच बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जून २०२३ मध्ये शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. पक्षातील काही पदांवरील नियुक्तीवरून लक्ष्मी ताठे आणि शोभा…

Read More

गुरुवार, ११ जुलै  संगमनेरच्या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक अल्कॉन कंपनीची अमेरिकन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी मशिनरी बसविण्यात आली असून या मशीनवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व्हावी यासाठी बाहेरगावी जावे लागत असे. आता मात्र या शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. प्रसिद्ध उद्योजक व मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या हस्ते या मशिनरीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी दर्शन रोटरीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. संगमनेर-अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी दर्शन रुग्णालयाने आतापर्यंत अतिशय उच्च दर्जाची सेवा दिली आहे. रुग्णालयामार्फत आतापर्यंत सुमारे २७ हजार मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून याचा लाभ समाजातील गोरगरीब वर्ग, तसेच दुर्गम भागातील रुग्णांनी…

Read More