Author: अनंत पांगारकर
बुधवार, १० जुलै | संगमनेर दीड वर्षाच्या चिमुकलीला शेताच्या बांधावर ठेवत चारा कापणीचे काम करणाऱ्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने चिमुकलीवर हल्ला चढवत तिला ठार करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा गावात बुधवारी संध्याकाळी घडली. ओवी सचिन गडाख (रा. हिवरगाव पावसा, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बिबट्याने चिमुकलीची मान आपल्या जबड्यात पकडत जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतली. चिमुकलीचा प्रतिकार अयशस्वी ठरला. जखमी अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष…
बुधवार, १० जुलै फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (वय ५६ वर्ष) लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. लाच लुचपतच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या परिचित महिलेने क्रेडिट सोसायटीत पैसे दुप्पट करून देण्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी १७ लाख ५० हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले होते. उर्वरित दहा लाख रुपयांची रक्कम देण्यास संबंधित महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने सदर महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशाचे विचारणा केले तेव्हा महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक…
बुधवार, १० जुलै न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिपण्णी करत दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. कदम यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलाबा पोलीस पुढील तपास करत आहे. माजी आमदार रमेश नागनाथ कदम यांच्या तक्रारी नुसार २०१४ ते २०१९ यादरम्यान दहिसर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह लाच लुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात कदम यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस बंदोबस्तात न्यायालयीन सुनावणीसाठी कदम यांना सत्र न्यायालयात आणण्यात येत असताना २१ जानेवारी २०१६ रोजी…
अनंत पांगारकर बुधवार, १० जुलै | संगमनेर महावितरण कंपनीकडून सध्या वीज ग्राहकांची विज बिल आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या महावितरणच्या अंतर्गत चाळीस गावांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महावितरणच्या आशीर्वादाने कर्जुलेपठार अंतर्गत येणाऱ्या वीज उपकेंद्रात मोडणारी गावे दोन दिवसांपासून अंधारात आहे. या संदर्भात या भागातील नागरिक आणि संगमनेरमधील पत्रकार बाबासाहेब कडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिल्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम या भागातील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी दाखवत आपल्या बेजबाबदारीचे दर्शन घडविले आहे. वीज उपकेंद्र अंतर्गत मोडणारी गावे अंधारात असताना थोरात यांनी आपले दोन्ही मोबाईल स्विच ऑफ ठेवत जबाबदारी…
विशेष प्रतिनिधी | मुंबई गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती तात्काळ भरण्यासाठी निवडणूक घेण्याच्या मागणी करिता राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी भेट घेतली. विधान परिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारीची दाखल घेत विधान परिषदेसाठी सभापतींची निवड घेण्यात यावी, या मागणीसाठी ही भेट घेण्यात आली, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना दिली. राज्यपालांची भेट घेताना दानवे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, सतेज (बंटी) पाटील, रमेश कोरगांवर, जयंत पाटील हे उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर मविआच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधान…
मंगळवार, ०९ जुलै | मुंबई पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची आवश्यक परवानगी नसताना राज्यात अनधिकृत लॅब सुरू असल्याचे सभागृहात समोर आल्याने या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आमदार सुनील राणे यांनी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत यांनी उत्तर घेताना ही माहिती दिली. सामंत म्हणाले, जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईल. राज्यभरात भरारी पथक नेमून अशा बोगस लॅब शोधण्याची कार्यवाही केली जाईल. राज्यात…
विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील विरोधकांच्या कुरबुरी सतत वाढत आहेत. परिणामी उपसभापतींना विचारलेल्या जाबानंतर त्यांनी चक्क माघार घेत स्वतःच केलेली शेरेबाजी तपासून ती कामकाजातून काढून घेण्याचा शब्द विरोधकांना द्यावा लागण्याचे घटना सोमवारी सभागृहात घडली. उपसभापती गोऱ्हे या सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. आठवड्याभरापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले होते, तेव्हा त्यांनीही असाच आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जाते, मात्र विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाही, असं दानवे यांनी सभागृहात म्हटले होते. अशातच सोमवारी विधानपरिषदेचे ठाकरे…
मंगळवार, ०९ जुलै पोलिसांनी नाशिकमध्ये एका कारवाईत ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट गाडीत लाखो रुपयांचा गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजाने भरलेली गाडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारतनगर येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून हा गांजा आणला गेल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक चार चाकी वाहन संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात १९.६५० किलो गांजा आढळून आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. याची चौकशी सुरू आहे. साधकाने…
मंगळवार ०९ जुलै | संगमनेर समाजातील अनेक घटकांसाठी जिव्हाळ्याचे असलेल्या व आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणार्या संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्षपदी मुकेश कोठारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संगमनेर मर्चंट बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सहाय्यक उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत एकमताने दोन्ही निवडी करण्यात आल्या. यावेळी बँकेचे प्रमुख मार्गदर्शक उद्योजक राजेश मालपाणी म्हणाले, संगमनेर मर्चंट्स बँकेच्या लोकाभिमुख आणि वेगवान सेवेमुळे दिवसेंदिवस बँकेकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होत असून बँकेच्या परिपूर्ण सेवेमुळे समाधानी होत आहेत. ग्राहकांची जिंकलेली मने आणि मिळवलेला विश्वास हाच बँकेचा सर्वश्रेष्ठ…
मंगळवार, ०९ जुलै | संगमनेर महाराष्ट्र पोलीस दलातील डीवायएसपी, एसीपी बढती घोटाळ्याची चर्चा असतानाच आता नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना बदल्याच्या ठिकाणी नियुक्त न करणे, बदल्याच्या ठिकाणी न सोडणे याबाबतच्या घोटाळ्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश देवूनही अद्यापही बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. तसेच दोन गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली व नेमणूक नसतानादेखील त्याला पोलीस अधीक्षकांचे खास मर्जी असल्याने नगर एलसीबीच्या विशेष पथकात वर्षभरापासून ठेवले असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याची तक्रार खासदार निलेश लंके यांनी देखील केलेली आहे. नगर जिल्ह्यातील पोलीस पथकांच्या विविध कारवाया आणि त्यामागे…
