Author: अनंत पांगारकर
शनिवार, दि. १८ मे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी आठ दिवसानंतर राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे राऊत यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होती घटना… नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती.…
दाखल गुन्ह्यात सर्रासपणे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केली जाते लाचेची मागणी दाखल गुन्ह्यांचा तपास होणार तरी कसा लाचखोरांकडून शेपन्नास, हजारावरून लाचेची मागणी आता लाखाच्या, कोटीच्या घरात! शनिवार, दि. १८ मे महावितरणमध्ये नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यावर दाखल असलेल्या मीटर चोरीच्या गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षकाने तक्रारदार आरोपीकडे पाच लाखाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय सर्जेराव शेगर असे या लाचेची मागणी करणाऱ्या, गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली असून अँटी करप्शनकडे…
अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करणाऱ्या व न्यायालयीन कोठडीत असलेल्या संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. यामुळे पंडितचा कोठडीतील मुक्काम वाढला असून पंडित याच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी आणि सून प्रगती गांधी या दांपत्याचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आर्थिक कर्ज घोटाळाप्रकरणी उद्योजक अमित पंडित गेल्या तीन महिन्यापासून कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पंडित याने २६ मार्चला जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या…
संगमनेर, शुक्रवार दि. १७ मे केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (CBSE) जाहीर झालेल्या शालांत परीक्षांच्या निकालात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाविन कटारियाने ९८ टक्के तर, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या पाखी दातीरने ८८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात शाळेतील ३० टक्के मुलांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर ८६ टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रथमेश घुले अतिशय खडतर समजल्या जाणार्या जेईई मेन्ससाठी पात्र ठरला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलमधील इयत्ता दहावीच्या भाविन कटारियाने ९८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आयुष सराफ आणि अदिती लाहोटी यांनी प्रत्येकी…
अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थे पाठोपाठ आता अहमदनगरमधील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेडचा मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ठेवीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून ११२ ठेवीदारांची सुमारे सहा कोटी फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह सात संचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड चा अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीरचावडी, माळीवाडा, अहमदनगर) याच्यासह उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहररोड, सावेडी, अहमदनगर), संचालक सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. अहमदनगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी,…
शुक्रवार, दि. १७ मे एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरी केलेल्या कारवाईत अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडल आहे. यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीचा समावेश आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची अँटी करप्शन विभागाकडून (ACB) झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड, ९७० ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते…
गुरुवार, दि. १६ मे देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यातील निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटात मोठी फूट पडणार असल्याचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणूक राज्यात शेवटच्या टप्प्याकडे जात असताना निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. त्यातच कंबोज यांनी समाज माध्यमातून केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळाला ४ जूनच्या निकालाचे वेध लागण्यापूर्वीच कंबोज यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा…
गुरुवार, दि. १६ मे बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन…
बुधवार, दि. १५ मे शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच घेणारा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बुधवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सतीश सुरेश चौधरी (वय ५२ वर्ष, रा. शांतीनगर, नंदुरबार) असे लाचखोर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव असून ते नंदुरबार येथे कार्यरत आहे तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका हद्दीत मालमत्ता क्रमांक ८२६, सिटी सर्वे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नम्रता हॉटेल सुरू करावयाचे असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL३ परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण…
बुधवार, दि. १५ मे बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५…
